Get it on Google Play
Download on the App Store

खर्‍या संस्कृतीचा प्रारंभ 62

इटलींत एकहि विरोधी आवाज नसणें हें स्वत:च्या सत्तेसाठीं ज्याप्रमाणें त्याला महत्त्वाचें वाटे, त्याचप्रमाणें पुंजीपतींच्या सर्व गरजा भागविणें हेंहि त्याला आवश्यक वाटे. कारखानदारांना व बँकवाल्यांना तो आधी स्वेच्छेनें वागण्याचें स्वातंत्र्य देई व मग ते मुसोलिनीला भरपूर पैसे देत असत. त्यांच्याच जोरावर तो सत्ताधीश राहूं शके. मुसोलिनीचे राजकीय खर्च अपरंपार असत. तो हे पैसे कोठून आणीत असें हें समजावयाला इटलींत मुद्रण-स्वातंत्र्य नसल्यामुळें, तेथें वर्तमानपत्रांची मुस्कटदाबी असल्यामुळें, मार्ग नाहीं. पण इटलींतील बहुजन-समाज दरिद्री असल्यामुळें मुसोलिनीला हा पैसा कोठून मिळे हें समजण्याला फारशी अक्कल नको. जप्ती व लांचलुचपत या दोन मार्गांनीं तो पैसे उकळी व सत्ता हातीं ठेवी. डाकूगिरी व लांचलुचपत हेच हुकूमशाही शासनपध्दतीचे दान मुख्य आधार. प्रो. रॉबर्ट सी. बु्रक्स आपल्या 'हुकूमशहांपासून सोडवा' या सुंदर व उद्बोधक पुस्तकांत लिहितात, ''मोठ्या मोठ्या प्रमाणावर लांचलुचपत व इतर नष्ट-भ्रष्ट प्रकार रूढ करूं इच्छिणार्‍या सरकारला त्यासाठीं हुकूमशाहीहून अधिक योग्य उपाय सुचविणें कोणत्याहि घटना-विशारदाला अगर सैतानालाहि शक्य नाहीं.''

हुकूमशहा सर्व राष्ट्राचेचं एक हत्यार बनवितो, साधन बनवितो. श्रीमंत लोक अशा हुकूमशहाला देत असलेल्या देणग्यांच्या (अगर लांचांच्या म्हणा हवें तर) पैशाच्या जोरावर हुकूमशहा आपल्या हत्याराला धार लावतो, नीट आकार देतो. हुकूमशहा राष्ट्राचें एकीकरण श्रीमंतांपुढें लाळ घोटून करतो, कारण, त्याला स्वत:च्या हातांत सत्ता हवी असते. स्वत:च्या फायद्यासाठीं, केवळ स्वार्थासाठीं, त्याला हें सर्व करावयाचें असतें. आजकालच्या हुकूमशाहीच्या मागें या मुख्य हेतुशिवाय दुसरें कांहींएक नसतें. मुसोलिनीच्या जीवनांची व कारकीर्दीची थोडक्यांत रूपरेषा पाहिल्यास हें स्पष्ट होईल.

मुसोलिनीहि हिटलरप्रमाणें अहंकेंद्री होय. सारें जग आपल्या व्यक्तित्वाभोवती फिरत आहे असें त्यालाहि वाटत असे. त्याच्या सर्व जीवनांत पुढें घुसण्याची, मीपणाची, अहंपूजेची वृत्ति दिसून येई. तो कामगार-कुळांत जन्मला. तरुणपणीं तो सामाजिक क्रांति करणार्‍यांच्या पक्षांत होता. लहानशा डबक्यांतला मोठा मासा व्हावेंसें त्याला वाटे. त्यानें आपल्या वर्तुळांत, आपल्या डबक्यांत, जास्तींत जास्त मोठा आवाज करण्याची धडपड केली. त्यानें चर्चवर हल्ला चढविला व स्टेटच्या सनदशीर सत्तेविरुध्दहि बंडाची चिथावणी दिली. जागतिक महायुध्दांत त्याच्या हिंसक वृत्तीला भरपूर क्षेत्र लाभलें. तो युध्दप्रिय पक्षाचा पुढारी झाला. युध्दनंतर अत्याचारानें-हिंसेंनें अधिकच गोष्टी मिळवितां येतील असें त्याला दिसलें, मोठी बक्षिसें मिळवितां येतील असें त्याला वाटलें. त्याची स्वार्थेच्छा अपार होती. १९२२ सालीं त्यानें सैन्यावर ताबा मिळविला व ज्युलियस सीझरप्रमाणें तो रोमवर चाल करून गेला. त्यानें आपण इटलीचें संरक्षक असल्याची घोषणा केली.

इतिहासांत तेच ते नमुने पुन: पुन: दिसतात. मुसोलिनी 'सीझरची छोटी आवृत्ति' वाटतो. सीझरप्रमाणें त्यालाहि वाटत असे कीं, फक्त आपणच जगाला वांचवूं शकूंच्. सीझरप्रमाणेंच आपण मोठे साहित्यसम्राट आहों व जगज्जेते होऊं शकूंच् असें त्याला वाटे. हुकमशहा झाल्यावर मुसोलिनी म्हणाला, ''जग एका कलावंताला मुकले.''  सीझरप्रमाणेंच तो पोरकट व पदोपदीं स्वत:ची जाहिरातबाजी करणारा होता. तो प्रसंगीं आपली लठ्ठ, बुटकी व वांकड्या पायांची मूर्ति लोकांना दाखवीत असे. तो मोठा प्रदर्शनबाज होता. तो अमेरिकन सर्कशींतील उत्कृष्ट विदूषक शोभत. तो भुंकणार्‍याचें सोंग छान करी. डामडौल व आरडाओरडा करण्यांत तो तरबेज होता. त्याची भूमिका नेहमीं उठावाची असे. तो नेहमीं धटिंगणपणा व उद्दामपणा चालूच ठेवी. मिलिटरी परेड करण्याचा त्याला फार नाद असे. जुन्या रोमन नेत्यांप्रमाणें स्वत:चे पराक्रम जगाला जाहीर करण्यासाठीं तो प्रचंड उत्सव-समारंभ योजीत असे. सीझरला 'मी' हें प्रथमपुरुषी सर्वनाम अत्यंत आवडे. तो म्हणे, ''मी आलों, मीं पाहिलें, मीं जिंकिलें !''  या बाबतींतहि मुसोलिनीनें सीझरचें झकास अनुकरण केलें. ''इटलीचा भाग्वविधाता फक्त मीच आहे.'' अशीच त्याची घोषणा असे. तो एकदां म्हणाला, ''मी लोकांना तोलतों, अजमावतों, युध्दांत पुढें ढकलतों, मीच त्यांचा मार्गदर्शक होतों.''  मुसोलिनी जाणूनबुजून सीझरचें अनुकारण करीत असे. पण तें शहाणपणाचें नव्हतें. सीझरचा अंत कसा झाला ही दुर्दैवी घटना इतिहासानें दाखविली असली तरी मुसोलिनी ती विसरून गेला असें दिसतें.

मानवजातीची कथा

पांडुरंग सदाशिव साने
Chapters
मानवजातीचें बाल्य 1 मानवजातीचें बाल्य 2 मानवजातीचें बाल्य 3 मानवजातीचें बाल्य 4 मानवजातीचें बाल्य 5 मानवजातीचें बाल्य 6 मानवजातीचें बाल्य 7 मानवजातीचें बाल्य 8 मानवजातीचें बाल्य 9 मानवजातीचें बाल्य 10 मानवजातीचें बाल्य 11 मानवजातीचें बाल्य 12 मानवजातीचें बाल्य 13 मानवजातीचें बाल्य 14 मानवजातीचें बाल्य 15 मानवजातीचें बाल्य 16 मानवजातीचें बाल्य 17 मानवजातीचें बाल्य 18 मानवजातीचें बाल्य 19 मानवजातीचें बाल्य 20 मानवजातीचें बाल्य 21 मानवजातीचें बाल्य 22 मानवजातीचें बाल्य 23 मानवजातीचें बाल्य 24 मानवजातीचें बाल्य 25 मानवजातीचें बाल्य 26 मानवजातीचें बाल्य 27 मानवजातीचें बाल्य 28 मानवजातीचें बाल्य 29 मानवजातीचें बाल्य 30 मानवजातीचें बाल्य 31 मानवजातीचें बाल्य 32 मानवजातीचें बाल्य 33 मानवजातीचें बाल्य 34 मानवजातीचें बाल्य 35 मानवजातीचें बाल्य 36 मानवजातीचें बाल्य 37 मानवजातीचें बाल्य 38 मानवजातीचें बाल्य 39 मानवजातीचें बाल्य 40 मानवजातीचें बाल्य 41 मानवजातीचें बाल्य 42 मानवजातीचें बाल्य 43 मानवजातीचें बाल्य 44 मानवजातीचें बाल्य 45 मानवजातीचें बाल्य 46 मानवजातीचें बाल्य 47 मानवजातीचें बाल्य 48 मानवजातीचें बाल्य 49 मानवजातीचें बाल्य 50 मानवजातीचें बाल्य 51 मानवजातीचें बाल्य 52 मानवजातीचें बाल्य 53 मानवजातीचें बाल्य 54 मानवजातीचें बाल्य 55 मानवजातीचें बाल्य 56 मानवजातीचें बाल्य 57 मानवजातीचें बाल्य 58 मानवजातीचें बाल्य 59 मानवजातीचें बाल्य 60 मानवजातीचें बाल्य 61 मानवजातीचें बाल्य 62 मानवजातीचें बाल्य 63 मानवजातीचें बाल्य 64 मानवजातीचें बाल्य 65 मानवजातीचें बाल्य 66 तरवारीचें व फांसाचें थैमान 1 तरवारीचें व फांसाचें थैमान 2 तरवारीचें व फांसाचें थैमान 3 तरवारीचें व फांसाचें थैमान 4 तरवारीचें व फांसाचें थैमान 5 तरवारीचें व फांसाचें थैमान 6 तरवारीचें व फांसाचें थैमान 7 तरवारीचें व फांसाचें थैमान 8 तरवारीचें व फांसाचें थैमान 9 तरवारीचें व फांसाचें थैमान 10 तरवारीचें व फांसाचें थैमान 11 तरवारीचें व फांसाचें थैमान 12 तरवारीचें व फांसाचें थैमान 13 तरवारीचें व फांसाचें थैमान 14 तरवारीचें व फांसाचें थैमान 15 तरवारीचें व फांसाचें थैमान 16 तरवारीचें व फांसाचें थैमान 17 तरवारीचें व फांसाचें थैमान 18 तरवारीचें व फांसाचें थैमान 19 तरवारीचें व फांसाचें थैमान 20 तरवारीचें व फांसाचें थैमान 21 तरवारीचें व फांसाचें थैमान 22 तरवारीचें व फांसाचें थैमान 23 तरवारीचें व फांसाचें थैमान 24 तरवारीचें व फांसाचें थैमान 25 तरवारीचें व फांसाचें थैमान 26 तरवारीचें व फांसाचें थैमान 27 तरवारीचें व फांसाचें थैमान 28 तरवारीचें व फांसाचें थैमान 29 तरवारीचें व फांसाचें थैमान 30 तरवारीचें व फांसाचें थैमान 31 तरवारीचें व फांसाचें थैमान 32 तरवारीचें व फांसाचें थैमान 33 तरवारीचें व फांसाचें थैमान 34 तरवारीचें व फांसाचें थैमान 35 तरवारीचें व फांसाचें थैमान 36 तरवारीचें व फांसाचें थैमान 37 तरवारीचें व फांसाचें थैमान 38 तरवारीचें व फांसाचें थैमान 39 तरवारीचें व फांसाचें थैमान 40 तरवारीचें व फांसाचें थैमान 41 तरवारीचें व फांसाचें थैमान 42 तरवारीचें व फांसाचें थैमान 43 तरवारीचें व फांसाचें थैमान 44 तरवारीचें व फांसाचें थैमान 45 तरवारीचें व फांसाचें थैमान 46 तरवारीचें व फांसाचें थैमान 47 तरवारीचें व फांसाचें थैमान 48 तरवारीचें व फांसाचें थैमान 49 तरवारीचें व फांसाचें थैमान 50 तरवारीचें व फांसाचें थैमान 51 तरवारीचें व फांसाचें थैमान 52 तरवारीचें व फांसाचें थैमान 53 तरवारीचें व फांसाचें थैमान 54 मध्ययुगांतील रानटीपणा 1 मध्ययुगांतील रानटीपणा 2 मध्ययुगांतील रानटीपणा 3 मध्ययुगांतील रानटीपणा 4 मध्ययुगांतील रानटीपणा 5 मध्ययुगांतील रानटीपणा 6 मध्ययुगांतील रानटीपणा 7 मध्ययुगांतील रानटीपणा 8 मध्ययुगांतील रानटीपणा 9 मध्ययुगांतील रानटीपणा 10 मध्ययुगांतील रानटीपणा 11 मध्ययुगांतील रानटीपणा 12 मध्ययुगांतील रानटीपणा 13 मध्ययुगांतील रानटीपणा 14 मध्ययुगांतील रानटीपणा 15 मध्ययुगांतील रानटीपणा 16 मध्ययुगांतील रानटीपणा 17 मध्ययुगांतील रानटीपणा 18 मध्ययुगांतील रानटीपणा 19 मध्ययुगांतील रानटीपणा 20 मध्ययुगांतील रानटीपणा 21 मध्ययुगांतील रानटीपणा 22 मध्ययुगांतील रानटीपणा 23 मध्ययुगांतील रानटीपणा 24 मध्ययुगांतील रानटीपणा 25 मध्ययुगांतील रानटीपणा 26 मध्ययुगांतील रानटीपणा 27 मध्ययुगांतील रानटीपणा 28 मध्ययुगांतील रानटीपणा 29 मध्ययुगांतील रानटीपणा 30 मध्ययुगांतील रानटीपणा 31 मध्ययुगांतील रानटीपणा 32 मध्ययुगांतील रानटीपणा 33 मध्ययुगांतील रानटीपणा 34 मध्ययुगांतील रानटीपणा 35 मध्ययुगांतील रानटीपणा 36 मध्ययुगांतील रानटीपणा 37 मध्ययुगांतील रानटीपणा 38 मध्ययुगांतील रानटीपणा 39 मध्ययुगांतील रानटीपणा 40 मध्ययुगांतील रानटीपणा 41 मध्ययुगांतील रानटीपणा 42 मध्ययुगांतील रानटीपणा 43 मध्ययुगांतील रानटीपणा 44 मध्ययुगांतील रानटीपणा 45 मध्ययुगांतील रानटीपणा 46 मध्ययुगांतील रानटीपणा 47 मध्ययुगांतील रानटीपणा 48 मध्ययुगांतील रानटीपणा 49 मध्ययुगांतील रानटीपणा 50 मध्ययुगांतील रानटीपणा 51 मध्ययुगांतील रानटीपणा 52 मानवजातीची जागृती 1 मानवजातीची जागृती 2 मानवजातीची जागृती 3 मानवजातीची जागृती 4 मानवजातीची जागृती 5 मानवजातीची जागृती 6 मानवजातीची जागृती 7 मानवजातीची जागृती 8 मानवजातीची जागृती 9 मानवजातीची जागृती 10 मानवजातीची जागृती 11 मानवजातीची जागृती 12 मानवजातीची जागृती 13 मानवजातीची जागृती 14 मानवजातीची जागृती 15 मानवजातीची जागृती 16 मानवजातीची जागृती 17 मानवजातीची जागृती 18 मानवजातीची जागृती 19 मानवजातीची जागृती 20 मानवजातीची जागृती 21 मानवजातीची जागृती 22 मानवजातीची जागृती 23 मानवजातीची जागृती 24 मानवजातीची जागृती 25 मानवजातीची जागृती 26 मानवजातीची जागृती 27 मानवजातीची जागृती 28 मानवजातीची जागृती 29 मानवजातीची जागृती 30 मानवजातीची जागृती 31 मानवजातीची जागृती 32 मानवजातीची जागृती 33 मानवजातीची जागृती 34 मानवजातीची जागृती 35 मानवजातीची जागृती 36 मानवजातीची जागृती 37 मानवजातीची जागृती 38 मानवजातीची जागृती 39 मानवजातीची जागृती 40 मानवजातीची जागृती 41 मानवजातीची जागृती 42 मानवजातीची जागृती 43 मानवजातीची जागृती 44 मानवजातीची जागृती 45 मानवजातीची जागृती 46 मानवजातीची जागृती 47 खर्‍या संस्कृतीचा प्रारंभ 1 खर्‍या संस्कृतीचा प्रारंभ 2 खर्‍या संस्कृतीचा प्रारंभ 3 खर्‍या संस्कृतीचा प्रारंभ 4 खर्‍या संस्कृतीचा प्रारंभ 5 खर्‍या संस्कृतीचा प्रारंभ 6 खर्‍या संस्कृतीचा प्रारंभ 7 खर्‍या संस्कृतीचा प्रारंभ 8 खर्‍या संस्कृतीचा प्रारंभ 9 खर्‍या संस्कृतीचा प्रारंभ 10 खर्‍या संस्कृतीचा प्रारंभ 11 खर्‍या संस्कृतीचा प्रारंभ 12 खर्‍या संस्कृतीचा प्रारंभ 13 खर्‍या संस्कृतीचा प्रारंभ 14 खर्‍या संस्कृतीचा प्रारंभ 15 खर्‍या संस्कृतीचा प्रारंभ 16 खर्‍या संस्कृतीचा प्रारंभ 17 खर्‍या संस्कृतीचा प्रारंभ 18 खर्‍या संस्कृतीचा प्रारंभ 19 खर्‍या संस्कृतीचा प्रारंभ 20 खर्‍या संस्कृतीचा प्रारंभ 21 खर्‍या संस्कृतीचा प्रारंभ 22 खर्‍या संस्कृतीचा प्रारंभ 23 खर्‍या संस्कृतीचा प्रारंभ 24 खर्‍या संस्कृतीचा प्रारंभ 25 खर्‍या संस्कृतीचा प्रारंभ 26 खर्‍या संस्कृतीचा प्रारंभ 27 खर्‍या संस्कृतीचा प्रारंभ 28 खर्‍या संस्कृतीचा प्रारंभ 29 खर्‍या संस्कृतीचा प्रारंभ 30 खर्‍या संस्कृतीचा प्रारंभ 31 खर्‍या संस्कृतीचा प्रारंभ 32 खर्‍या संस्कृतीचा प्रारंभ 33 खर्‍या संस्कृतीचा प्रारंभ 34 खर्‍या संस्कृतीचा प्रारंभ 35 खर्‍या संस्कृतीचा प्रारंभ 36 खर्‍या संस्कृतीचा प्रारंभ 37 खर्‍या संस्कृतीचा प्रारंभ 38 खर्‍या संस्कृतीचा प्रारंभ 39 खर्‍या संस्कृतीचा प्रारंभ 40 खर्‍या संस्कृतीचा प्रारंभ 41 खर्‍या संस्कृतीचा प्रारंभ 42 खर्‍या संस्कृतीचा प्रारंभ 43 खर्‍या संस्कृतीचा प्रारंभ 44 खर्‍या संस्कृतीचा प्रारंभ 45 खर्‍या संस्कृतीचा प्रारंभ 46 खर्‍या संस्कृतीचा प्रारंभ 47 खर्‍या संस्कृतीचा प्रारंभ 48 खर्‍या संस्कृतीचा प्रारंभ 49 खर्‍या संस्कृतीचा प्रारंभ 50 खर्‍या संस्कृतीचा प्रारंभ 51 खर्‍या संस्कृतीचा प्रारंभ 52 खर्‍या संस्कृतीचा प्रारंभ 53 खर्‍या संस्कृतीचा प्रारंभ 54 खर्‍या संस्कृतीचा प्रारंभ 55 खर्‍या संस्कृतीचा प्रारंभ 56 खर्‍या संस्कृतीचा प्रारंभ 57 खर्‍या संस्कृतीचा प्रारंभ 58 खर्‍या संस्कृतीचा प्रारंभ 59 खर्‍या संस्कृतीचा प्रारंभ 60 खर्‍या संस्कृतीचा प्रारंभ 61 खर्‍या संस्कृतीचा प्रारंभ 62 खर्‍या संस्कृतीचा प्रारंभ 63 खर्‍या संस्कृतीचा प्रारंभ 64 खर्‍या संस्कृतीचा प्रारंभ 65 खर्‍या संस्कृतीचा प्रारंभ 66 खर्‍या संस्कृतीचा प्रारंभ 67 खर्‍या संस्कृतीचा प्रारंभ 68 खर्‍या संस्कृतीचा प्रारंभ 69 खर्‍या संस्कृतीचा प्रारंभ 70