फार मोठी आम्हा लागलीसे भूक !
फार मोठी आम्हा लागलीसे भूक
आता नाही भूक राहणार !
यापुढे आमचा रोज क्रांतिदिन
नाही हीनदीन राहणार
पेटविली आम्ही एकदा मशाल
आता सर्वकाल पेटणार
प्रचंड आमचा सुरु झाला यज्ञ
त्याला कोण विघ्न आणणार ?
चाळीस कोटींचे घोर आक्रंदन
कोण समाधान करणार ?