नांदू द्या तुमची साम्राज्ये सुखात !
समर्थांनो, असो तुमची शाबास !
तुमच्या शौर्यास जोड नाही
विजय-दिनाचा सोहळा साजरा
सावकाश करा आता तुही !
नांदू द्या तुमची साम्राज्ये सुखात
भकास, उधवस्त जगात या
जिंकिली भूमि ती केवळ स्मशान !
फुलवा खुशाल बागा तिथे
आणि द्या एकदा काळाला आव्हान,