क्षितिजावरती झळक झळक !
क्षितिजावरती झळक झळक
उजळ ठळक शुक्रतार्या,
तेजस्वी, प्रसन्न, शांत तुझी मुद्रा
अगा महाभद्रा, संजीवनी
जातसे मनीचे किल्मिष झडून
होताच दर्शन प्रातःकाळी
थकल्या भागल्या जीवा दे हुरूप
तुझे दिव्यरूप सायंकाळी
दुःखी या पृथ्वीचा पाठीराखा बंधू
आहेस तू, वंदू तुला आम्ही