मैरी कॉम
मैंगते चंग्नेइजैंग मैरी कॉम (एम सी मैरी कॉम) (जन्मः १ मार्च १९८३) जिला मेरी कॉम या नावाने ओळखले जाते, एक भारतीय मुष्टीयोद्धा आहे. ती मुळची मणिपूर येथील निवासी आहे. ती पाच वेळा जागतिक मुष्टियुद्ध स्पर्धेत विजेती राहिली आहे. २०१२ च्या लंडन ऑलिम्पिक्स मध्ये तिने कांस्य पदक जिंकले होते. २०१० च्या आशियाई खेळांमध्ये कांस्य तर २०१४ च्या आशियाई खेळांमध्ये तुने सुवर्णपदक प्राप्त केले. दोन वर्षांच्या अध्ययनाच्या अवकाशानंतर तिने पुनरागमन करताना सलग चौथ्या वेळी विश्व बिगर व्यावसायिक बॉक्सिंग मध्ये सुवर्ण पदक जिंकले. त्यामुळे प्रभावित होऊन एआइबीए ने तिला मॅग्नीफ़िसेन्ट मैरी (प्रतापी मैरी) असे संबोधन दिले. तिच्या जीवनावर एक हिंदी चित्रपट देखील बनला जो २०१४ मध्ये प्रदर्शित झाला. त्यामध्ये प्रियांका चोप्रा हिने मेरी ची भूमिका केली आहे.