पाळणा - जो जो रे जो जो श्रीरामचंद...
जो जो रे जो जो श्रीरामचंद्रा । दशरथपुत्रा लागो निद्रा ॥ध्रु०॥
केवळ कांचनी-पाळणा आणिला । बा तुजसाठीं रेशमी विणिला ॥१॥
खूर रुप्याचे चहुबाजूंना । हंतरिलासे आंत बिछाना ॥२॥
भरजरी चांदवा रेशमी शेला । चिमण्या मोत्याची झालर त्याला ॥३॥
हंस कोकीळ ते इंद्रनिळाचे । बसविले शुक मोर पाच पोंवळ्याचे ॥४॥
हालवी कौसल्या दशरथ बाळा । वंदिते कृष्णा त्या विश्वपाळा ॥५॥