Get it on Google Play
Download on the App Store

एड्स: समज गैरसमज

लोकांमध्ये एड्स विषयी जागरूकता व्हावी १ डिसेंबर हा दिवस संपूर्ण जगभरात जागतिक एड्स दिन म्हणून पाळला जातो ऑगस्ट १९८७ साली जागतिक आरोग्य संघटना जिनेव्हा (स्वित्झर्लंड)   येथील जागतिक कार्यक्रमात ही संकल्पना मांडली व १ डिसेंबर १९८८ पासून याची सुरवात झाली...


आजवर एड्स संदर्भात जागरूकता व्हावी, लोकांना माहिती मिळावी, गैरसमज दूर व्हावे म्हणून शासनामार्फत अनेक उपक्रम राबविले गेले जाहिरात,चित्रपट,पथनाट्य याद्वारे याचे प्रयत्न झाले परंतु आजही या संदर्भात आपल्या समाजात म्हणावी तितकी जागरूकता नाही. मोकळेपणाने या विषयांवर बोलले जात नाही...

या लेखात आपण एड्स आजार,तो होण्याची कारणे, एड्सचे संक्रमण त्याबद्दलचे समज गैरसमज, एड्स वरील औषधउपचार याबद्दल माहिती घेणार आहोत...


एड्स आणि एच आय व्ही तील फरक


एड्स म्हणजे "अक्वायर्ड इम्यूनो डिफिशियेंसी सिंड्रोम" हा रोग एच आय व्ही म्हणजेच ह्युमन इम्युनो डिफिशियेंसी व्हायरस या विषाणूच्या संसर्गाने होतो. एड्स हा आजार आहे जो एच आय व्ही विषाणूच्या संसर्गाने होतो.


एच आय व्ही विषाणूचा संसर्ग...

असुरक्षित लैंगिक संबंध, एच आय व्ही विषाणू बाधित रुग्णांला वरलेल्या सुईचा वापर केल्याने, दूषित रक्त चढवल्याने, एच आय व्ही बाधित रुग्णाला वापरलेले ब्लेड आशा वस्तू वापल्याने याचा संसर्ग होतो. याचशिवाय एच आय व्ही बाधित गरोदर मातेकडून बाळाला  नाळेद्वारे, स्तनपानाद्वारे या मार्गाने एच आय व्ही चा संसर्ग होऊ शकतो.

एच आय व्ही हा विषाणू जास्त काळ शरीराबाहेर वातावरणात राहू शकत नाही त्यामुळे एच आय व्ही बाधित रुग्णांशी बोलल्याने,जेवल्याने, हस्तांदोलन केल्याने एच आय व्ही चे संक्रमण होत नाही व त्यामुळे एड्स होत नाही...

वरती नमूद केल्याप्रमाणे असुरक्षित लैंगिक संबंध, एच आय व्ही बाधित मातेकडून बाळाला (नाळेद्वारे अथवा स्तनपानाद्वारे), एच आय व्ही बाधित व्यक्तीला वापरलेल्या सुई, ब्लेड आशा वस्तूंचा वापर केल्याने, दूषित रक्त चढवल्याने हा आजार एका व्यक्तीकडून दुसऱ्या व्यक्तीला होऊ शकतो...


एच आय व्ही संक्रमण टाळण्यासाठी उपाय...


सुरक्षित लैंगिक संबंध यासाठी लैंगिक संबंध ठेवताना कंडोमचा वापर करणे

मातेकडून बाळाला संक्रमण होऊ नये म्हणून मातेची तपासणी केल्यावर एच आय व्ही ची लागण अढळल्यावर, प्रतिबंधात्मक औषधांचा वापर करणे

प्रत्येक रुग्णाला इंजेक्शन देते वेळी नवीन सुईचा वापर करणे

सलुनमध्ये नवीन ब्लेडचा वापर करणे.

रक्तसंक्रमण करण्यापूर्वी नीट तपासणी करणे.


खरे पाहता एच आय व्ही हा आजार नसून एक शारीरिक स्थिती आहे ज्यामध्ये व्यक्तीच्या शरीरातील नैसर्गिक रोगप्रतिकारक शक्ती कमी होते, आशा व्यक्ती इतर आजारांना लगेच बळी पडतात.

एच आय व्ही ची लागण झाल्याचे पटकन लक्षात येत नाही. त्यामुळे यावर उपचार करेपर्यंत विषणयची झपाट्याने वाढ झालेली असते व नंतर परिस्थिती नियंत्रणाबाहेर जाते.


लक्षणे

तीन आठवडे किंवा त्याहून अधिक काळ खोकला, जुलाब (सतत). तोंडात पांढरे चट्टे व बुरशी शरीरावर फोड/पुरळ, चार आठवड्यापेक्षा जास्त ताप व वजनात घट इ.


तपासणी

या तपासणीत CD4 या पेशींची मोजणी केली जाते शिवाय वेस्ट्न ब्लॉट (Western Blot) पी.सी.आर.टेस्ट या आधुनिक प्रणाली देखील आता उपलब्धता आहेत.

राष्ट्रीय एड्स नियंत्रण संस्था अंतर्गत महाराष्ट्रात शासकीय/ निमशासकीय धर्मादाय इ.मार्फत दवाखान्यात एच.आय.व्ही. चाचणी एकात्मिक सल्ला व चाचणी केंद्र, गुप्तरोग इ.मार्फत समुपदेशन करुन चाचणी केली जाते. ही चाचणी पूर्णपणे मोफत आहे, शिवाय या विषयी गुप्तता पाळण्यात येते.

गरोदरपणात मातेमध्ये एच आय व्ही तपासणी दरम्यान एच आय व्ही ची लागण आढळून आल्यास वेळीच प्रतिबंधात्मक औषधांचा वापर करून मातेकडून बाळाला होणारे संक्रमण टाळता येते.


औषध उपचार

वास्तविकपणे वरती कोणतीही लस अथवा औषध उपचार उपलब्ध नाहीत.

केवळ औषधांचा वापर करून लक्षणांची तीव्रता कमी करून रुग्णाची जीवनमान उंचावणे आयुष्य वाढवणे हाच त्यावरील एक उपाय आहे व एड्स हा पूर्णपणे बरा करण्यासाठी कोणतेही औषध अद्याप उपलब्ध नाही. तथापि एड्स वर वापरली जाणारी औषधे घरून रुग्ण सर्वसामान्य जीवन जगू शकतो.

ही औषधे आर्ट ART (Anti Retro Virus Therapy) या विभागातील असतत, जी विषाणूंची वाढणारी संख्या नियंत्रणात ठेऊन रोगप्रतिकारक शक्ती टिकवून ठेवण्यासाठी मदत करतात...



WE ARE PHARMACIST ALWAYS READY FOR YIUR HEALTH BETTER DRUGS FOR BETTER WORLD!


आशिष अरुण कर्ले.

गेहलोत इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी कोपरखैराने (नवी मुंबई)

९७६५२६२९२६

ashishkarle101@gmail.com 

फार्मासिस्ट तुमच्या आरोग्यासाठी...

आशिष अरुण कर्ले
Chapters
आरोग्यम धनसंपदा कम्युनिटी फार्मसिस्ट हॉस्पिटल फार्मसी प्रिस्क्रिप्शन औषधयोजनेची हाताळणी (हँडलिंग ऑफ प्रिस्क्रिप्शन) औषधे वापरताना घ्यावयाची काळजी औषध वितरण (Dispensing of Medicine) फार्मासिस्टची नैतिक तत्वे (Ethics of Pharmacist) औषधनिर्माणशास्त्र विषयक कायदे आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय (Ministry of Health and Family Welfare) अन्न व औषध प्रशासन महाराष्ट्र राज्य (Food and Drug Administration, Maharashtra State) औषधयोजनेशिवाय (प्रिस्क्रिप्शनशिवाय) घेता येणारी औषधे Over The Counter Drugs (OTC Drugs)* औषध समाप्ती तिथी/तारीख (Expiry Date) डॉक्टरांनी थोडं समजून घ्याव *औषधनिर्माणशास्त्र (फार्मसी) करिअरसाठी एक उत्तम पर्याय...* रुग्णांचे अधिकार फॅमिली फार्मसिस्ट सेल्प मेडिकेशन नार्को चाचणी औषधांचे पॅकिंग रुग्णांची व त्यांच्या नातेवाईकांची कर्तव्ये जेनेरिक औषधे (मेडिसिन) भारतातील आरोग्ययंत्रणा औषधीशास्त्र (फार्माकोलॉजी) अँटिबायोटिक (प्रतिजैविके) फार्मसी अभ्यासक्रमातील विविध विषय बहुऔषधी उपचार पद्धती (Polypharmacy) कट प्रॅक्टिस वैद्यकीय क्षेत्राला लागलेला कलंक... औषधांच्या दुष्परिणामासंदर्भातील तक्रार... जलसंजीवनी जागतिक लोकसंख्या दिन विशेष लेख: का फोल ठरत आहे कुटुंबनियोजन.....? सौंदर्य प्रसाधने (Cosmetics) घरामध्ये औषधांची हाताळणी... भारतात का वाढत आहे सेल्फ मेडिकेशनच प्रमाण...? औषधकोश Pharmacopoeia मधुमेह बरा करण्यासाठी भगवद्गीता लाभदायक... ऑनलाइन फार्मसी: समज गौरसजम रुग्णवाहिका २५ सप्टेंबर जागतिक २५ सप्टेंबर जागतिक फार्मसिस्ट दिन तुमच्या औषधांविषयी अधिक जाणून घ्या तुमच्या फार्मसिस्टना विचारा... औषधनिर्माणशास्त्र (फार्मसी) क्षेत्रातील भारत आणि भविष्यातील माझं योगदान सूज (Inflammation) क्षयरोग (टीबी) वरील औषधउपचार... एड्स: समज गैरसमज कर्करोग (कॅन्सर) घरी औषधे वापरताना... परिशिष्ट: शब्दावली वैज्ञानिक वैद्यकीय/आरोग्यविषयक इंग्रजीशब्दांना पर्यायी मराठी शब्द चित्र दालन मन की बात रक्तपेढी (ब्लड बँक) २५ सप्टेंबर जागतिक फार्मसिस्ट दिन फार्मसिस्ट तुमच्या आरोग्यासाठी जागतिक कर्करोग दिनानिमित्त निम प्रमाण व त्याचे दुष्परिणाम या विषयी जनजागृती करणारा व्हिडिओ पावडर फॉर रिकंस्ट्युट्यूशन (पुनर्रचना औषध पूड/चूर्ण) लग्न जुळवण्यापूर्वी रक्तगट का पहिला जातो....? आय ड्रॉप वापरताना घ्यायची काळजी... गर्भावस्थेत महिलांनी औषधे वापरू नये... जेनेरिक औषधे ब्रँडेड औषधांच्या तुलनेत इतकी स्वस्त का असतात व ती ब्रँडेड औषधांप्रमाणेच परिणामकारक असतात का? फार्मसी हे प्रोफेशन आहे,बिझनेस नव्हे! क्लिनिकल फार्मासिस्ट देश जिंकणार,कोरोना हारणार!