*औषधनिर्माणशास्त्र (फार्मसी) करिअरसाठी एक उत्तम पर्याय...*
*औषधनिर्माणशास्त्र (फार्मसी) करिअरसाठी एक उत्तम पर्याय...*
फार्मसिस्ट हा आरोग्यविषयक सेवा पुरवणाऱ्या प्रोफेशन पैकी एक महत्वाचा भाग आहे.औषध निर्मिती व वितरण,औषधवापराबाबत रुग्णांना मार्गदर्शन करणे हे फार्मासिस्टचे काम असते. वाढते आजार, औषधसंशोधन क्षेत्रात निर्माण झालेल्या संधी, देशांतर्गत व देशाबाहेर वाढलेली औषधांची मागणी यामुळे या क्षेत्रात अनेक नोकरीच्या संधी व करिअर साठी चांगला पर्याय बनला आहे.
या लेखामध्ये आपण तुम्ही या क्षेत्रात कसे येऊ शकता त्यासाठी कोणती शैक्षणिक पात्रता आवश्यक आहे व इतर अनेक गोष्टींचा आढावा घेणार आहोत.
फार्मसी क्षेत्रात येण्यासाठी तुम्ही दहावी + बारावी विज्ञान शाखा आणि महाराष्ट्र राज्य सामाईक (MH CET) परीक्षा देणं अनिवार्य आहे. बारावीमध्ये PCB (Physic Chemistr Biology), PCM (Physic Chemistry Maths), PCMB (Physics Chemistry Maths Bioloy) यांपैकी कोणताही गृप असलेले विद्यार्थी फार्मसीला प्रवेश घेऊ शकतात यासाठी तुम्ही गृप पात्रता फेरी निकष पूर्ण करणे (Group Qualifier) म्हणजेच ग्रुपच्या प्रत्येक विषयात 50 गुण असणे आवश्यक आहे (हा नियम खुल्या प्रवर्गासाठी आहे इतर प्रवर्गासाठी सवलत आहे) तुम्ही जर आता बारावीत आसल तर तुम्ही दोन्ही विषय Biology आणि Maths ठेवलेला फायदेशीर ठरते हे क्षेत्र पूर्णपणे आरोग्यविषयक आहे त्यामुळे Human anatomy Pathology Biochemistry Pharmacology Microbiology Biotechnology या विषयांच्या दृष्टीने Biology हा विषय महत्वाचा आहे तर दुसऱ्या बाजूला पदवी अभ्यासक्रमात दुसऱ्य वर्षी Math हा विषय असतो त्यामुळे दोन्ही विषय असलेले फायदेशीर ठरते. Maths पेक्षाही Biology विषय जास्त महत्वाचा ठरतो कारण वरती नमूद केल्याप्रमाणे फार्मसीमधिल बरेचसे विषय याच्याशी संबंधित आहेत.
तुम्ही या क्षेत्रात तीन प्रकारे येऊ शकता कोणत्याही प्रकारे या क्षेत्रात येण्यासाठी तुम्हाला वर नमूद केलेली शैक्षणिक पात्रता परम असणे गरजेचे आहे.
पहिला पर्याय म्हणजे तुम्ही बारावी विज्ञान शाखेनंतर डिप्लोमा (D Pharmacy) हा दोन वर्षांचा अभ्यासक्रम पूर्ण करून या क्षेत्रात येऊ शकता. डिप्लोमा नंतर तुम्हाला थेट द्वितीय वर्षात पदवी (B Pharmacy) साठी प्रवेश मिळतो. यासाठी तुम्हाला डिप्लोमाला किमान 50% गुण असणे अनिवार्य आहे.
दुसरा पर्याय म्हणजे तुम्ही बारावी विज्ञान शाखेनंतर पदवी (B Pharmacy) या चार वर्षांच्या अभ्यासक्रमाला प्रवेश घेऊ शकता. B Pharmacy नंतर M Pharmacy, MBA, PhD, Doctorate of Pharmacy (Pharma D) या उच्च शिक्षणाच्या संधी उपलब्ध आहेत.
तिसरा पर्याय म्हणजे बारावी विज्ञान शाखेतनंतर तुम्ही डॉक्टरेट ऑफ फार्मसी (Pharma D) या सहा वर्षांच्या अभ्यासक्रमला प्रवेश घेऊ शकता. जत तुम्ही B Pharmacy ही पदवी पूर्ण केली असेल तर तुम्हाला डॉक्टरेट ऑफ फार्मसी(Pharma D) या अभ्यासक्रमात थेट तृतीय वर्षात प्रवेश मिळू शकतो.
वरती नमूद केलेल्या सर्व अभ्यासक्रमांची प्रवेशप्रक्रिया ही ऑनलाईन पद्धतीने https://www.dtemaharashtra.gov.in या तंत्र शिक्षण संचालनालय, महाराष्ट्र राज्य (Directorate of Technical Education, Maharashtra State) यांच्या अधिकृत संकेतस्थळाद्वारे केली जाते. यासंदर्भात सर्व निकष,अटी,नियम,सूचना या संकेतस्थळावर महितीपुस्तकात उपलब्ध आहे.
*WE ARE PHARMACIST ALWAYS READY FOR YIUR HEALTH BETTER DRUGS FOR BETTER WORLD!*
आशिष अरुण कर्ले.
गेहलोत इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी कोपरखैराने (नवी मुंबई)
९७६५२६२९२६
ashishkarle101@gmail.com