घरातच माझ्या उभी होती सुखे !
घरातच माझ्यां उभी होती सुखे
नच देखूं शके आंधळा मी
मृगजळामागे दूर दूर गेलो
परतून आलो तान्हेला मी
समाधान नाही, सदा वखवख
सदा रुखरुख मनामाजी
मोलवान ठेवा सोडुनी घरचा
भिकारी दारचा जाहलो मी
असा देव, झालो भ्रष्ट वेडापिसा
शुद्धीवर कसा आणशील ?