आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय (Ministry of Health and Family Welfare)
आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय हे भारताच्या केंद्र सरकारच्या मंत्रालयांपैकी एक स्वतंत्र मंत्रालय आहे जे आरोग्यविषयक सेवा,जनजागृती, तसेच विविध योजना राबवून देशातील आरोग्यविषयक सेवांचा दर्जा सुधारून नागरिकांचे आरोग्य टिकवण्यासाठी काम करते.
या मंत्रालयात कॅबिनेट तसेच राज्यमंत्री असतात.
हे मंत्रालय सातत्याने औषधकोश (Pharmacopoeia) प्रकाशित करत असते म्हणूनच सण १९५५ पासून Indian Pharmacopoeia Commission (IPC) हे स्वायत्त मंडळ तायर करण्यात आले आहे.
काय आहे औषधकोश (Pharmacopoeia)?
आधुनिक व्याख्येप्रमाणे वेगवेगळ्या औषधी कशा बनवाव्यात, त्या कशा ओळखाव्यात, व त्याचे संमिश्रन कसे बनवावे याबद्दलचे लिखाण असलेले पुस्तक. यामध्ये औषधाचे प्रमाण त्याची तपशीलवार माहिती नमूद केलेली असते.
मंत्रालयात मुख्य दोन विभाग आहेत एक आरोग्य आणि कुटुंब कल्याण विभाग आणि दुसरा आरोग्य संशोधन विभाग.
आरोग्य विभाग नागरिकांमध्ये आरोग्यविषयक जनजागृती, उपचार,रोगप्रतिबंधक योजना, लसीकरण,औषधे याविषयी हा विभाग काम करतो.
या विभागांतर्गत काम करणाऱ्या विविध समित्या या पुढीलप्रमाणे आहेत.
राष्ट्रीय आरोग्य समिती
राष्ट्रीय आरोग्य समिती कार्यक्रम
१)राष्ट्रीय एड्स नियंत्रण कार्यक्रम
२)राष्ट्रीय कर्करोग नियंत्रण कार्यक्रम
३)राष्ट्रीय जंत नियंत्रण कार्यक्रम
४)राष्ट्रीय आयोडीन कमतरता नियंत्रण
५) जागतिक रोगप्रतिकारक कार्यक्रम
६)राष्ट्रीय तंबाखू व्यसनमुक्ती कार्यक्रम
७)राष्ट्रीय जन्मजात आजार नियंत्रण कार्यक्रम
८)राष्ट्रीय हृदयविकार नियंत्रण कार्यक्रम
९)राष्ट्रीय अंधत्व नियंत्रण कार्यक्रम
१०)राष्ट्रीय बहिरेपणा नियंत्रित कार्यक्रम
११)राष्ट्रीय क्षय रोग नियंत्रण कार्यक्रम
१२)राष्ट्रीय पोलियो नियंत्रण कार्यक्रम
१३)मानसिक आजर नियंत्रण कार्यक्रम
भारतीय आयुर्विज्ञान परिषद (Medical Council of India (MCI)
भारतीय दंत परिषद (Dental Council of India)
भारतीय औषधनिर्माणशास्त्र परिषद (Pharmacy Council of India (PCI)
(या विभागाची सविस्तर माहीती पुढील लेखात पाहू)
भारतीय परिचारिका परिषद (Indian Nursing Council)
अखिल भारतीय मूक बधिर संस्था (All India Institute of Speech and Hearing AIISH)
भारतीय अन्न सुरक्षा आणि मानक प्राधिकरण (Food Safety and Standards Authority of India (FSSAI)
केंद्रीय औषध मानक नियंत्रण संघटना (Central Drugs Standard Control Organization (CDSCO)
कुटुंब कल्याण विभाग - (Department of Family Welfare (FW))
हा विभाग कुटुंब कल्याण,लैंगिक आरोग्य, लहान मुलांचे आरोग्य, कुटुंब नियोजन, जन्मदर याविषयी माहिती, शिक्षण, संवाद तसेच विविध आरोग्यविषयक सेवांशी संबंधित आहे.
आयुष्य मंत्रालय
आयुष हा आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयातील १९५५ साली निर्माण झालेला विभाग जे ९ नोव्हेंबर २०१४ पासून स्वतंत्र मंत्रालय निमार्ण झालेले आहे आयुर्वेद,योग,युनानी,सिद्धा,होमिओपॅथी आणि इतर पर्यायी वैद्यकीय सुविधांशी संबंधित हे मंत्रालय आहे.
We are Pharmacist Always Ready for Your Health Better Drugs for Better World.
आशिष अरुण कर्ले.
गेहलोत इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी कोपरखैरणे (नवी मुंबई)
९७६५२६२९२६
ashishkarle101@gmail.com