Android app on Google Play

 

दीपिका कुमारी

 

http://img.patrika.com/upload/images/2016/04/28/deepika-kumari-1461825693.jpg

दीपिका कुमारी एक रिकर्व भारतीय महिला तिरंदाज आहे. अगदी प्राथमिक स्तरावरून तिरंदाजीला सुरुवात करणारी ही महिला आज आंतरराष्ट्रीय स्तरावरील उत्कृष्ट खेळाडूंपैकी एक आहे. दीपिका चा जन्म १३ जून १९९४ रोजी झारखंडची राजधानी रांची मधील रातू या ठिकाणी झाला. तिचे वडील एक मजूर आणि रिक्षा चालक आहेत. लहानपणापासूनच दीपिकाने आपल्या उद्दिष्टावर लक्ष केंद्रित केले. अतिशय दरिद्री कुटुंबातील दीपिकाला नुकतेच झारखंड सरकारने रांची शहरात निशुल्क निवासयोग्य भूखंड देण्याची घोषणा केली आहे. सध्या दीपिका टाटा स्टील कंपनीच्या क्रीडा विभागाची प्रबंधक आहे.