अरे कुलांगारा, करंटया कारटया !
अरे कुलांगारा, करंटया कारटया,
घातक कुलटा बुद्धि तुझी
जन्म दिला, केले लालन पालन
संस्कृति-शिक्षण दिले तुला
राहिली न तुला आईची ओळख
तुझे पापमुख पाहू नये
भोगिली अपार तिने कष्टदशा
आता तिच्या नाशा टपलास !
खांडोळी कराया उगारिशी हात
अरे तुझा घात ठरलेला !