सौंदर्य प्रसाधने (Cosmetics)
सौंदर्य प्रसाधने म्हणजे आशा सर्व वस्तू ज्या मानवी शरीराचे सौंदर्य वाढवण्यास मदत करतात.
यामध्ये त्वचा,केस,दात,नखे इत्यादीसाठी वापरण्यात येणाऱ्या वस्तूंचा समावेश होतो.
या सर्व वस्तू अत्यावश्यक नाहीत परंतु यांचा वापर खास करून सौंदर्यात भर घालण्यासाठी केला जातो.
या सर्व वस्तू कृत्रिम रित्या रासायनिक पदार्थापासून बनवलेल्या, नैसर्गिकरित्या अथवा नैसर्गिक वस्तूवर प्रक्रिया केलेले असू शकतात.
सौंदर्य प्रसाधने ही रासायनिक पदार्थापासून बनवलेले असतात. यांच्या वापराने शरीरावर दुष्परिणामही दिसू शकतात म्हणून औषधनिर्माणशास्त्र (Pharmacy) अभ्यासक्रमात सौंदर्यशास्त्र (Cosmeticology) हा स्वतंत्र विषय असतो.
सौंदर्य प्रसाधने खरेदी करताना औषधयोजनेची (Prescription) आवश्यकता नसते मात्र नुकत्याच झालेल्या शासनाच्या निर्णयानुसार चेहरा गोरा करण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या क्रीम (फेअरनेस क्रीम) खरेदी करण्यासाठी डॉक्टरांचे प्रिस्क्रिप्शन अनिवार्य केले आहे.
प्रतिजैविके आणि स्टिरॉइड्सचा समावेश असलेल्या फेअरनेस क्रीमच्या विक्रीकर सरसकट बंदी घातली आहे.जर फेअरनेस क्रीम तयार करणाऱ्या कंपन्यांनी या नियमांचं पालन केलं नाही तर कंपनीला एफडीएच्या कारवाईला सामोरं जावं लागेल. डेसोनाईड, बेक्लोमेथासोनसह अन्य १४ घटकांचा समावेश असेलेली क्रीम्स डॉक्टरच्या सल्ल्याशिवाय चेहऱ्यावर वापरणे धोकादायक आहे.
सौंदर्य प्रसाधने खरेदी करताना...
अनेक ठिकाणी ब्रँडच्या नावाखाली बनावट वस्तू विकण्याचे प्रकारही आढळून आले आहेत जी रसायने मानवी शरीरासाठी घातलं असतात आशा घटकांचाही यात वापर केलेला असतो याचे मानवी शरीरावर दुष्परिणाम आढळून येतात.
बऱ्याचदा सौंदर्य प्रसाधने खरेदी करताना दूरदर्शनवरील जाहिराती, जाहिरातीतील मॉडेल्स, आकर्षक पॅकिंग,किंमत, ब्रँड या सर्व गोष्टींना भुलून सौंदर्य प्रसाधने खरेदी केली जातात मात्र सौंदर्य सौंदर्य प्रसाधनांमधील घटक याचा विचार केला जात नाही.बऱ्याचदा या सर्व रासायनिक घटकांचा आपल्या शरिरावर दुष्परिणाम पाहायला मिळतो म्हणून सौंदर्य प्रसाधने खरेदी करताना त्यातील घटक या गोष्टीला प्राधान्य देणे आवश्यक आहे...
सौंदर्यप्रसाधने ही औषधयोजनेशिवाय मिळत असली तर त्यातील रासायनिक घटक, त्यांचा शरीरावरील दुष्परिणाम या बाबी लक्षात घेता आपल्या शरीराच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने सौंदर्य प्रसाधने ही डॉक्टर आणि फार्मसिस्ट यांच्या सल्ल्यानेच घ्यावीत...
सौंदर्य प्रसाधनांच्या अतिवापराचे दुष्परिणाम...
सौंदर्य प्रसाधनांमधील अनेक धोकादायक रसायने त्वचेवाटे शोषली जाऊन रक्तात मिसळून संपूर्ण शरीराला हानी पोचवतात. नव्या संशोधनानं हे सिद्ध झालं आहे, की सौंदर्यप्रसाधनांच्या अतिवापरानं नुसते शारीरिक नव्हे तर मानसिक आरोग्यावरही दुष्परिणाम होतात. नैराश्याची भावना मनात येणं किंवा मूडमध्ये चढउतार होणं यासारखे मानसिक बदलही घडून येत आहेत. त्यामुळेत प्रसाधने निवडताना काळजीपूर्वक निवडा व त्यांचा जपून वापर करा. सौंदर्य प्रसाधने ही शक्यतो डॉक्टर आणि फार्मसिस्ट यांच्या सल्ल्यानेच खरीदी करा व सौंदर्य प्रसाधनांच्या वापरामुळे कोणतेही दुष्परिणाम आढळून आल्यास डॉक्टर अथवा फार्मसिस्ट यांच्याशी संपर्क करा.
फार्मासिस्ट तुमच्या आरोग्यासाठी...
WE ARE PHARMACIST ALWAYS READY FOR YIUR HEALTH BETTER DRUGS FOR BETTER WORLD!
आशिष अरुण कर्ले.
गेहलोत इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी कोपरखैराने (नवी मुंबई)
ashishkarle101@gmail.com
९७६५२६२९२६