Get it on Google Play
Download on the App Store

औषधयोजनेची हाताळणी (हँडलिंग ऑफ प्रिस्क्रिप्शन)

Rx फार्मासिस्ट तुमच्या आरोग्यासाठी... भाग ५

औषधयोजनेची हाताळणी हा व्यावसायिक दृष्टीने फार्मासिस्ट, रुग्ण आणि डॉक्टर यांच्या नात्यातील एक महत्वाचा भाग आहे.औषधयोजनेची हाताळणी ही पूर्णपणे फार्मासिस्टची जबाबदारी असते. हँडलिंग ऑफ प्रिस्क्रिप्शन हे त्याच्या मुख्य कामांपैकी एक आहे.

औषधयोजनेची हाताळणी ही कला आणि विज्ञान यांचा सुरेख संगम आहे, हे पूर्णपणे फार्मासिस्टच्या कौशल्यांवर अवलंबून असते.

औषधयोजना प्राप्त करताना रुग्णाचे हसतमुखाने स्वागत करणे, त्याच्याशी मैत्रीपूर्ण नाते निर्माण करणे व आपण त्यांच्या आरोग्यासाठी सदैव तत्पर आहोत याची जाणीव करून देणे याही गोष्टी औषधयोजनेच्या हाताळणीमध्ये महत्वपूर्ण आसतात.

औषधयोजनेची हाताळणी करत असताना असे कोणतेही हावभाव चेहऱ्यावर आणू नयेत जेणेकरून रुग्णाच्या मनात आजर अथवा उपचार याविषयी शंका,भिती निर्माण होईल.

औषधयोजनेमध्ये काही त्रुटी आढळल्यास त्यासंदर्भात डॉक्टरांशी चर्चा करून बदल सुचवावेत. रुग्णासमोर असे कोणतेही वक्तव्य करू नये जेणेकरून डॉक्टरांच्या व्यावसायिक कार्यप्रणालीवर आक्षेप होईल व त्यांच्या व्यवसायावर गदा येईल.
तसेच कोणत्याही औषध कंपनी तसेच डॉक्टरांची प्रत्यक्ष तसेच अप्रत्यक्ष पद्धतीने जाहिरात करू नये.

रुग्णाचे वय, लिंग, वजन यानुसार डोस बदलत असल्याने डोस कॅलक्युलेट करणे महत्वाचे असते.

आज सर्व औषधे ही कंपनीमध्ये पूर्वीपासूनच बनवली असल्याने औषधयोजना हाताळणी मधील औषधनिर्मिती हा भाग दिसून येत नाही. काही विशिष्ट औषधे जी बनवल्या बनवल्या वापरावी लागतात (freshly prepared) अशी औषधेच फक्त बनवावी लागतात.

औषध निर्मितीसाठी योग्य पद्धतीचाच वापर करणे गरजेचे असते. रुग्णांच्या आरोग्याच्या दृष्टीने हे अत्यंत महत्त्वाचे असते. अशी पद्धत GMP (Good Manufacturing Practice) म्हणून ओळखली जाते.

औषधांचे पॅकिंग आणि लेबलिंग हा औषधयोजनेची हाताळणी यामधील एक महत्वाचा भाग आहे. बाहेरील वातावरणापासून औषधांचे संरक्षण व्हावे,औषधांची वाहतूक सोयीस्कर व्हावी व त्यांचे नुकसान होऊ नये व औषध कार्यकाळ टिकावा व योग्य वैद्यकीय परिणाम यासाठी पॅकिंग महत्वाचे असते तर लेबलिंग ही औषधाची ओळख असते यावर रुग्णाचे नाव, औषधाचे नाव, डोस, औषध वापरासांधर्भात सूचना, औषधनिर्मिती व औषध समाप्ती तारीख (Mfg Date and Expiry Date) यांचा समावेश असतो.

पॅकिंग व लबेलिंग झाल्यानंतर औषधयोजनेची किंमत करावी (Pricing of Prescription)
यामध्ये कमीत कमी वयासायिक आकारणी (मिनिमम प्रोफेशनल चार्ज) असावेत. तसेच यामध्ये जागा भाडे, वीज यांची आकारणी, इन्ग्रेडीएन्ट व कंटेनर यांची किंमत इत्यादी गोष्टींचा समावेश करावा. औषध योजनेची किंमत ही फार्मसिस्ट व रुग्ण दोघांनाही परवडणारी असावी. कमीत कमी नफा व अधिक चांगली वैद्यकीय सेवा पुरवणे हा नियम फार्मासिस्टने लक्षात ठेवावा. आज सर्व औषधे ही पूर्वीपासून बनवलेली असल्याने त्यावर छापील किंमत असते. फार्मासिस्टने अधिकतम विक्री मूल्य (MRP) पेक्षा अधिक किमतीने औषधे विकू नयेत.
योग्य औषध योग्य वेळी योग्य ठिकाणी परवडणाऱ्या किमतीत उपलब्ध करून देणे आणि रुग्णांना चांगली आरोग्य सेवा पुरवणे हे आपले कर्तव्य आहे हे फार्मासिस्टने नेहमी लक्षात ठेवावे.

औषधयोजनेची किंमत (Pricing of Prescription) नंतर औषधाचे वितरण व रुग्ण समुपदेशन करावे व वितरण केलेल्या औषधांची नोंद करावी.

वितरण केलेल्या औषधांची नोंद केल्यानंतर इथेच फार्मसिस्टचे काम संपत नाही तर
रुग्ण इतिहासाची नोंद करणे व औषधांचा रुग्णाच्या शरीरावर होणाऱ्या सकारात्मक तसेच नकारात्मक परिणाम यांचा अभ्यास करणे हीसुद्धा त्याची महत्वपूर्ण कामे आहेत.

सर्वसाधारणपणे औषधयोजनेची हाताळणी करताना पुढील क्रम वापरला जातो

१)औषधयोजना प्राप्त करणे (Receiving of Prescription)
२)औषधयोजनेचे काळजीपूर्वक वाचन करणे (Reading of Prescription)
३)डोस कॅलक्युलेट करणे (Dosage Calculation)
४)औषध निर्मितीसाठी आवश्यक घटक/साहित्य जमा करणे (Collection of Ingredients)
५)औषध बनवणे, पॅकिंग करणे आणि लेबलिंग करणे (Compounding Packing and Labeling)
६)औषधयोजनेची किंमत करणे (Pricing of Prescription)
७)औषधांचे वितरण आणि रुग्ण समुपदेशन करणे (Dispensing of Medicine and patient Counciling)
८)वितरण केलेल्या औषधांची नोंद करणे (Recording of Prescription)
९)रुग्ण इतिहास नोंद करणे तसेच औषधांचा रुग्णाच्या शरीरावर होणाऱ्या सकारात्मक तसेच नकारात्मक परिणाम यांचा अभ्यास करणे.

आशिष अरुण कर्ले.
गेहलोत इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी कोपरखैरणे (नवी मुंबई)
९७६५२६२९२६
ashishkarle101@gmail.com

फार्मासिस्ट तुमच्या आरोग्यासाठी...

आशिष अरुण कर्ले
Chapters
आरोग्यम धनसंपदा कम्युनिटी फार्मसिस्ट हॉस्पिटल फार्मसी प्रिस्क्रिप्शन औषधयोजनेची हाताळणी (हँडलिंग ऑफ प्रिस्क्रिप्शन) औषधे वापरताना घ्यावयाची काळजी औषध वितरण (Dispensing of Medicine) फार्मासिस्टची नैतिक तत्वे (Ethics of Pharmacist) औषधनिर्माणशास्त्र विषयक कायदे आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय (Ministry of Health and Family Welfare) अन्न व औषध प्रशासन महाराष्ट्र राज्य (Food and Drug Administration, Maharashtra State) औषधयोजनेशिवाय (प्रिस्क्रिप्शनशिवाय) घेता येणारी औषधे Over The Counter Drugs (OTC Drugs)* औषध समाप्ती तिथी/तारीख (Expiry Date) डॉक्टरांनी थोडं समजून घ्याव *औषधनिर्माणशास्त्र (फार्मसी) करिअरसाठी एक उत्तम पर्याय...* रुग्णांचे अधिकार फॅमिली फार्मसिस्ट सेल्प मेडिकेशन नार्को चाचणी औषधांचे पॅकिंग रुग्णांची व त्यांच्या नातेवाईकांची कर्तव्ये जेनेरिक औषधे (मेडिसिन) भारतातील आरोग्ययंत्रणा औषधीशास्त्र (फार्माकोलॉजी) अँटिबायोटिक (प्रतिजैविके) फार्मसी अभ्यासक्रमातील विविध विषय बहुऔषधी उपचार पद्धती (Polypharmacy) कट प्रॅक्टिस वैद्यकीय क्षेत्राला लागलेला कलंक... औषधांच्या दुष्परिणामासंदर्भातील तक्रार... जलसंजीवनी जागतिक लोकसंख्या दिन विशेष लेख: का फोल ठरत आहे कुटुंबनियोजन.....? सौंदर्य प्रसाधने (Cosmetics) घरामध्ये औषधांची हाताळणी... भारतात का वाढत आहे सेल्फ मेडिकेशनच प्रमाण...? औषधकोश Pharmacopoeia मधुमेह बरा करण्यासाठी भगवद्गीता लाभदायक... ऑनलाइन फार्मसी: समज गौरसजम रुग्णवाहिका २५ सप्टेंबर जागतिक २५ सप्टेंबर जागतिक फार्मसिस्ट दिन तुमच्या औषधांविषयी अधिक जाणून घ्या तुमच्या फार्मसिस्टना विचारा... औषधनिर्माणशास्त्र (फार्मसी) क्षेत्रातील भारत आणि भविष्यातील माझं योगदान सूज (Inflammation) क्षयरोग (टीबी) वरील औषधउपचार... एड्स: समज गैरसमज कर्करोग (कॅन्सर) घरी औषधे वापरताना... परिशिष्ट: शब्दावली वैज्ञानिक वैद्यकीय/आरोग्यविषयक इंग्रजीशब्दांना पर्यायी मराठी शब्द चित्र दालन मन की बात रक्तपेढी (ब्लड बँक) २५ सप्टेंबर जागतिक फार्मसिस्ट दिन फार्मसिस्ट तुमच्या आरोग्यासाठी जागतिक कर्करोग दिनानिमित्त निम प्रमाण व त्याचे दुष्परिणाम या विषयी जनजागृती करणारा व्हिडिओ पावडर फॉर रिकंस्ट्युट्यूशन (पुनर्रचना औषध पूड/चूर्ण) लग्न जुळवण्यापूर्वी रक्तगट का पहिला जातो....? आय ड्रॉप वापरताना घ्यायची काळजी... गर्भावस्थेत महिलांनी औषधे वापरू नये... जेनेरिक औषधे ब्रँडेड औषधांच्या तुलनेत इतकी स्वस्त का असतात व ती ब्रँडेड औषधांप्रमाणेच परिणामकारक असतात का? फार्मसी हे प्रोफेशन आहे,बिझनेस नव्हे! क्लिनिकल फार्मासिस्ट देश जिंकणार,कोरोना हारणार!