रुग्णांची व त्यांच्या नातेवाईकांची कर्तव्ये
१)यापूर्वी आपण रुग्णांचे कोणकोणते अधिकार आहेत याबद्दल जाणून घेतले. अधिकार आणि कर्तव्ये ही एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. या लेखात आपण रुग्णांची कोणकोणती कर्तव्ये आहेय याविषयी जाणून घेणार आहोत.
रुग्णांवर अन्याय होऊ नये म्हणून त्यांच्यासाठी अधिकार असतात पण अधिकारासोबतच कर्तव्ये देखील महत्वाची असतात.
२)सर्व प्रकारची माहिती घेण्याचा रुग्णांचा अधिकार असला तरी त्यासंदर्भात चौकशी व पाठपुरावा करणे हे रुग्ण व त्यांच्या नातरवाईकांचे कर्तव्य आहे.
३)उपचार चालू असताना सर्व प्रकारे डॉक्टर व आरोग्यसेवा पुरवणाऱ्या यंत्रणांना सहकार्य करणे.
४)डॉक्टर, परिचारिका आणि फार्मसिस्ट यांनी दिलेल्या सूचनांचे पालन करणे.
५)डॉक्टर, फार्मसिस्ट, परिचारिका आणि इतर स्टाफ याच्या कामात अडथळा न आणणे.
६)आजकाल रुग्णांच्या आरोग्याबाबत उपचारादरम्यान काही अघटित घडल्यास कोणतीही शहानिशा न करता थेट डॉक्टर व इतर स्टाफना मारहाण केली जाते, रुग्णालयाची तोडफोड केली जाते असे करणे उचित नाही म्हणून असा अनुचित प्रकार टाळावा.
रुग्णालयाचे नुकसान होईल असा कोणताही प्रकार करू नये.
७)आपल्यामुळे इतर रुग्णांना त्रास होईल अशी वागणूक असू नये.
८)रुग्णालयात स्वछता व शांतता राखणे.
९)रुग्णांच्या अधिकारांची पायमल्ली होत असेल तर त्यासंदर्भात तक्रार करणे व न्याय मिळवणे.
फार्मासिस्ट तुमच्या आरोग्यासाठी...
WE ARE PHARMACIST ALWAYS READY FOR YIUR HEALTH BETTER DRUGS FOR BETTER WORLD!
आशिष अरुण कर्ले.
गेहलोत इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी कोपरखैराने (नवी मुंबई)
ashishkarle101@gmail.com
९७६५२६२९२६