महेश भूपति
महेश भूपती (जन्म ७ जून १९७४) भारताचा एक व्यावसायिक टेनिस खेळाडू आहे. लिएंडर पेस समवेत मिळून त्याने ३ दुहेरी जेतेपदे मिळवले आहेत ज्यामध्ये १९९९ चे विम्बल्डन जेतेपद देखील समाविष्ट आहे. १९९९ हे वर्ष भूपती साठी सुवर्ण वर्ष ठरले कारण याच वर्षी त्याने अमेरिकन ओपन मध्ये मिश्र दुहेरी विजेतेपद जिंकले आणि लिएंडर पेस सोबत रोला गैरा आणि विम्बल्डन समवेत तीन दुहेरी जेतेपदे आपल्या नावे केली. भूपती आणि पेस सर्व ग्रांड स्लेम स्पर्धांच्या अंतिम फेरीत पोचणारी पहिली जोडी बनले होते. सन १९९९ मधेच दोघांना जागतिक क्रमवारीत येणारी पहिली भारतीय जोडी बनण्याचा सन्मान मिळाला. ओपन युगात १९५२ नंतर हा पहिला लाभ होता. अर्थात पुढे भूपती आणि पेस यांच्यात काही मतभेद झाले आणि त्यांनी एकत्र खेळणे बंद केले परंतु २००८ च्या बीजिंग ऑलिम्पिक्स नंतर त्यांनी पुन्हा एकत्र खेळायला सुरुवात केली.