Android app on Google Play

 

औषधे वापरताना घ्यावयाची काळजी

 

आधुनिक रासायनिक औषधांचे फायदे आणि तोटे यांची तुलना केली असता यामध्ये तोटे अधिक दिसून येतात परंतु त्यांच्या जलद परिणामामुळे ते आपली विश्वासहर्ता टिकवून आहे.

ही औषधे वापरताना जर योग्य ती काळजी घेतली आणि डॉक्टर तसेच फार्मासिस्टनी दिलेल्या सूचनांचे पालान केल्यास ही औषधे अधिक चांगला आणि सकारात्मक परिणाम देतात.

औषध वापरताना न घेतलेली काळजी यामुळे अनेक गंभीर समस्या निर्माण होतात हे टाळण्यासाठी औषध वापरताना योग्य ती काळजी घेणे गरजेचे असते.

१)औषध वापरताना डॉक्टर तसेच फार्मासिस्टनी दिलेल्या सूचनांचे काटेकोरपणे पालन करावे.
२)औषधे लहान मुले तसेच प्राण्यांपासून दूर ठेवावीत.
३)औषधयोजनेवरील सूचना काळजीपूर्वक वाचाव्यात व त्यांचे तंतोतंत पालन करावे.
४)औषधांच्या पॅकिंगवरील सूचना नीट वाचून त्याची अंमलबजावणी करावी.
५)लक्षणे जरी सारखी आढळली तरी दुसऱ्या रुग्णाची औषधे वापरू नयेत
काही घटनांमध्ये लक्षणे जरी सारखी असली तरी आजार वेगवेगळे असू शकतात शिवाय रुग्णाचे वय, लिंग, वजन तसेच इतर गोष्टी पाहून औषधयोजना बनवलेली असते त्यामुळे औषधांची अदला बदल तसेच एक सारख्या लक्षणांसाठी एकच औषध दोन रुग्णांनी वापरणे टाळावे.
६)आजरी असल्यास डॉक्टरांना भेटून. औषधयोजनेतील सर्व औषधे खरेदी करावीत निम्मी अथवा ठराविकच औषधे घ्यायची व काही नाही असे करू नये. औषधयोजनेनुसारच औषधे घ्यावीत औषधयोजनेशिवाय औषधे खरेदी करू नयेत.
७) OTC Drugs (Over the Counter Drugs) औषधयोजनेशिवाय घेता येणारी औषधे खरेदी करताना फार्मासिस्टचा तज्ञ सल्ला व औषध वापराबाबत मार्गदर्शन घ्यावे.
९)लक्षणे जरी थांबली तरी औषधयोजना मध्येच थांबवू नये. औषधांचा संपूर्ण डोस पूर्ण करावा.
१०)औषध वापरून झाल्यावर झाकण नीट बंद करावे ज्यामुळे बाहेरील वातावरणापासून संरक्षण होते व औषधाचा टिकाऊपणा टिकून राहतो.
११) काही औषधे साठवून ठेवण्यासांधर्भात विशेष सूचना आसतात जसे की उष्णता व प्रकाश यापासून दूर ठेवावे, थंड व कोरड्या वातावरणात ठेवावे, शीतकपाटामध्ये (फ्रिजमध्ये) ठेवावे, अथवा काही औषधे विशिष्ट तापमानात साठवून ठेवायची आसतात यांमध्ये तापमानाची नोंद केलेली असते आशा सूचनांचे योग्य प्रकारे पालन करावे.
१२)औषध वापरानंतर काही समस्या अथवा नकारात्मक परिणाम जाणवल्यास त्यासंदर्भात तात्काळ फार्मासिस्ट व डॉक्टर यांना माहिती द्यावी.
१३)रुग्ण समुपदेशन दरम्यान फार्मासिस्टनी दिलेल्या सूचना योग्य प्रकारे पाळाव्यात.
१४)औषधे ठेवण्यासाठी एक विशिष्ट जागा करावी. औषधर इतरत्र कुठेही जसे टीव्ही फ्रिज आशा ठिकाणी ठेऊ नयेत.
१५)औषधांचा वापर करताना त्यावरील समाप्ती तारीख (expiry date) काळजीपूर्वक तपासावी. समाप्ती तारखेनंतर औषधांचा वापर करू नये, इतर औषधांपासून ही औषधे वेगळी ठेवावीत अथवा नष्ट करावीत.
१६)लहान मुलांनी नेहमी औषधांचा वापर हा पालकांच्या मार्गदर्शनाखालीच करावा.
१७)औषधयोजनेत लिहून दिलेल्या डोसपेक्षा अधिक अथवा कमी डोस घेऊ नये.
१८)प्रतिजैविके (anti biotics) औषधे ही नेहमी डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार औषधयोजना वापरूनच घ्यावी व आशा औषधांचा पूर्ण वापर करावा ही औषधे मध्येच थांबवू नये यामुळे औषध प्रतिरोध (Drug Opposition) सारखी समस्या निर्माण होऊ शकतो, यामध्ये भविष्यात या औषधांचा रुग्णाच्या शरीरावर परिणाम होत नाही.

औषधयोजनेशिवाय औषध वापर तसेच औषधांचा अपूर्ण वापर, यामुळे रुगणांच्या मृत्यूही होऊ शकतो. त्यामुळे औषधे ही नेहमी औषधयोजनेनुसारच घ्यावीत व औषधांचा वापर हा डॉक्टर व फार्मासिस्ट यांच्या मार्गदर्शनानुसारच करावा.

We are Pharmacist Always Ready for Your Health Better Drugs for Better World.

आशिष अरुण कर्ले.
गेहलोत इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी कोपरखैरणे (नवी मुंबई)
९७६५२६२९२६
ashishkarle101@gmail.com
 

फार्मासिस्ट तुमच्या आरोग्यासाठी...

आशिष अरुण कर्ले
Chapters
आरोग्यम धनसंपदा
कम्युनिटी फार्मसिस्ट
हॉस्पिटल फार्मसी
प्रिस्क्रिप्शन
औषधयोजनेची हाताळणी (हँडलिंग ऑफ प्रिस्क्रिप्शन)
औषधे वापरताना घ्यावयाची काळजी
औषध वितरण (Dispensing of Medicine)
फार्मासिस्टची नैतिक तत्वे (Ethics of Pharmacist)
औषधनिर्माणशास्त्र विषयक कायदे
आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय (Ministry of Health and Family Welfare)
अन्न व औषध प्रशासन महाराष्ट्र राज्य (Food and Drug Administration, Maharashtra State)
औषधयोजनेशिवाय (प्रिस्क्रिप्शनशिवाय) घेता येणारी औषधे Over The Counter Drugs (OTC Drugs)*
औषध समाप्ती तिथी/तारीख (Expiry Date)
डॉक्टरांनी थोडं समजून घ्याव
*औषधनिर्माणशास्त्र (फार्मसी) करिअरसाठी एक उत्तम पर्याय...*
रुग्णांचे अधिकार
फॅमिली फार्मसिस्ट
सेल्प मेडिकेशन
नार्को चाचणी
औषधांचे पॅकिंग
रुग्णांची व त्यांच्या नातेवाईकांची कर्तव्ये
जेनेरिक औषधे (मेडिसिन)
भारतातील आरोग्ययंत्रणा
औषधीशास्त्र (फार्माकोलॉजी)
अँटिबायोटिक (प्रतिजैविके)
फार्मसी अभ्यासक्रमातील विविध विषय
बहुऔषधी उपचार पद्धती (Polypharmacy)
कट प्रॅक्टिस वैद्यकीय क्षेत्राला लागलेला कलंक...
औषधांच्या दुष्परिणामासंदर्भातील तक्रार...
जलसंजीवनी
जागतिक लोकसंख्या दिन विशेष लेख: का फोल ठरत आहे कुटुंबनियोजन.....?
सौंदर्य प्रसाधने (Cosmetics)
घरामध्ये औषधांची हाताळणी...
भारतात का वाढत आहे सेल्फ मेडिकेशनच प्रमाण...?
औषधकोश Pharmacopoeia
मधुमेह बरा करण्यासाठी भगवद्गीता लाभदायक...
ऑनलाइन फार्मसी: समज गौरसजम
रुग्णवाहिका
२५ सप्टेंबर जागतिक
२५ सप्टेंबर जागतिक फार्मसिस्ट दिन
तुमच्या औषधांविषयी अधिक जाणून घ्या तुमच्या फार्मसिस्टना विचारा...
औषधनिर्माणशास्त्र (फार्मसी) क्षेत्रातील भारत आणि भविष्यातील माझं योगदान
सूज (Inflammation)
क्षयरोग (टीबी) वरील औषधउपचार...
एड्स: समज गैरसमज
कर्करोग (कॅन्सर)
घरी औषधे वापरताना...
परिशिष्ट: शब्दावली वैज्ञानिक वैद्यकीय/आरोग्यविषयक इंग्रजीशब्दांना पर्यायी मराठी शब्द
चित्र दालन
मन की बात
रक्तपेढी (ब्लड बँक)
२५ सप्टेंबर जागतिक फार्मसिस्ट दिन फार्मसिस्ट तुमच्या आरोग्यासाठी
जागतिक कर्करोग दिनानिमित्त निम प्रमाण व त्याचे दुष्परिणाम या विषयी जनजागृती करणारा व्हिडिओ
पावडर फॉर रिकंस्ट्युट्यूशन (पुनर्रचना औषध पूड/चूर्ण)
लग्न जुळवण्यापूर्वी रक्तगट का पहिला जातो....?
आय ड्रॉप वापरताना घ्यायची काळजी...
गर्भावस्थेत महिलांनी औषधे वापरू नये...
जेनेरिक औषधे ब्रँडेड औषधांच्या तुलनेत इतकी स्वस्त का असतात व ती ब्रँडेड औषधांप्रमाणेच परिणामकारक असतात का?
फार्मसी हे प्रोफेशन आहे,बिझनेस नव्हे!
क्लिनिकल फार्मासिस्ट
देश जिंकणार,कोरोना हारणार!
फार्मासिस्ट म्हणजे केवळ औषधविक्रेता मेडिकलवाला नव्हे! औषध तिथे फार्मासिस्ट हा हवाच!