फार्मसी हे प्रोफेशन आहे,बिझनेस नव्हे!
फार्मासिस्ट हा आरोग्य यंत्रणेतील एक महत्वपूर्ण भाग आहे,परंतु भारतात मात्र या प्रोफेशन कडे केवळ बिझनेस या दृष्टिकोनातून पाहिले जाते आणि कुठे तरी यामुळेच आपली ओळख ही केवळ एक औषधविक्रेता,मेडिकलवाला इथपर्यंतच मर्यादित राहिली आहे.
फार्मसी प्रॅक्टिस करत असताना किती फायदा होतो या गोष्टींचा विचार न करता रुग्णांचे आरोग्य हा मुद्दा केंद्रस्थानी ठेवून काम करणं आवश्यक आहे.डॉक्टर आणि रुग्ण यांना जोडणारा एक महत्त्वपूर्ण दुवा म्हणजे फार्मासिस्ट आहे.डॉक्टरांना पुरेसा वेळ नसल्याने ते पुरेसा वेळ देऊ शकत नाहीत,अशा वेळी फार्मासिस्टनी रुग्णांना योग्य व सुरक्षित औषध वापराबाबत रुग्ण समुपदेशन करणे आवश्यक आहे.केवळ डॉक्टरांनी लिहून दिलेली औषधे जशीच्या तशी वितरित करणे आणि बाकीची जबाबदारी डॉक्टरांवर सोडणं असे न करता रुग्ण समुपदेशनाला प्राधान्य द्यायला हवे.
रुग्ण म्हणजे केवक औषध विकण्यासाठीचा एक ग्राहक या दृष्टीने न पाहता रुग्ण हे आपल्यासाठी ईश्वरासमान हे लक्षात ठेवून त्यांचे आरोग्य केंद्रस्थानी ठेवायला हवे.
जोपर्यंत आपण स्वतःला रुग्णांसमोर 'आरोग्य यंत्रणेचा एक महत्वपूर्ण घटक' म्हणून सादर करणार नाही तोपर्यंत फार्मासिस्ट बद्दल आरोग्य यंत्रणेतील इतर घटक डॉक्टर, परिचारिका (नर्स) यांच्याप्रमाणे विश्वासहर्ता निर्माण होणार नाही.
म्हणूनच फार्मासिस्टने स्वतःहून पुढाकार घेत रुग्ण समुपदेशन, औषध माहिती सेवा केंद्र, आरोग्यपूर्ण जीवनासाठी योग्य जीवनशैलीबाबत मार्गदर्शन, आजारांबद्दल माहिती,आजार होऊ नये यासाठी घ्यावयाची काळजी अशी नाविन्यपूर्ण माहिती, वजन,उंची,रक्तदाब(ब्लड प्रेशर),रक्तातील शर्करेचे प्रमाण (ब्लड शुगर टेस्ट) मोजणे तसेच या आजारांपासून दूर राहण्यासाठी मार्गदर्शन व योग्य जीवनशैली याबाबत माहिती देऊन आपण देखील त्यांच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी आरोग्य यंत्रणेचा एक महत्वपूर्ण घटक म्हणून तत्पर आहोत असा विश्वास निर्माण करण्याची आवश्यकता आहे.
हा बदल एका दिवसात अथवा काही महिन्यात होणार नाही तथापि जेंव्हा सर्व फार्मासिस्ट आशा प्रकारे सेवा द्यायला सुरुवात करतील तेंव्हा हे सहज शक्य होईल आणि आता हळूहळू हा बदल दिसून येत आहे.
चला तर मग आपण सगळे एकत्र येत रुग्णांना केंद्रस्थानी ठेवत त्यांच्या आरोग्यासाठी तत्पर राहुयात व आपणही आरोग्य यंत्रणेचा एक महत्वपूर्ण घटक आहोत हे दाखवून देऊयात.
फार्मासिस्ट तुमच्या आरोग्यासाठी...
WE ARE PHARMACIST ALWAYS READY FOR YIUR HEALTH BETTER DRUGS FOR BETTER WORLD!
आशिष अरुण कर्ले.
गेहलोत इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी कोपरखैराने (नवी मुंबई)
ashishkarle101@gmail.com
९७६५२६२९२६