Get it on Google Play
Download on the App Store

हंसराम पहलवान

http://www.firkee.in/wp-content/uploads/2016/01/the-great-gama-story-of-the-greatest-pehelwan-to-ever-walk-on-indian-soil.jpg

सन १९३२ मध्ये हंसराम पहिलवान यांचा जन्म गुडगाव जवळील झाडसा गावात झाला होता. त्यांचे वडील श्री लेखराम सोनी झाडसा गावातील एक लोकप्रिय सुवर्णकार होते. हन्सराम यांनी गुडगावच्या राजकीय वरिष्ठ माध्यमिक विद्यालयातून १९५० साली पंजाब विश्वविद्यालयातून दहावीची परीक्षा उत्तीर्ण केली. कारण त्या वेळी गावात प्राथमिक शाळा होती. त्यांचे बंधू हरिचंद वर्मा त्या काळातील प्रसिद्ध कबड्डी खेळाडू होते. जेव्हा गावातील एका मुलाने हन्सराम यांची धुलाई केली तेव्हा आपल्या भावाच्या सांगण्यावरून त्यांनी गावातील कृष्ण मंदिर आखाड्यात जायला सुरुवात केली. तिथे बृजलाल गावातील मुलांना कुस्ती शिकवीत असत. १९५० मध्ये भारतीय डाक विभागात त्यांना विदेश विभागात एक रोखपाल या रुपात नोकरी मिळाली. त्याच सुमारास दिल्लीच्या हनुमान आखाड्यात गुरु हनुमानाच्या सान्निध्यात कुस्तीचे डावपेच शिकायला सुरुवात केली. गुरु हनुमान यांनी आपल्या प्रशिक्षणातून नेहमीच देशासाठी उत्तमोत्तम खेळाडू तयार केले आहेत. गुरु हनुमान यांच्या योगदानामुळे भारतीय कुस्तीने नेहमीच आगेकूच केली आहे. गुरु हनुमान यांच्या प्रशिक्षणामुळे त्यांनी भारतीय डाक तार विभागातील सर्व पहिलवानांना आकाश दाखवले. विभागाचे प्रसिद्ध पहिलवान श्री सोहन लाल (पश्चिम बंगाल पहिलवान) ला त्यांनीच पराभूत केले होते. राष्ट्रीय राजधानी क्षेत्रात होणाऱ्या सर्व स्पर्धांमध्ये त्यांनी सर्व पहिलवानांना पराभूत केले. गुडगाव नजीक इस्लामपूर गावात होणाऱ्या कुस्ती दंगलीत ते नेहमीच विजयी राहिले आहेत. ते दिल्लीच्या डाक तार विभागातील सर्वश्रेष्ठ पाहिलवानांमध्ये गणले जातात. ते स्वतः शाकाहारी होते आणि सर्व पहिलवानांना शाकाहारी होण्यासाठी प्रेरणा देत असत. पैलवानीच्या दिवसांमध्ये ते रोज बदाम, देशी तूप आणि दुधाचे सेवन करीत असत. कसरत म्हणून दररोज २००० दंड - बैठका मारत असत. सन १९९४ मध्ये एका ट्रक अपघातात त्यांचा मृत्यू झाला.