देवा, माझे पाप नको मानू हीन !
कमळाला जन्म देणार्या चिखला,
कस्तूरि तुजला मानितो मी
जन्म घे कोळशा, हिरा तुझ्या पोटीं
तुझे गुण कोटी पारखी मी
कोण म्हणे दासी, देवी तू पवित्र
उदरी विदुर जन्मे तुझ्या
कान्होपात्रे अगे, गणिकेच्या मुली,
तुझी मी माउली वन्द्य मानी
देवा, माझे पाप नको मानू हीन
फुलव त्यातून गुणवल्ली