महात्मा
मारेकर्या, गेला व्यर्थ तुझा वार
नाही पारावर फजीतीला
अमर तो जाशी ज्याला मारायाला
मेल्याहूनी मेला झालास तू
काळे तुझे तोंड लोपे काळोखात
त्याला प्रकाशात जागा नाही
ज्यावरी येशूला केली खिळेठोक
धर्माचे प्रतीक झाला क्रूस
युगायुगाचा तो जाहला महात्मा
धनी तू दुरात्मा रौरवाचा