ध्यानचंद सिंह
मेजर ध्यानचंद सिंह (२९ ऑगस्ट १९०५ - ३ डिसेंबर १९७९) भारतीय फिल्ड हॉकीचे माजी खेळाडू आणि कर्णधार राहिले आहेत. त्यांना भारत आणि विश्वातील हॉकी क्षेत्रात उत्कृष्ट खेळाडूंमध्ये गणले जाते. ते तीन वेळा ऑलिम्पिकचे सुवर्णपदक जिंकणाऱ्या भारतीय हॉकी संघाचे सदस्य राहिले आहेत ज्यामध्ये १९२८ चे एम्सटर्डम ऑलिम्पिक, १९३२ चे लॉस एंजेलिस ऑलिम्पिक आणि १९३६ चे बर्लिन ऑलिम्पिक समाविष्ट आहेत. त्यांचा जन्मदिवस भारतात "राष्ट्रीय क्रीडा दिन" म्हणून साजरा केला जातो.