Get it on Google Play
Download on the App Store

सायना नेहवाल.


http://bharatdiscovery.org/bharatkosh/w/images/thumb/1/16/Saina_nehwal_london_olympics_2012_quarterfinals.jpg/300px-Saina_nehwal_london_olympics_2012_quarterfinals.jpg

सायना नेहवाल भारतीय बैडमिंटन खेळाडू आहे. सध्या ती जगातील सर्वोत्तम महिला बैडमिंटनखेळाडू असून पहिली भारतीय महिला आहे जिने हे यश संपादन केले आहे. त्याचप्रमाणे एकाच महिन्यात तीन वेळा प्रथम येणारी एकटी भारतीय महिला खेळाडू आहे. लंडन ऑलिम्पिक २०१२ मध्ये सायनाने इतिहास रचला. एकल बैडमिंटन स्पर्धेत तिने कांस्य पदक पटकावले. बैडमिंटन मध्ये यश मिळवणारी ती पहिली भारतीय महिला आहे. २००८ मध्ये बीजिंग येथे आयोजित ऑलिम्पिक स्पर्धेत ती क्वार्टर फायनल पर्यंत पोचली होती. ती बीडब्ल्यूएफ विश्व कनिष्ठ स्पर्धा जिंकणारी पहिली भारतीय आहे. भारतीय बैडमिंटन लीग मध्ये ती अवध वोरीयर्स तर्फे खेळते.सायना भारत सरकार द्वारा पद्मश्री तसेच सर्वोच्च क्रीडा पुरस्कार असलेला राजीव गांधी खेळ रत्न पुरस्कार सम्मानित केली गेली आहे.