Android app on Google Play

 

मिलखा सिंह

 

http://ichef.bbci.co.uk/news/1024/media/images/76660000/jpg/_76660750_milkha_singh_getty624a.jpg

मिल्खा सिंहचा जन्म लायलपूर इथे ८ ऑक्टोबर १९३५ ला झाला होता. ते एक शीख धावपटू होते ज्यांनी १९६० च्या रोम ऑलिम्पिक्स आणि टोकियो १९६४ ग्रीष्म ऑलिम्पिक्स मध्ये भारताचे प्रतिनिधित्व केले होते. त्यांना "उडता शीख" (The Flying Sikh) असे नाव देण्यात आले होते. ते भारताच्या सर्वोत्कृष्ट खेळाडूंपैकी एक आहेत.
भारत - पाकिस्तान विभाजनाच्या वेळी झालेल्या भीषण संहारात त्यांचे आई - वडील दोघेही काळाने त्यांच्यापासून हिरावून नेले. शेवटी ते शरणार्थी बनून ट्रेन द्वारे पाकिस्तानातून भारतात आले.
असे भयानक बालपण अनुभवल्यानंतर त्यांनी आपल्या आयुष्यात काहीतरी नेत्रदीपक करण्याचे ठरविले. एक उत्कृष्ट धावपटू म्हणून ख्याती मिळवण्या सोबतच त्यांनी २०० मी आणि ४०० मी च्या शर्यती सफलतापूर्वक पूर्ण केल्या आणि भारताचे आतापर्यंतचे सर्वांत यशस्वी धावपटू बनले. काही काळासाठी ते ४०० मी प्रकारात "वर्ल्ड रेकॉर्ड होल्डर" देखील राहिले. कार्डिफ, वेल्स, संयुक्त राष्ट्र इथे १९५८ च्या कॉमनवेल्थ खेळांमध्ये सुवर्णपदक जिंकल्यानंतर शीख असल्या कारणाने लांब केस धारण करून पदक स्वीकारल्यानंतर संपूर्ण क्रीडा विश्व त्यांना ओळखू लागले. याच सुमारास त्यांना पाकिस्तान मध्ये धावण्यासाठी निमंत्रण मिळाले, परंतु बालपणातील घटनांमुळे ते तिथे जाण्यास कचरत होते. परंतु न गेल्यास होणाऱ्या राजनैतिक उलथापालथीच्या भीतीने त्यांना जायला सांगण्यात आले. त्यांनी जाण्याचे निमंत्रण स्वीकारले. शर्यतीत मिल्खा सिंहने सहजपणे आपल्या प्रतिस्पर्ध्यांना मागे टाकले आणि विजयी झाले. बहुतेक सर्व मुसलमान प्रेक्षक इतके प्रभावित झाले की पूर्णपणे बुरख्यात असलेल्या स्त्रियांनी देखील या महान धावपटूला आपल्या समोरून धावत जाताना पाहण्यासाठी चेहेऱ्यावरून बुरखा उतरवला होता, तेव्हापासूनच त्यांना "फ्लायिंग सिख" उपाधी मिळाली. पुढे मिल्खा सिंहने खेळातून निवृत्ती घेतली आणि खेळाच्या प्रोत्साहनासाठी भारत सरकारसोबत काम करण्यास सुरुवात केली. आता ते चंदिगढ इथे राहतात. प्रख्यात चित्रपट निर्माते - दिग्दर्शक आणि लेखक राकेश ओमप्रकाश मेहरा यांनी २०१३ साली मिल्खा सिंह यांच्या जीवनावर आधारित "भाग मिल्खा भाग" नावाचा चित्रपट काढला. हा चित्रपट खूप यशस्वी ठरला. फ्लायिंग सिख या नावाने ओळखले जाणारे मिल्खा सिंह देशात होणाऱ्या विविध प्रकारच्या खेळाच्या आयोजनामध्ये कार्यरत असतात. ३० नोव्हेंबर २०१४ रोजी हैदराबाद इथे झालेल्या १० किलोमीटरच्या जियो मरेथोन २०१४ ला त्यांनी झेंडा दाखवून रवाना केले.