नाहीतर उरी फुटशील !
चिमुकल्या अरे गोजिर्या पाखरा,
झाला का पिंजरा नकोसा हा ?
का रे थरथर असा कापतोस?
का रे पाहतोस दीनवाणे ?
छळ होतो तुझा ठाऊक हे मला
परी तुझा गळा थांबला का?
कधीतरी तुझी होणार सुटका
निःश्वास असा का सोडितोस ?
गाऊ ह्रदय मोकळे तू करी
नाहीतर उरी फुटशील !