Android app on Google Play

 

जागतिक लोकसंख्या दिन विशेष लेख: का फोल ठरत आहे कुटुंबनियोजन.....?

 

अंतरंग

१)लोकसंख्या एक संपत्ती आणि लोकसंख्या वाढीचे दुष्परिणाम...

२)भारताची लोकसंख्या

३)लोकसंख्या वाढीची कारणे

४)कुटूंब नियोजन

५)भारतातील कुटुंब नियोजनाची आवश्यकता

६)संततिनियमनाचे फायदे

७)पुरुषांसाठी संततिनियमन उपाय

८)स्त्रियांसाठी संततिनियमन उपाय

९)वैद्यकीय सुविधा, त्याविषयी समज गैरसमज, आरोग्यविषयक समस्या, कुटुंब नियोजनातील डॉक्टर, नर्स आणि फार्मसिस्ट यांची भूमिका

१०)भारतातील स्थिती कुटुंबनियोजन फोल का ठरत आहे


लोकसंख्या एक संपत्ती आणि लोकसंख्या वाढीचे दुष्परिणाम:


ज्याप्रमाणे देशाचा आर्थिक विकास,नैसर्गिक संसाधन ही संपत्ती असते त्याचप्रमाणे देशाची लोकसंख्या म्हणजेच मनुष्यबळ ही देखील एक महत्वपूर्ण संपत्ती आहे. परंतु वाढत्या लोकसंख्येमुळे अनेक समस्या भेडसावतत. वाढत्या लोकसंख्येमुळे नागरी सुविधांवर ताण,लिंगगुणोत्तर अस्थिरता, कुपोषण,भूकबळी,गुलामी, बेरोजगारी,झोपडपट्टी, शेतीचे तुकडीकरण या समस्या निर्माण होत आहेत...

एकूण लोकसंख्येमध्ये जर कार्यरत असलेल्या लोकांची संख्या जास्त आसेल तर अशी लोकसंख्या देशाच्या विकासात महत्वाची ठरते मात्र दुर्दैवाने आपल्या देशात तरुणांना नसणारे रोजगार यामुळे कार्यरत लोकांची संख्या जास्त असूनही बेरोजगारीची समस्या सुटत नाही

त्याचशिवाय सामाजिक रूढी पारंपरा यामुळे कित्येक महिला काम करू शकत नाहीत यामुळे आपल्या देशाची लोकसंख्या ही जास्त असूनदेखील आपला विकासदर मात्र चीनच्या तुलनेत खूपच कमी आहे.


भारताची लोकसंख्या

लोकसंख्येच्या दृष्टीने भारत जगात सध्या दुसर्‍या क्रमांकावर आहे. पहिला क्रमांक अर्थातच चीनचा आहे. सध्याच्या भारतीय लोकसंख्यावाढीचे प्रमाण लक्षात घेता सन २०२५ पर्यंत भारत चीनला मागे टाकून प्रथम क्रमांकावर येऊ शकेल. सध्याच्या जागतिक लोकसंख्येत भारताचा वाटा १७ टक्के आहे; परंतु जगाच्या भूभागांपैकी फक्त २.४ टक्के भूभाग भारताने व्यापला आहे. दरवर्षी भारतीय लोकसंख्येत सुमारे १.८ कोटींची भर पडते. या वेगाने सन २०१५० पर्यंत भारतीय लोकसंख्या १५३ कोटींवर पोहोचेल आणि तेव्हा चीनची लोकसंख्या १३९ कोटी असेल.


लोकसंख्या वाढीची कारणे...


१)स्थलांतर

स्थलांतर हे लोकसंख्या वाढीस एक महत्वाचे कारण आहे जसे खेड्यातून शहराकडे शिक्षण अथवा नोकरीनिमित्त तात्पुरते अथवा कायमस्वरूपी स्थलांतर, सामाजिक परंपरेनुसार लग्नानंतर मुलीचे स्थलांतर, नैसर्गिकरित्या अथवा मानवनिर्मित आपत्ती यामुळे करावे लागणारे स्थलांतर...

परंतू संपूर्ण देशाचा विचार करता देशातील एकूण लोकसंख्येवर स्थलांतराचा तितकासा परिणाम जाणवत नाही कारण हे स्थलांतर जास्त प्रमाणात देशांतर्गत असते त्यामुळे एकूण देशाची लोकसंख्या ही स्थिर राहते


२)कुटूंब नियोजनाचा अभाव:

धार्मिक रूढी परंपरा, काही धर्मांमधील कुटुंबनियोजनाचा अभाव,लैंगिक शिक्षणाचा अभाव,  लोकांचे राहणीमान आशा अनेक गोष्टींमुळे कुटूंब नियोजनात अभाव दिसून येतो सरकार विविध योजना बनवुनही त्या फोल ठरत आहेत.


जगाच्या एकूण लोकसंख्येचा विचार करता असे दिसून येते की एक लोकसंख्येपैकी ८०% लोकसंख्या ही विकसनशील देशात स्थित आहे इतकेच नव्हे तर ही संख्या २०५० पर्यंत ८८% वर जाण्याची शक्यता आहे. विकसनशील देशांचा लोकसंख्या वाढीचा वेग दर १.५ इतका आहे तर दुसऱ्या बाजूला विकसित देशांचा दर हा केवळ ०.५ टक्के इतकाच आहे. यावरून अस दिसून येत की विकसनशील देशात कुटुंबनियोजनाचा अभाव यामुळे ही समस्या भेडसावत आहे. हीच समस्या अविकसित देशात आहे तेथे शिक्षणाचा अभाव, सामाजिक रुढी जसे बहुपत्नीत्व यामुळे लोकसंख्या वाढ दिसत आहे, यापुढेही अविकसित देशात आरोग्य सेवांचा अभाव यामुळे बालमृत्यू, प्रसूती दरम्यान मातेचा मृत्यू या समस्यांमुळे लोकसंख्या वाढीचा दर हा तसा कमीच दिसून येतो पण तेथील या समस्या हा जगातील आरोग्य संघटनेसमोरील मोठा प्रश्न आहे...


जगाच्या लोकसंख्येने आतापर्यंत सातशे कोटींचा टप्पा ओलांडला आहे आणि ती सन २०५० पर्यंत जवळजवळ ९०० कोटींपर्यंत जाऊन ठेपणार आहे. जगाच्या लोकसंख्यावाढीचा आधीचा वेग अतिशय कमी होता, म्हणजे सन १८०४ मध्ये जगाची लोकसंख्या शंभर कोटी होती, ती २०० कोटी होण्यास १२३ वर्षांचा कालावधी जावा लागला. त्यानंतर २०० कोटी लोकसंख्येचे ३०० कोटी होण्यास फक्त ३३ वर्षे लागली आणि त्यानंतर ३०० कोटींची ४०० कोटी लोकसंख्या फक्त १४ वर्षांत झाली. सध्याच्या वेगानुसार, सन २०२८ मध्ये ती ८०० कोटी झालेली असेल. मधल्या काळात अधिक असणारा वेग आता मंदावतो आहे, तरीही हळूहळू वाढत जाऊन सर्वसाधारणपणे सन २२०० पर्यंत जागतिक लोकसंख्या एक हजार कोटींवर जाऊन स्थिरावेल, असा अंदाज आहे.


आतापर्यंत या लेखात आपण लोकसंख्येसंदर्भात सांख्यिकी माहिती घेतली आता आपण लोकसंख्या वाढ या समस्येवरील वैद्यकीय उपाय, लोकसंख्या वाढीमुळे निर्माण झालेल्या विविध आरोग्यविषयक समस्या, त्यावरील उपाय, लोकसंख्या वाढीवरील वैद्यकीय उपाय व त्याबाबत समज गैरसमज आशा बाबींचा विचार करणार आहोत खास करून लोकसंख्या वाढ, कुटुंबनियोजन याबाबतीत वैद्यकीय सुविधा पुरवणारे घटक जसे डॉक्टर, नर्स आणि फार्मसिस्ट यांची भूमिका याबाबत माहिती घेणार आहोत...


कुटुंब नियोजन

कुटुंबनियोजन म्हणजे कुटुंब केव्हा वाढवायचे या बद्दलचे संतती नियमनाद्वारे नियोजन होय.


संतती नियमनाचे विविध प्रकार आहेत. ते मुख्यतः दोन प्रकारात विभागले जातात.


उलटवता येणारे- गर्भनिरोधक गोळ्या, तांबी, निरोध, इ.


न उलटवता येणारे- स्त्री नसबंदी शस्त्रक्रिया, पुरुष नसबंदी शस्त्रक्रिया, वैद्यकीय गर्भपात, इ.


भारतातील कुटुंब नियोजनाची आवश्यकता:

भारतीय लोकसंख्येचा विचार केला तर लोकसंख्या स्फोट, वाढती महागाई आणि अपुरी साधनसंपत्ती यामुळे एकत्र कुटुंब पद्धती हळू हळू नाहिशी होत आहे. लहान कुटुंबामध्ये एक किंवा दोन मुलांचा सांभाळ दांपत्य करू शकते. संततिनियमन केल्याने दोन अपत्यामध्ये पुरेसे अंतर ठवणे आणि आर्थिक स्तिति सुधारली म्हणजे इच्छित वेळी मूल होऊ देण्याकडे विवाहित जोडप्यांचा कल वाढतो आहे.


संततिनियमनाचे फायदे:

केल्याने गर्भधारणेची भीति शिल्लक रहात नाही. संततिनियमनाचा सर्वात मोठा फायदा म्हणजे अकारण गर्भपातास तोंड द्यावे लागत नाही. संततिनियमनामुळे दोन मुलामध्ये हवे ते अंतर ठेवून दोन्ही मुलाना स्वतंत्रपणे आपल्या सोयीनुसार वाढण्याची संधी देता येते. स्त्रीच्या आरोग्यास बाधा येत नाही. जगभरात आता नियोजनपूर्वक मूल जन्मास घालण्याचा पुरस्कार सुशिक्षित स्त्रियामध्ये केला जात आहे. भारतातील प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये निरोगी आणि पुरेशा अंतराने मूल जन्मास घालण्यासाठी दांपत्याना कुटुंबनियोजन सल्ला आणि साधने मोफत उपलब्ध करून दिली जातात. प्रौढ जोडप्यामध्ये सुरक्षित शरीरसंबंध,पत्नीवर मातृत्व न लादणे व लैंगिक रोगापासून बचाव ही कुटुंबनियोजनाची त्रिसूत्री आहे.


संततिनियमन हे जोडप्यामधील कोणत्याही एकाने पुरेशी काळजी घेतली तरी साध्य होणारी गोष्ट आहे.


पुरुषासाठी संततिनियमन उपाय

ब्रम्हचर्य, निरोध, शुक्रवाहिनीची शस्त्रक्रिया, शरीरसंबंध खंडित करणे व शुक्राणू निरोधक जेली किंवा क्रीम वापरणे यांचा पुरुष संततिनियमन उपायात समावेश होतो. भारतीय पद्धतीमध्ये विवाहपूर्व काळात ब्रम्हचर्याची पुरस्कार केलेला आहे. पण विवाहोत्तर ब्रम्हचर्य पाळणे हे प्रत्येकाच्या मानसिकतेवर अवलंबून आहे. त्याऐवजी आधुनिक काळात नैसर्गिक (लॅटेक्स)रबरापासून बनवलेले निरोध हे प्रभावी संततिनियमनाचे साधन प्रचारात आहे. शरीरसंबंधाआधी उत्थापित शिस्नावर निरोध उलगडून बसवावे लागते. निरोधच्या पुढील बाजूस असलेल्या एका लहान फुग्यासारख्या पोकळीत वीर्य साठते.वीर्यातील शुक्राणूंचा अंडपेशीशी संपर्क येत नाही त्यामुळे फलन/निषेचन होत नाही. शरीरसंबंधानंतर निरोध काढताना वीर्य स्त्री जननेंद्रियामध्ये न पडण्याची काळजी घ्यावी लागते. शरीरसंबंध चालू असता अपघाताने निरोध फाटले तर संततिनियमनासाठी इतर पद्धत त्वरित वापरावी म्हणजे गर्भधारणा टळते.


निरोध वापरताना शुक्राणू प्रतिबंधक जेली किंवा क्रीम वापरले तर अपघाताने निरोध फाटून होणाऱ्या गर्भधारणेचा धोका टळतो. निरोध आणि शुक्राणू प्रतिबंधक जेली एकाच वेळी वापरल्यास 90 ते 98% परिणामकारक ठरते. प्रत्येक वेळी निरोध वापरताना क्वचित एकदा निरोध न वापरण्याने गर्भधारणेचा धोका मात्र वाढतो. निरोध वापरल्याने कर्करोग होत नाही. सध्या स्त्रियानी वापरता येतील असे निरोध उपलब्ध आहेत.यास फेमिडोम असे म्हणतात. शरीरविक्रय करणा-या स्त्रियाना लैंगिक रोगापासून मुक्त ठेवण्यासाठी हे उपयुक्त साधन आहे.


पुरुषांचे कायमचे संततिनियमन करावयाचे असल्यास रेतोवाहिन्या (व्हास डेफरन्स) शस्त्रक्रियेने बंद करता येते. यास नसबंदी हे प्रचलित नाव आहे. वृषणातून बाहेर येणा-या रेतोवाहिन्या जांघेच्या त्वचेजवळ पृष्ठ्भागाजवळ आलेल्या असतात. दोन्ही वृषणातून आलेल्या रेतोवाहिन्या शस्त्रक्रियेने कापून त्यामध्ये एक सेमी अंतर ठेवून बांधून टाकतात. रेतोवाहिन्यामध्ये शुक्राणू सहा महिन्यापर्यंत निषेचनक्षम रहातात. त्यामुळे नसबंदी झाल्यानंतर सहा महिन्यापर्यंत इतर संततिनियमनाची साधने वापरण्याचा सल्ला दिला जातो. स्त्री नसबंदीपेक्षा पुरुष नसबंदी सोपी आणि परिणामकारक आहे. पुरुष नसबंदीनंतर नेहमीची कामे करण्यास कोणताही अडथळा येत नाही. रुग्णालयात स्थानिक वेदनानाशकाच्या प्रभावाखाली केवळ वीस ते तीस मिनिटात ही शस्त्रक्रिया बहुतेक सर्व ग्रामीण रुग्णालयात केली जाते.


स्त्रियांसाठी संततिनियमन उपाय

शुक्राणू आणि अंड वाहिनीमधील अंड निषेचनासाठी एकत्र न येऊ देणे हा संततिनियमनाचा मुख्य हेतू आहे. गर्भाशयमुखावर बसणा-या डायफ्रॅमचा शोध या गरजेपोटी लागला. नैसर्गिक रबरापासून बनविलेले डायफ्रॅम 50-105 मिमि एवढ्या आकाराचे उपलब्ध आहेत. वैद्यकीय अधिकारी गर्भाशय मुखाच्या आकारावरून योग्य त्या आकाराचा डायफ्रॅम सुचवू शकतो. डायफ़्रॅम गर्भाशयमुखावर बसवावा लागतो. बसवण्याच्या आधी त्यावर शुक्राणू रोधक जेली लावल्यास गर्भ राहण्यापासून अतिरिक्त संरक्षण मिळते. सध्या उपलब्ध असलेल्या संततिनियमनाच्या उपायातील सर्वात स्वस्त उपाय म्हणजे गर्भनिरोधक गोळ्या. या गोळ्यामध्ये प्रोजेस्टेरॉनचे थोडे अधिक प्रमाण असल्याने अंडविमोचन होत नाही. अंडविमोचन झाल्यास गर्भाशयामध्ये रोपण होत नाही. मासिक पाळी व्यवस्थित होते. गोळ्यांचे पाकीट तीस दिवसांचे असते. यामध्ये फक्त बावीस गोळ्या संप्रेरकाच्या असतात. आठ गोळ्या समाधानक (प्लॅसीबो) द्रव्याच्या – ग्लूकोज किंवा लोहाच्या असतात. मासिक पाळीच्या शेवटच्या दिवसापासून तीन आठवडे संप्रेरक असलेली गोळी दररोज ठरावीक वेळी घेण्याचा सल्ला दिला जातो. शेवटच्या आठवड्यात लोहाची गोळी आठवडाभर घ्यायची म्हणजे दररोज गोळी घ्यायची याची आठवण होते. शरीरसंबंध झाला नाही म्हणून गोळी न घेतल्यास गर्भधारणेचा धोका वाढतो.


गोळ्या न घेता दोन मुलांच्यामध्ये अंतर ठेवायचे असल्यास गर्भाशयामध्ये तात्पुरते बसवण्याचे एक शरीरावर परिणाम न होणारे एक साधन बसवता येते. भारतात यास तांबी (कॉपर टी) असे म्हणतात. इंग्रजी टी या आकाराचे हे साधन मासिक पाळीनंतर गर्भाशयमुखातून गर्भाशयामध्ये बसवतात. ‘टी’ आकाराच्या दांडीस 200 मिग्रॅ. तांब्याच्या तारेचे वेटोळे असते. तांबी बसवल्याने गर्भाशयामध्ये बीजांडरोपण होत नाही. आणि गर्भधारणा टळते. याची परिणामकारकता 98% आहे. दुसऱ्या संततिनियमनाच्या साधनाची आवश्यकता नाही. तांबीच्या गर्भाशय बाह्य टोकास एक नायलॉनचा धागा असतो. जोडप्यास मूल व्हावे असे वाटल्यास गर्भाशयाबाहेर असलेला नायलॉनचा धागा ओढून तांबी बाहेर काढता येते. यानंतर परत गर्भधारणा होते. गर्भधारणा खंडित करण्याचा हा सोपा आणि सुरक्षित उपाय आहे. तीन वर्षानंतर तांबी काढून काहीं महिन्यानंतर दुसरी बसवण्याचा सल्ला दिला जातो.


एक किंवा दोन मुले झाल्यानंतर स्त्रीस मूल नको असेल तर अंडवाहिनी बंद करण्याची शस्त्रक्रिया करून घेता येते. पूर्वी यासाठी पोटावर मोठा छेद घ्यावा लागतअसे. आता दुर्बिणीतून एक सेमी छेदामधून अंडवाहिन्या बंद करण्याची शस्त्रक्रिया करून घेता येते.या तंत्राला स्त्री नसबंदी ‘लॅप्रोस्कोपी’ असे म्हणतात. अशा शस्त्रक्रियेनंतर अंड गर्भाशयापर्यंत पोहोचू शकत नाही. इतर संततिनियमनाची साधने वापरावी लागत नाहीत.


जगभर सुरक्षित परिणामकारण,पार्श्व परीणाम नसणारी सुलभ संततिनियमनाची साधने शोधण्यावर सारखे संशोधन होत आहे. शरीरात बसवता येईल आणि पुरुष किंवा स्त्रियाना संततिनियमनासाठी उपयोगी पडतील अशी अंतक्षेपणे किंवा त्वचेखाली बसवता येतील अशी उपकरणे पाश्चिमात्य बाजारात उपलब्ध झालेली आहेत. ती भारतीय उपखंडात प्रचलित नाहीत.


आरोग्यविषयक समस्या

१)कुटुंब नियोजनाच्या अभावामुळे गरोदरपणात आईचा व बाळाचा मृत्यू, कुपोषित बालके आशा अनेक समस्या उपलब्ध होतात

२)योग्य त्या लैंगिक शिक्षणाचा अभाव, कुटुंब नियोजनाचा विषयक माहिती नसणे यामुळे अनेक लैंगिक आजार उद्भवत आहेत

३)बऱ्याचदा कोणतीही माहिती नसताना, डॉक्टरांच्या सल्ल्याविना कुटुंब नियोजन विषयक साधनांचा वापर केल्यानेही समस्या निर्माण होऊ शकतो, तसेच विविध उपायांबाबत असणारे अपूर्ण ज्ञान यामुळेही अनेक समज गैरसमज निर्माण होतात.

म्हणून कुटुंब नियोज विषयक साधनांचा वापर करताना योग्य तो वैद्यकीय सल्ल घेणे आवश्यक आहे. शासकीय रुग्णालयात हा सल्ला मोफत दिला जातो व तुमची माहिती गोपनीय राहते.


डॉक्टर,नर्स आणि फार्मसिस्ट यांची भूमिका...

कुटुंब नियोजन अथवा यासंदर्भात कुठल्याही प्रकारच्या सामस्येबाबत तुम्ही तुमचे फॅमिली डॉक्टर तसेच नर्स अथवा फार्मसिस्ट यांच्याकडूनही योग्य तो सल्ला आणि मार्गदर्शन घेऊ शकता ते तुम्हाला योग्य त्या उपचारासाठी योग्य प्रकारे मार्गदर्शन करतील...

आणि वैद्यकीय व्यावसायिक नैतिक तत्वानुसार ही सर्व माहिती गोपनीय ठेवली जाईल.


जेंव्हा लैंगिक शिक्षण हा मुद्दा उपस्थित होतो तेव्हा आपल्या देशात त्याचा केवळ राजकीय, धार्मिक आणि सामाजिक दृष्टीने विचार केला जातो पण वैद्यकीय दृष्टीने हे किती आवश्यक आहे व यामुळे कित्येक समस्या दूर होऊ शकतात याचा विचार केला जात नाही हा मुद्दाही विचारात घेणे गरजेचे आहे. योग्य वेळी शैक्षणिक अभ्यासक्रमात ही याविषयी योग्य ती माहिती दिली जात नाही आणि आपण केवळ वेगळवेगळे दिवस साजरे करतो, विविध कार्यक्रम करतो शासनाद्वारेही विविध उपक्रम, जनजागृती विषयक जाहिराती केल्या जातात मात्र या सर्वांचा तितकासा परिणाम दिसून येत नाही...

यासाठी लोकांचे राहणीमान,शैक्षणिक दर्जा, अर्थही स्थिती योग्य ते व योग्य त्या वयात लैंगिक शिक्षण देणे गरजेचे आहे तरच ही स्थिती सुधारेल.


संदर्भ: vikaspedia, wikipedia.


फार्मासिस्ट तुमच्या आरोग्यासाठी...


WE ARE PHARMACIST ALWAYS READY FOR YIUR HEALTH BETTER DRUGS FOR BETTER WORLD!


आशिष अरुण कर्ले.

गेहलोत इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी कोपरखैराने (नवी मुंबई)

ashishkarle101@gmail.com

९७६५२६२९२६

 

फार्मासिस्ट तुमच्या आरोग्यासाठी...

आशिष अरुण कर्ले
Chapters
आरोग्यम धनसंपदा
कम्युनिटी फार्मसिस्ट
हॉस्पिटल फार्मसी
प्रिस्क्रिप्शन
औषधयोजनेची हाताळणी (हँडलिंग ऑफ प्रिस्क्रिप्शन)
औषधे वापरताना घ्यावयाची काळजी
औषध वितरण (Dispensing of Medicine)
फार्मासिस्टची नैतिक तत्वे (Ethics of Pharmacist)
औषधनिर्माणशास्त्र विषयक कायदे
आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय (Ministry of Health and Family Welfare)
अन्न व औषध प्रशासन महाराष्ट्र राज्य (Food and Drug Administration, Maharashtra State)
औषधयोजनेशिवाय (प्रिस्क्रिप्शनशिवाय) घेता येणारी औषधे Over The Counter Drugs (OTC Drugs)*
औषध समाप्ती तिथी/तारीख (Expiry Date)
डॉक्टरांनी थोडं समजून घ्याव
*औषधनिर्माणशास्त्र (फार्मसी) करिअरसाठी एक उत्तम पर्याय...*
रुग्णांचे अधिकार
फॅमिली फार्मसिस्ट
सेल्प मेडिकेशन
नार्को चाचणी
औषधांचे पॅकिंग
रुग्णांची व त्यांच्या नातेवाईकांची कर्तव्ये
जेनेरिक औषधे (मेडिसिन)
भारतातील आरोग्ययंत्रणा
औषधीशास्त्र (फार्माकोलॉजी)
अँटिबायोटिक (प्रतिजैविके)
फार्मसी अभ्यासक्रमातील विविध विषय
बहुऔषधी उपचार पद्धती (Polypharmacy)
कट प्रॅक्टिस वैद्यकीय क्षेत्राला लागलेला कलंक...
औषधांच्या दुष्परिणामासंदर्भातील तक्रार...
जलसंजीवनी
जागतिक लोकसंख्या दिन विशेष लेख: का फोल ठरत आहे कुटुंबनियोजन.....?
सौंदर्य प्रसाधने (Cosmetics)
घरामध्ये औषधांची हाताळणी...
भारतात का वाढत आहे सेल्फ मेडिकेशनच प्रमाण...?
औषधकोश Pharmacopoeia
मधुमेह बरा करण्यासाठी भगवद्गीता लाभदायक...
ऑनलाइन फार्मसी: समज गौरसजम
रुग्णवाहिका
२५ सप्टेंबर जागतिक
२५ सप्टेंबर जागतिक फार्मसिस्ट दिन
तुमच्या औषधांविषयी अधिक जाणून घ्या तुमच्या फार्मसिस्टना विचारा...
औषधनिर्माणशास्त्र (फार्मसी) क्षेत्रातील भारत आणि भविष्यातील माझं योगदान
सूज (Inflammation)
क्षयरोग (टीबी) वरील औषधउपचार...
एड्स: समज गैरसमज
कर्करोग (कॅन्सर)
घरी औषधे वापरताना...
परिशिष्ट: शब्दावली वैज्ञानिक वैद्यकीय/आरोग्यविषयक इंग्रजीशब्दांना पर्यायी मराठी शब्द
चित्र दालन
मन की बात
रक्तपेढी (ब्लड बँक)
२५ सप्टेंबर जागतिक फार्मसिस्ट दिन फार्मसिस्ट तुमच्या आरोग्यासाठी
जागतिक कर्करोग दिनानिमित्त निम प्रमाण व त्याचे दुष्परिणाम या विषयी जनजागृती करणारा व्हिडिओ
पावडर फॉर रिकंस्ट्युट्यूशन (पुनर्रचना औषध पूड/चूर्ण)
लग्न जुळवण्यापूर्वी रक्तगट का पहिला जातो....?
आय ड्रॉप वापरताना घ्यायची काळजी...
गर्भावस्थेत महिलांनी औषधे वापरू नये...
जेनेरिक औषधे ब्रँडेड औषधांच्या तुलनेत इतकी स्वस्त का असतात व ती ब्रँडेड औषधांप्रमाणेच परिणामकारक असतात का?
फार्मसी हे प्रोफेशन आहे,बिझनेस नव्हे!
क्लिनिकल फार्मासिस्ट
देश जिंकणार,कोरोना हारणार!
फार्मासिस्ट म्हणजे केवळ औषधविक्रेता मेडिकलवाला नव्हे! औषध तिथे फार्मासिस्ट हा हवाच!