Android app on Google Play

 

अखिल कुमार

 

http://static.hindi.pradesh18.com/pix/2016/02/Boxer-Akhil-Kumar.jpg

अखिल कुमार एक भारतीय मुष्टीयोद्धा आहे ज्याने कित्येक राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पुरस्कार जिंकले आहेत. अखिल कुमारचा जन्म उत्तर प्रदेशच्या फैजाबाद मध्ये झाला होता. तेरा वर्षांच्या वयात त्याने मुष्टियुद्ध करण्यास सुरुवात केली. त्याचा पहिला मुष्टियुद्धाचा सामना हरियाना राज्यात शालेय स्तरावर होता. तो "ओपन गार्डेड" मुष्टियुद्ध शैलीत पारंगत आहे. २००५ मध्ये भारत सरकारने अंतरराष्ट्रीय मुष्टियुद्धातील त्याच्या यशामुळे त्याला अर्जुन पुरस्काराने सन्मानित केले. अर्जुन पुरस्कार हा भारत सरकार तर्फे खेळाडूंना देण्यात येणारा सर्वोच्च सन्मान आहे.