Android app on Google Play

 

गीतिका जाखड

 

http://timesofindia.indiatimes.com/thumb/msid-46426750,width-400,resizemode-4/46426750.jpg

गीतिका जाखड (जन्म: १८ ऑगस्ट १९८५) एक भारतीय महिला पहिलवान आहे. तिने २०१४ मध्ये ग्लासगो कॉमनवेल्थ खेळांमध्ये ६३ किलो गटात रौप्य पदक जिंकले आहे. ती ३ वेळा कॅनडाची वर्ल्ड चैम्पियन डी. लोपेझ हिच्याकडून अंतिम सामन्यात पराभूत झाली. गीतीकाला खेळ आणि कुस्ती ही वारसाने मिळाली आहे. तिचे आजोबा अत्तर सिंह जाखड आपल्या काळातील प्रख्यात पहिलवान होते. वडील सत्यवीर सिंह उत्तम एथलीट होते आणि प्रशिक्षक देखील आहेत. हरियाना पोलिसातील डीसीपी हिसार च्या आग्रोह मध्ये जन्मलेली गीतिका जाखड देशातील पहिली अर्जुन पुरस्कार प्राप्त महिला पहिलवान आहे. कॉमनवेल्थ कुस्ती स्पर्धेमध्ये २ वेळा सुवर्ण पदक, आशियाई खेळांमध्ये रौप्य पदक आणि ज्युनिअर वर्ल्ड चैंपियनशिप मध्ये रौप्य पदक जिंकलेली आहे. गीतिका तब्बल ९ वेळा भारत केसरी राहिली आहे.