Android app on Google Play

 

रक्तपेढी (ब्लड बँक)

 


रक्तदान श्रेष्ठ दान या उक्तीतून रक्तदानाच महत्त्व आपण सर्वांनामहितच आहे...पण हे रक्त व रक्त ज्या ठिकाणी संकलित केले जाते त्यावर विविध प्रक्रिया केली जाते त्या रक्तपेढी आणि रक्तदान त्याचे महात व त्याबद्दल असणारे समज गैरसमज व त्याबद्दलची  वास्तविकता माहिती घेणार आहोत.

रक्त

रक्त हे लाल रंगाचे आपल्या शरीरातील एक प्रकारची प्रवाही उती आहे जी शरीरातील विविध घटक संवहणाचे कार्य करते. 

रक्तातील विविध घटक त्यांचे प्रमाण व कार्य

रक्तातील तांबड्या रक्तपेशी (आर बी सी/ इरिथ्रोसाईट) व त्यातील हिमोग्लोबिन जे प्राणवायू (ऑक्सिजन) शरीरात वाहून नेण्याची काम करते यामुळे रक्ताला तांबडा रंग असतो. हिमोग्लोबिनच्या कमतरतेमुळे ऍनिमिया हा आजार होतो ही स्थिती जास्तकरून स्त्रियांमध्ये आढळते.


रक्तातील आणखी एक महत्त्वाचा घटक म्हणजे पांढऱ्या रक्तपेशी (डब्ल्यू बी सी/ ल्युकोसाईट). पांढऱ्या रक्तपेशी शरिरातील रोगप्रतिकारक शक्तीचे काम करते.


रक्तातील तिसरा आणि महत्त्वाचा घटक म्हणजे प्लेटलेट्स. रक्त गोठण्याच्या प्रक्रियेत याची भूमिका महत्त्वाची असते.


रक्ताभिसरण,रक्तवाहिन्या व रक्तदाब


शरीरात रक्ताभिसरणाचे कार्य हृदय करते. रक्त वाहून नेण्यासाठी रक्तवाहिन्या असतात ज्या दोन प्रकारच्या आहेत धमन्या ज्या शुद्ध रक्ताचे वहन करतात तर शिरा ज्या अशुद्ध रक्ताचे वहन करतात. रक्ताने वाहनादरम्यान रक्तवाहिनीवर टाकलेला दाब म्हणजे रक्तदाब होय. रक्तदाब हा स्पिग्मोमॅनोमीटर या यंत्राद्वारे मोजला जातो व तो दोन प्रकारचा असतो  उच्चतम रक्तदाब (सिस्टोलिक ब्लड प्रेशर) आणि लघुतम रक्तदाब (डायस्टोलिक ब्लड प्रेशर)

सामान्य रक्तदाब हा १२०/८० इतका असतो.


रक्ताच्या विविध तपासणी


रक्तातील विविध घटक मोजण्यासाठी संपूर्ण रक्तघटक मोजणी (कम्प्लीट ब्लड काउंट), जैवरासायनिक घटक मोजण्यासाठी तपासणी, रक्तातील शर्करा मोजण्यासाठी तपासणी आशा अनेक तपासणी चाचण्या केल्या जातात ज्या रोग निदान करण्यासाठी मदत करतात.


रक्तगट


मानवी रक्त गटाचे एकूण चार प्रकार आहेत ए बी एबी आणि ओ रक्तात आर एच घटक उपस्थित असणे किंवा नसणे यावरून परत पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह असे उपप्रकार पाडले आहेत.

ओ रक्तगट हा सर्वदाता आहे तो इतर सर्व रक्तगटांना रक्त देऊ शकतो तर एबी हा रक्तगट इतर सर्व रक्तगटांकडून रक्त घेऊ शकतो इतर रक्तगट हे ओ व त्या रक्तगटाच्या व्यक्तीकडून रक्त घेऊ शकतो, ओ रक्तगट हा फक्त ओ रक्तगटाच्या व्यक्तीकडून रक्त घेऊ शकतो.


रक्तसंक्रमण

अपघात समयी, अथवा शस्त्रक्रियेदरम्यान जेव्हा अतिरक्तस्त्रावामुळे रक्ताची कमतरता असते अशा परिस्थितीत रक्त संक्रमणाद्वारे रक्त पुरवले जाते. रक्तसंक्रमण करण्यापूर्वी रक्तगट तपासले जातात तसेच ज्या व्यक्तीचे रक्त दिले जाते त्या व्यक्तीला एड्स,कावीळ यासारखा कोणता आजार नाही ना याची तपासणी केली जाते. चुकीच्या रक्तगटाचे रक्त दिल्याने रुग्णाचा मृत्यू देखील होऊ शकतो. काही परिस्थितीत जसे की अपघात समयी जर व्यक्तीचा रक्तगट माहीत नसेल तर अशा वेळी त्या सुरक्षततेच्या दृष्टीने ओ निगेटिव्ह रक्तगटाचे रक्त दिले जाते.


रक्तपेढी


रक्तपेढी म्हणजेच ब्लड बँक हे असे ठिकाण आहे जिथे रक्ताचे संकलन व त्यावर प्रक्रिया केली जाते व रक्तावर प्रक्रिया करून इतर उत्पादन पदार्थ बनवले जातात. रक्तपेढीत येऊन रक्तदात्यांनी रक्तदान केलेले रक्त अथवा रक्तदान शिबिरात रक्तदान केलेले रक्त या ठिकाणी आणून संकलित केले जाते व त्यावर प्रक्रिया दरखील केली जाते. रक्तात असलेल्या प्लेटलेट्स या घटनेमुळे रक्त बाहेरील वातावरणात गोठते व हे टाळण्यासाठी रक्तगोठण विरोधी पदार्थ वापरले जातात.

रक्त हे एक औषध मानले जाते. भारतात अन्न आणि औषध प्रशासन रक्तपेढ्यांवर नियंत्रण ठेवते. 


रक्तदान श्रेष्ठदान


भारतातील रक्तदान हे ऐच्छिक पद्धतीचे आहे. अठरा वर्ष वय पूर्ण असणारी व साधारण ४५ हुन अधिक वजन, नाडीचे ठोके ८० ते १०० प्रतिमिनीट, शरीराचे तापमान ३७.५, नियंत्रित रक्तदाब असणारी व्यक्ती जिला कोणताही आजार नाही व हिमोग्लोबिन योग्य प्रमाणात (१२.५ पेक्षा अधिक) आहे अशी व्यक्ती रक्तदान करू शकते. वयाच्या ६५ वर्षापर्यंत व्यक्ती रक्तदान करू शकते. एकदा रक्तदान केल्यानंतर पुढील रक्तदान हे ३ महिन्यानी करता येते.


रक्तदानाचे फायदे


१)रक्तदान केल्‍याचे समाधान मिळते.

२)शरीरात रक्‍तनिर्मितीस चालना मिळते.

३)रक्‍तातील कोलेस्‍टेरॉल कमी होण्‍यास मदत होते.

४)कर्करोग किंवा ह्रदयरोगासारख्‍या आजारांच्‍या धोक्‍याचे प्रमाण कमी होते.

५)रक्ताची तपासणी होते (एच.आय.व्ही., गुप्त रोग, काविळ (ब, क पकारची), मलेरिया)

६)वजन, तापमान, रक्तदाब व नाडी परीक्षण होते.

७)रक्तगट व हिमोग्लोबीनच्या प्रमाणाबाबत माहिती मिळते.

८)बोन मॅरोमध्ये नवीन रक्त तयार करण्याची कार्यक्षमता वाढते.

९)नवीन तयार झालेल्या रक्तपेशी व रक्तरस यामुळे रोग पतिकार शक्ती वाढून शरीरात चैतन्य निर्माण होते.

१०)नियमित रक्तदान केल्याने शरीरातील लोहाचे प्रमाण आवश्यकतेपेक्षा जास्त वाढत नाही. त्यामुळे हृदय, यकृता सारखे अवयव स्वस्थ राहतात.


रक्तदाता कार्ड – स्वेच्छेने रक्तदान करणा-या पत्येक रक्तदात्याला लगेच पमाणपत्र व कार्ड दिले जाते. हया कार्डावर रक्तदात्यास किंवा त्याच्या परिवारापैकी कुणाला रक्ताची गरज असल्यास रक्तपेढीतर्फे एक युनिट रक्त मोफत दिले जाते.

रुग्णाचे प्राण वाचविल्यामुळे आत्मिक समाधान मिळते. तसेच ३ रुग्णांचे प्राणण वाचविल्याचा पण आनंद होतो.


सामाजिक कर्तव्य: ज्या समाजात आपण राहतो त्याचे ऋण फेडायची ही एक संधी रक्तदान आपल्याला मिळवून देते.

समाजाचा एक जबाबदार घटक या नात्याने आपण रक्तदान यज्ञात एक स्वेच्छा रक्तदाता म्हणून सहभागी व्हावे, तसेच आपल्या नातेवाईक व मित्र परिवारालाच प्रवृत्त करावे.


शरीरातील  ५.५ लिटर रक्‍तामधून ३५० ते ४५० मिली रक्‍त एका रक्‍तदानात दान करता येते.  हे रक्‍त २४ तासात भरुन निघते तसेच हिमोग्‍लोबिन व रक्‍तघटक दोन महिन्‍यांत पूर्वपदावर येतात. रक्‍तदान केल्‍याने काही अपाय होईल का अशी अनामिक भिती काहींच्‍या मनात असते. परंतु रक्‍तदानाने तोटा काहीच नसून रक्‍तदानाचे फायदेच अधिक आहेत. कोणत्‍याही  शासनमान्‍य रक्‍तपेढीत व रक्‍तदान शिबिरांत रक्‍तदान करता येते.


फक्त खलील परिस्थितीत तुम्हाला रक्तदानापासून वंचित राहावे लागते


१)मागील ३ दिवसांत कोणतेही प्रतिजैविक (अँटिबायोटिक) औषध घेतले असल्यास.

 २)मागील ३ महिन्यात मलेरिया झाला असल्यास.

३)मागील १ वर्षात विषमज्वर, काविळ किंवा श्वानदंश होवून रेबीजची लस घेतली असल्यास.

४)६ महिन्यापूर्वी आपली मोठी शस्त्रकिया झाली असल्यास.

५)गर्भवती महिला, महिलेला १ वर्षाखालील मूल असल्यास किंवा तिचा ६ महिन्यात गर्भपात झाला असल्यास.


पुढील व्यक्ती या कायमस्वरूपी बाद रक्तदाते आहेत त्यांना कधीही रक्तदान करता येत नाही


कर्करोग, मधुमेह, हृदयरोग, काविळ (ब, क प्रकारची), एड्स, मुत्रिपड रोग, यकृताच्या व्याधी असल्यास.


रक्तदानाबद्दल समज गैरसम व त्याबद्दलची वास्तविकता


रक्तदानामुळे अशक्तपण किंवा चक्कर किंवा त्रास होतो......?


नाही. आपल्या शरीरात ५ ते ६ लिटर रक्त असते त्यातील ३५० मि.ली. रक्त म्हणजे फक्त ५ टक्के रक्त रक्तदानाद्वारे रक्तपेढीच्या वैद्यकीय अधिका-याकडून योग्य तपासणी नंतरच स्विकारले जाते. योग्य वजन, वय, आरोग्य संबंधीचे सर्व पश्न विचारुन व हिमोग्लोबीन, रक्तदाब, नाडी तपासणीनंतरच रक्तदाता रक्तदान करू शकतो व रक्तदानाच्या वेळी किंवा नंतर अशक्तपणा येण्याची शक्यता नसते. रक्तदानानंतर आपण दैनंदिन कार्य नेहमीसारखे करु शकता. रक्तदात्याच्या सामान्य आरोग्यावर कोणताही पतिकूल परिणाम होत नाही.


रक्तदान सुरिक्षत नाही......?


नाही. दान केलेले रक्त केवळ २४ तास ते ७ दिवसात नसíगकरित्या भरून येते. रक्तदानासाठी वापरले जाणारे साहित्य पूर्णपणे र्निजतूक केलेले असते व एकदाच वापरून नष्ट केले जाते. रक्तदान ,प्रकियेत रक्तदात्याची सुरक्षितता काटेकोरपणे पाळली जाते, त्यामुळे कोणतीही इजा अथवा आजार होण्याची संभावना देखील नसते. रक्तदान हे संपूर्णपणे सुरक्षित आहे.


ग्रक्तदानासाठी खूप वेळ लागतो.....?


नाही, रक्तदानासाठी फक्त १० ते १५ मिनिटे लागतात. सर्व तपासण्या रक्तदान, अल्पोपहार या प्रकियांसाठी काही मिनिटे लागतात. पण ही काही मिनिटे एखाद्याचे प्राण वाचवू शकतात.


रक्तदानाच्या वेळेस वेदना होतात....?


नाही, रक्तदान वेदनारहित व आनंददायी आहे. कोणत्याही दडपणाखाली न राहता हसतमुखाने सहज रक्तदान करता येते.

 रक्तपेढीत रुग्णाला विकले जाते.

नाही, राज्य रक्त संक्रमण परिषदेने ठरवून दिलेल्या दरातच रुग्णाला रक्त मिळते. रक्तदात्याच्या रक्ताच्या तपासणीसाठी लागणारा खर्च प्रामुख्याने यात समाविष्ट आहे. रक्तपेढी ना नफा ना तोटा या तत्वावर चालते. आपले फक्त ३५० मिली रक्त आणि १५ मिनिटे, १ ते ३ रुग्णांना जीवनदान देऊ शकतात! अशाप्रकारे १ जानेवारी ते ३१ डिसेंबर दरम्यान नियमित दर तीन महिन्यांनी ऐच्छिक रक्तदान केल्यास किमान १२ रुग्णांचे प्राण वाचविण्याचे महान कार्य आपण करू शकतो.


फार्मासिस्ट तुमच्या आरोग्यासाठी...

WE ARE PHARMACIST ALWAYS READY FOR YIUR HEALTH BETTER DRUGS FOR BETTER WORLD!


आशिष अरुण कर्ले.

गेहलोत इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी कोपरखैराने (नवी मुंबई)

ashishkarle101@gmail.com

९७६५२६२९२६

 

फार्मासिस्ट तुमच्या आरोग्यासाठी...

आशिष अरुण कर्ले
Chapters
आरोग्यम धनसंपदा
कम्युनिटी फार्मसिस्ट
हॉस्पिटल फार्मसी
प्रिस्क्रिप्शन
औषधयोजनेची हाताळणी (हँडलिंग ऑफ प्रिस्क्रिप्शन)
औषधे वापरताना घ्यावयाची काळजी
औषध वितरण (Dispensing of Medicine)
फार्मासिस्टची नैतिक तत्वे (Ethics of Pharmacist)
औषधनिर्माणशास्त्र विषयक कायदे
आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय (Ministry of Health and Family Welfare)
अन्न व औषध प्रशासन महाराष्ट्र राज्य (Food and Drug Administration, Maharashtra State)
औषधयोजनेशिवाय (प्रिस्क्रिप्शनशिवाय) घेता येणारी औषधे Over The Counter Drugs (OTC Drugs)*
औषध समाप्ती तिथी/तारीख (Expiry Date)
डॉक्टरांनी थोडं समजून घ्याव
*औषधनिर्माणशास्त्र (फार्मसी) करिअरसाठी एक उत्तम पर्याय...*
रुग्णांचे अधिकार
फॅमिली फार्मसिस्ट
सेल्प मेडिकेशन
नार्को चाचणी
औषधांचे पॅकिंग
रुग्णांची व त्यांच्या नातेवाईकांची कर्तव्ये
जेनेरिक औषधे (मेडिसिन)
भारतातील आरोग्ययंत्रणा
औषधीशास्त्र (फार्माकोलॉजी)
अँटिबायोटिक (प्रतिजैविके)
फार्मसी अभ्यासक्रमातील विविध विषय
बहुऔषधी उपचार पद्धती (Polypharmacy)
कट प्रॅक्टिस वैद्यकीय क्षेत्राला लागलेला कलंक...
औषधांच्या दुष्परिणामासंदर्भातील तक्रार...
जलसंजीवनी
जागतिक लोकसंख्या दिन विशेष लेख: का फोल ठरत आहे कुटुंबनियोजन.....?
सौंदर्य प्रसाधने (Cosmetics)
घरामध्ये औषधांची हाताळणी...
भारतात का वाढत आहे सेल्फ मेडिकेशनच प्रमाण...?
औषधकोश Pharmacopoeia
मधुमेह बरा करण्यासाठी भगवद्गीता लाभदायक...
ऑनलाइन फार्मसी: समज गौरसजम
रुग्णवाहिका
२५ सप्टेंबर जागतिक
२५ सप्टेंबर जागतिक फार्मसिस्ट दिन
तुमच्या औषधांविषयी अधिक जाणून घ्या तुमच्या फार्मसिस्टना विचारा...
औषधनिर्माणशास्त्र (फार्मसी) क्षेत्रातील भारत आणि भविष्यातील माझं योगदान
सूज (Inflammation)
क्षयरोग (टीबी) वरील औषधउपचार...
एड्स: समज गैरसमज
कर्करोग (कॅन्सर)
घरी औषधे वापरताना...
परिशिष्ट: शब्दावली वैज्ञानिक वैद्यकीय/आरोग्यविषयक इंग्रजीशब्दांना पर्यायी मराठी शब्द
चित्र दालन
मन की बात
रक्तपेढी (ब्लड बँक)
२५ सप्टेंबर जागतिक फार्मसिस्ट दिन फार्मसिस्ट तुमच्या आरोग्यासाठी
जागतिक कर्करोग दिनानिमित्त निम प्रमाण व त्याचे दुष्परिणाम या विषयी जनजागृती करणारा व्हिडिओ
पावडर फॉर रिकंस्ट्युट्यूशन (पुनर्रचना औषध पूड/चूर्ण)
लग्न जुळवण्यापूर्वी रक्तगट का पहिला जातो....?
आय ड्रॉप वापरताना घ्यायची काळजी...
गर्भावस्थेत महिलांनी औषधे वापरू नये...
जेनेरिक औषधे ब्रँडेड औषधांच्या तुलनेत इतकी स्वस्त का असतात व ती ब्रँडेड औषधांप्रमाणेच परिणामकारक असतात का?
फार्मसी हे प्रोफेशन आहे,बिझनेस नव्हे!
क्लिनिकल फार्मासिस्ट
देश जिंकणार,कोरोना हारणार!
फार्मासिस्ट म्हणजे केवळ औषधविक्रेता मेडिकलवाला नव्हे! औषध तिथे फार्मासिस्ट हा हवाच!