मार्ग हा निघाला अनंतामधून
मार्ग हा निघाला अनंतामधून
होतसे विलीन अनंतात !
अनंतकाळ या अखंड तेवती
पहा दीपज्योति ठायी ठायी
युगायुगातून एक एक ज्योत
पाजळली जात आहे मार्गी
कितीदा घातली काळाने फुंकर
अधिक प्रखर झाल्या पण
चला प्रवाश्यांनो, पुढे पुढे आता
करू नका चिंता, भिऊ नका