हम्पी कोनेरु
हम्पी कोनेरु जन्म 31 मार्च 1987 गुडिवाडा, आन्ध्र प्रदेश एक भारतीय बुद्धिबळातील ग्रैंडमास्टर खेळाडू आहे. जानेवारी २०१० मध्ये तिचा फाईड स्तर २६१४ इतका होता, ज्यामुळे ती जगातील (ज्युडीत पोल्गर नंतर) दुसऱ्या स्थानावरची बुद्धिबळ खेळाडू बनली. २००७ मध्ये तिने सुशान पोल्गर द्वारे स्थापित २५७७ चा स्तर पार केला आणि विश्वातील दुसऱ्या क्रमांकाची खेळाडू असल्याचा गौरव प्राप्त केला. २००७ मध्ये तिला पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.