सूज (Inflammation)
शरीराच्या एखाद्या भागाला जखम झाल्यामुळे किंवा मच्छर चावल्यामुळे अथवा एखाद्या सूक्ष्मजीवांचा संसर्ग झाल्यामुळे शरीराचा तो विशिष्ट भाग लाल होणे, फुगणे त्याची दाह होणे म्हणजेच सूज आहे.
बरेच जण सूज येणे ही एक समस्या समजतात परंतु ती वास्तविकता नाही सूज येणे ही आपल्या शरीराने दिलेली एक जैविक प्रतिक्रिया आहे आपल्या शरीराचे रक्षण करते...
त्यामुळे इथून पुढे कधीही सूज आली तर घाबरून जाऊ नका ही तुमच्या शरीराने तुमच्या सुरक्षिततेसाठी दिलेली जैविक प्रतिक्रिया आहे...
आता पण सूज येण्याची प्रक्रिया कशी घडते हे थोडक्यात पाहणार आहोत...
जेव्हा शरीराच्या एखाद्या भागाला जखम होते अथवा संसर्ग होतो अशा वेळी सर्वप्रथम त्या विशिष्ट भागाकडे रक्तवाहिन्यांमार्फत जाणारा रक्तपुरवठा काही काळासाठी मंद केला जातो त्यानंतर काही काळाने व थोड्या काळाने या भागाकडे होणारा रक्तपुरवठा वाढवला जातो या परिस्थितीत या भागात रक्ताचे प्रमाण वाढते व त्याचसोबत रक्तातील विविध घटक विशेष करून पांढऱ्या रक्तपेशी यांचे प्रमाण वाढते व अनेक जैवरासायनिक अभिक्रिया घडतात ज्यामुळे तेथील भागाचे तापमान वाढते व जे सूक्ष्मजीवांना नष्ट करण्यासाठी मदत करते...
सूज येण्याच्या या प्रक्रियेमध्ये अनेक पेशी वझे व रासायनिक घटकांचा समावेश होतो ज्यामध्ये हिस्टामीन, प्रोस्टाग्लान्डिन, सिरोटोनिन, ब्रेडीकायनिन इत्यादींचा समावेश होतो
यामध्ये ब्रेडीकायनिन मुळे वेदनेची जाणीव होते...
अशाप्रकारे सूज येणे ही आपल्या शरीराने, आपल्या सुरक्षिततेसाठी दिलेली एक अत्यावश्यक जैविक प्रतिक्रिया प्रतिक्रिया आहे...
परंतु कित्येक वेळा एखादी जखम झालेली नसताना देखील शरीराचा एखादा भाग सुजतो यामागे अनेक कारणे असू शकतात अशा परिस्थितीत मात्र डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक असते.
आता आपण पाहुयात की कोण कोणत्या कारणांमुळे सूज येऊ शकते
या आधीच सांगितल्याप्रमाणे जेव्हा एखादी जखम होती किंवा कोणताही संसर्ग होतो अशा वेळी सूज येते
तुम्हाला जर किडनी अथवा यकृताचे आजार असतील तर अशा परिस्थितीतही शरीराच्या विविध भागावर सूज येऊ शकते
जेव्हा शरीरात गरजेपेक्षा अधिक प्रमाणात पाणी गोळा होते अशा वेळी ही सूज येऊ शकते.
असंतुलित आहार जास्त खारट पदार्थ खाणे यामुळे ही सूज येऊ शकते.
अनेकदा एकाच ठिकाणी बराच वेळ उभे राहिले आणि ही सूज येऊ शकते
गर्भावस्थेतही महिलांच्या हातापायांना सूज जाणवते.
मासिक पाळी दरम्यान शरीरातील संप्रेरकांचे प्रमाण कमीअधिक झाल्यामुळेही शरीरावर सूज येते
संधिवात, दमा,मधुमेह हृदयविकार यासारख्या आजारांमध्येही सूज येते
स्टिरॉइडच्या नियमित वापरामुळे ही सूज येते.
अतिवार्धक्यमुळे शरीरातील विविध घटकांचे प्रमाण कमी झाल्यामुळे ही सूज येते.
सुजेवर उपचार करण्यापूर्वी ती कोणत्या कारणामुळे झाली आहे हे जाणून घेणं गरजेचं आहे व त्यानंतरच डॉक्टरांच्या सल्ल्याने त्यावर उपचार करावा तसेच कोणत्या या औषधाचा वापर करण्यापूर्वी फार्मसिस्ट डॉक्टर यांचे योग्य ते मार्गदर्शन घेणे आवश्यक आहे.
फार्मासिस्ट तुमच्या आरोग्यासाठी...
WE ARE PHARMACIST ALWAYS READY FOR YIUR HEALTH BETTER DRUGS FOR BETTER WORLD!
आशिष अरुण कर्ले.
गेहलोत इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी कोपरखैराने (नवी मुंबई)
ashishkarle101@gmail.com
९७६५२६२९२६