पी॰ टी॰ उषा
पिलावुळ्ळकण्टि तेक्केपरम्पिल् उषा (जन्म २७ जून १९६४), जिला आपण पी. टी. उषा म्हणून ओळखतो, भारताच्या केरळ राज्याची खेळाडू आहे. "भारतीय ट्रैक ऍण्ड फील्डची राणी" मानण्यात येणारी पी. टी. उषा १९७९ पासून भारतीय क्रीडा क्षेत्रात कार्यरत आहे. ती भारताच्या आतापर्यंतच्या सर्वांत महान खेळाडूंपैकी एक आहे. केरळच्या अनेक भागांत परंपरेला अनुसरूनच त्यांच्या नावाच्या आधी परिवार / घराचे नाव असते. तिला "पय्योली एक्स्प्रेस" असे टोपण नाव देण्यात आले. पी. टी. उषाचा जन्म केरळच्या कोजिकोड जिल्ह्याच्या पाय्योली गावात झाला होता. १९७६ मध्ये केरळ राज्य सरकारने महिलांसाठी एक क्रीडा विद्यालय चालू केले आणि उषाला आपल्या राज्याची प्रतिनिधी निवडण्यात आले.