Android app on Google Play

 

लिएंडर पेस

 

http://www.navabharat.com/wp-content/uploads/2012/06/Leander-Paes.jpg

लिएंडर पेस (जन्म: 17 जून 1973) भारताचा व्यावसायिक टेनिस खेळाडू आहे जो सध्या दुहेरी आणि मिश्र दुहेरी स्पर्धांमध्ये भाग घेतो. तो भारताच्या सर्वांत यशस्वी खेळाडूंपैकी एक आहे. त्याने अनेक दुहेरी आणि मिश्र दुहेरी स्पर्धा जिंकल्या आहेत. त्याला १९९६ - ९७ मध्ये भारतातील सर्वोच्च क्रीडा पुरस्कार राजीव गांधी खेलरत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात आले तसेच २००१ मध्ये पद्म श्री पुरस्कार प्रदान करण्यात आला. २०१४ मध्ये त्याला पद्म भूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. दुहेरी सामन्यांच्या व्यतिरिक्त त्याने डेव्हीस कप टेनिस स्पर्धेत भारतासाठी अनेक विजय मिळवले आणि १९९६ अटलांटा ऑलिम्पिक्स मध्ये कांस्य पदक जिंकले.