Android app on Google Play

 

पाळणा - जो जो जो :जो रे कुळभुषणा ...

 

जो जो जो:जो रे कुळभुषणा । दशरथनंदना ॥

निद्रा करिं बाळा मनमोहना । रामा लक्षुमणा ॥ध्रु०॥

पाळणा लांबविला अयोध्येसी । दशरथाचे वंशीं ॥

पुत्र जन्मला हृषिकेशी । कौसल्येचे कुशीं ॥१॥

रत्‍नजडित पालख । झळके अमोलिक ॥

वरती पहुडले कुळदीपक । त्रिभुवननायक ॥२॥

हालवी कौसल्या सुंदरी । धरुनी ज्ञानदोरी ॥

पुष्पें वर्षीलीं सुरवरीं । गर्जती जयजयकारी ॥३॥

विश्वव्यापका रघुराया । निद्रा करि बा सखया ॥

तुजवर कुरवंडी करुनियां । सांडिन अपुली काया ॥४॥

येउनि वसिष्‍ठ सत्वर । सांगे जन्मांतर ॥

राम परब्रह्म साचार । सातवा अवतार ॥५॥

याग रक्षुनियां अवधारा । मारुनि रजनीचरां ॥

जाईल सीतेच्या स्वयंवरा । उद्धरि गौतमदारा ॥६॥

पर्णिल जानकी सुरुपा । भंगुनियां शिवचापा ॥

रावण लज्जित महाकोपा । नव्हे पण हा सोपा ॥७॥

सिंधूजलडोहीं अवलीळा । नामें तरतिल शिळा ॥

त्यांवरि उतरुनियां दयाळा । नेशी वानरमेळा ॥८॥

समूळ मर्दुनि रावण । स्थापिल बिभीषण ॥

देव सोडविले संपूर्ण । आनंदेल त्रिभुवन ॥९॥

राम भावाचा भुकेला । भक्ताधीन झाला ॥

दास विठ्ठलें ऐकिला । पाळणा गाईला ॥१०॥

 

पाळणे

स्तोत्रे
Chapters
गणपतीचा पाळणा - जो जो जो जो रे गजवदना । म...
गणपतीचा पाळणा - जो जो जो जो रे गजवदना । प...
विष्णूचा पाळणा
शिवाचा पाळणा
परशुरामाचा पाळणा
रामाचा पाळणा - बाळा जो जो रे कुळभूषणा । ...
रामाचा पाळणा - जो जो जो जो रे रघुराया । ...
लवकुशाचा पाळणा
कृष्णाचा पाळणा - बाळा जो जो रे कुळभूषणा । ...
कृष्णाचा पाळणा - मथुरेमध्ये अवतार धरिला । ...
दत्ताचा पाळणा - जो जो जो जो रे सुकुमारा ।...
दत्ताचा पाळणा - जो जो जो रे जो जो जो । तू...
मदालसाचे अंगाई गीत
शिवाजीचा पाळणा - तुज जोजविते माय जिजाई बाळ...
शिवाजीचा पाळणा - मी लोटिते झोका तुज शिवबाळ...
रजनीमाईचा पाळणा
शाहूचा पाळणा
पांडुरंगाचा पाळणा
बाळाचा पाळणा
बाळाराजाचा पाळणा
वनदेवीचा पाळणा
आजीबाईचा जुना पाळणा
निर्गुणाचा पाळणा
बागुलबावा आला
अक्रूराचा पाळणा
जोग्याचा पाळणा
पाळणा - जो जो जो जो रे गजवदना । म...
पाळणा - जो जो जो जो रे गजवदना ॥ प...
पाळणा - जो जो जो :जो रे कुळभुषणा ...
पाळणा - जो जो जो जो रे रघुराया । ...
पाळणा - जो जो रे जो जो श्रीरामचंद...
पाळणा - जो जो जो जो रे जो जो जो ।...
पाळणा - जो जो जो जो रे सुकुमारा ।...
पाळणा - जो जो जो जो रे सुखधामा । ...
पाळणा - जो जो जो जो रे व्यापका । ...
पाळणा - जो जो जो जो रे त्रिनयना ।...
पाळणा - जो जो जो जो रे घनश्यामा ।...
पाळणा - बाळा जो जो रे कुळभूषणा । ...
पाळणा - मथुरेमध्यें अवतार धरिला ॥...
पाळणा - जो जो रे जो जो श्रीकृष्ण ...
पाळणा - जो जो जो बाळा नको रडूं गो...
पाळणा
पाळणा - जो जो जो जा रे मधुसुदना ।...
पाळणा - सुतार निर्गुणिचे तुजसाठीं...
पाळणा - धरतीच्या बाळा जो जो रे ...
पाळणा - हळु हालवितें पाळण्याला ...
पाळणा - गुणी बाळ असा जागसि कां रे...
पाळणा - जो जो जो जो रे । शिवराया ...
पाळणा - सन अठराशें सत्याण्णव साला...