पाळणा - हळु हालवितें पाळण्याला ...
हळु हालवितें पाळण्याला
माझ्या मोगरीच्या फुला
माझ्या नवसाच्या बाळा
जो जो रे जो जो
तुझ्यासाठीं मागितलें
रुप सूर्याचें आगळें
हासूं चंद्राचें मोकळें
माझ्या नवसाच्या बाळा
जो जो रे जो जो
वर्षें किती वर्षांपाठीं
थांबलें मी तुझ्यासाठीं
आतां धन्य माझी ओटी
माझ्या नवसाच्या बाळा
जो जो रे जो जो
नीज सुखांत साजिरा
माझ्या डोळ्यांचा पाहारा
अमंगलाला ना थारा
माझ्या नवसाच्या बाळा
जो जो रे जो जो