तुमच्या औषधांविषयी अधिक जाणून घ्या तुमच्या फार्मसिस्टना विचारा...
फार्मसिस्ट हा आरोग्य यंत्रणेतील एक महत्वपूर्ण घटक आहे,
केवळ डॉक्टरांनी दिलेल्या औषध योजनेनुसार औषध वितरण करण्यापर्यंत त्याची भूमिका मर्यादित नुसून त्याच्याकडून तुम्ही अनेक आरोग्यविषयक सेवा प्राप्त करून घेऊ शकता...
१)औषध माहिती केंद्र:
फार्मसी (औषधालय) हे केवळ औषध मिळणारे ठिकाण नसून ते एक औषध माहिती केंद्र देखील आहे. तुम्ही तुमच्या फार्मसिस्ट ना विचारून तुमच्या औषधांबद्दल अधिक माहीती जाणून घेऊ शकता शिवाय एखाद्या औषधाच्या वापराने काही दुष्परिणाम (साईड इफेक्ट) जाणवले असतील तर त्याबाबत बोलू शकता व दुष्परिणामाची शास्त्रीय कारणे व योग्य औषध वापराबाबत तज्ञ मार्गदर्शन प्राप्त करू शकता.
२)औषधयोजनेशिवाय मिळणारी औषधे (ओ टी सी ड्रग्स) निवडीसाठी मदत:
ओ टी सी ड्रग्स रुग्ण कोणत्याही औषधयोजनेशिवाय स्वतःहून खरेदी करू शकतात पण तुम्ही तुमच्या फार्मसिस्टशी संवाद साधून योग्य ओ टी सी औषध निवडू शकता.
३)वैद्यकीय सल्ला:
तुमच्या आरोग्यविषयक समस्यांबाबत तुम्ही तुमच्या फार्मसिस्टशी बोलू शकता व योग्य आरोग्यविषयक सल्ला व पुढील उपचाराबाबत मार्गदर्शन प्राप्त करू शकता.
४)प्रथमोपचार सुविधा
डॉक्टरांच्या अनुपस्थितीत तुम्ही फार्मसिस्ट कडून काही ठराविक प्रथमोपचार घेऊ शकता.
५)योग्य आहार व व्यायाम याबाबत मार्गदर्शन:
औषध सुरू असताना तसेच दैनंदिन जीवनात आरोग्य चांगले राहण्यासाठी तुम्ही तुमच्या फार्मसिस्ट कडून योग्य आहारविषयक मार्गदर्शन प्राप्त करू शकता.
फार्मासिस्ट तुमच्या आरोग्यासाठी...
WE ARE PHARMACIST ALWAYS READY FOR YIUR HEALTH BETTER DRUGS FOR BETTER WORLD!
आशिष अरुण कर्ले.
गेहलोत इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी कोपरखैराने (नवी मुंबई)
ashishkarle101@gmail.com
९७६५२६२९२६