पाळणा - जो जो जो बाळा नको रडूं गो...
जो जो जो बाळा नको रडूं गोपाळा । दारीं बागुलबुवा आला बागुलबुवाचें रुप दिसे मनोहर ।
आंगावरी व्याघ्रांबर ॥
त्रिशूळ डमरु शंख शोभे फणिवर । गळ्यामध्यें मनुष्य मुंडांचे हार ॥
मिशा पिंगट शिरीं जटांचा भार ॥ वरी वाहे झुळझुळ नीर ।
भस्म सर्वांगीं कंठ दिसतो नीळा । आरुढोनि नंदीवर आला ॥जो जो॥१॥
बागुलबुवाचा ऐकुनि शब्द कानीं । तेव्हां रडे चक्रपाणी ॥
मातेसी म्हणे चल बाहेर घेवोनी । दाखवी बागुल नयनीं ॥
नको छंद घेऊं उगा राहे गोपाला । मी भिक्षा वाढितें त्याला ॥जो जो॥२॥
म्हणे नंदाला घ्या याला क्षणभरी । मी भिक्षा वाढितें वेगीं ॥
मोत्यें पोवळ्यांनीं सुवर्ण ताट भरुनी । द्वारा बाहेरी घेउनी ॥
घ्या घ्या बायांनो नका करुं उशीर । माझें बाळ भितरं फार ॥
नव्या नवसांनीं एवढाचि पुत्र आम्हाला । तो मोठ्या दैवें लाधला बाळ आहे
कसें आहे सर्वां माहित दिसे जगावरी नाइक । मी बाळाचा शब्द ऐकुनी कानीं त्वरें आलों जी धांवोनी ।
अहा नारायणा हरिसेवेमधीं गुंतला । मी अनंत नमितों त्याला ॥जो जो ॥३॥