प्रभो, तुझ्या एका मंगल नामात---
एका सूक्ष्म बीजावरी गेले लक्ष
त्यात महावृक्ष दिसे मला
बालनिर्झराच्या उगमात मला
आढळून आला महानद
बोल निघे बालकवीच्या तोंडून
ऐकिले त्यातून महाकाव्य
एका अणुमाजी शास्त्रज्ञ पाहती
कोटिविश्वशक्ती भरलेली
प्रभो, तुझ्या एका मंगल नामात
स्वरुप विराट सामावलें