पाळणा - जो जो जो जो रे गजवदना । म...
जो जो जो जो रे गजवदना । मयुरेश्वर सुखसदना ॥
निद्रा करिं बाळा एकरदना । सकळादी गुणसगुणा ॥जो०॥
गंडस्थळ शुंडा ते सरळी । सिंदुर चर्चुनि भाळीं ॥
कानीं कुंडलें ध्वजजाळी । कौस्तुभतेज झळाळी ॥जो०॥
पालख लावियला कैलासीं । दाक्षायणिचे कुशीं ॥
पुत्र जन्मला हृषिकेशी । गौरिहराचे वंशीं ॥जो०॥
चौदा विद्यांचा सागर । वरदाता सुखसागर ॥
दुरितें निरसीलीं अपार । विष्णूचा अवतार ॥जो०॥
लंबोदर म्हणतां दे स्फूर्ति । अद्भुत ज्याची कीर्ति ॥
जीवनसुत अर्ची गुणमूर्ती । सकळिक वांछा पुरती ॥जो०॥