Get it on Google Play
Download on the App Store

दुर्दैवी 4

''विकत घेशील का? म्हणे रत्न आहे. घेशील का हे रत्न विकत? करशील का त्या रत्नाची पूजा? का विकत घेऊन पुन्हा तिला चौदावे रत्न दाखवशील? घेतोस विकत?'' त्या मघाच्या माणसाने विचारले.

''परंतु तिचा नवरा तिला विकायला तयार आहे का? जगात का असे कधी कुठे झाले आहे? स्वत:ची बायको आजपर्यंत कुणी विकली नसेल.'' तो मनुष्य म्हणाला.

''जगात कधी न झालेले मी करून दाखवितो. ही माझी बायको मी विकायला काढतो. माझा हा माल घ्यायला कोणी आहे तयार? बोला. आहे कोणाची छाती? दुसर्‍याची बायको विकत घेणारा आहे येथे कोणी वीर?''

ती तरुणी आपल्या पतीजवळ गेली व म्हणाली,'

''काय हे बोलता? चला, आपण येथून जाऊ. मला वाटले की ही साधी खानावळ आहे. येथे चोरून दारू विकीत असतील असे वाटले नाही. चला, मुलगी घेऊन आपण बाहेर जाऊ. झाडाखाली झोपू!'' तिने दीनवाणेपणाने पतीकडे पाहिले. तो उत्तर देईना. तो तेथून निघेना. पाचदहा मिनिटे कोणी बोलले नाही. पुन्हा तो मोठयाने म्हणाला.

''माझा हा जिवंत माल विकायचा आहे. घेतो का कोणी? पंचवीस रुपये किंमत आली तरी पुष्कळ झाली. खरे म्हणजे हिची पैसुध्दा किंमत नाही. उकिरडयावर फेकण्याच्या लायकीची ही आहे. घेतो कोणी विकत? करतो कोणी सौदा?''

''खरेच का तुम्ही मला विकणार?''

''होय, खरेच. नको मला तुझा त्रास. मी मोकळा होईन. घेतो कोणी विकत?''

''चला येथून बाहेर. नका माझा अंत पाहू.''

'चूप, मध्येच बोलू नकोस. विक्रीच्या वस्तूने बोलू नये. गाय का मध्येच बोलते? मुकाटयाने जाते. बोला. घ्या ही बायको.''

'खरेच मी नको तुम्हांला? नेहमी तुम्ही असे बोलता. का माझी ही कुतरओढ?'

''आजचे बोलणे नेहमीप्रमाणे नाही. आजचे गंभीर बोलणे आहे. दारुतील बोलणे आहे. तू माझ्याबरोबर नकोस. तुझी ब्याद मला काढून टाकू दे.''

''मी घेतो विकत पंचवीस रुपयाला. परंतु तुझी बायको तयार आहे का?''

दुर्दैवी

पांडुरंग सदाशिव साने
Chapters
दुर्दैवी 1 दुर्दैवी 2 दुर्दैवी 3 दुर्दैवी 4 दुर्दैवी 5 दुर्दैवी 6 दुर्दैवी 7 दुर्दैवी 8 दुर्दैवी 9 दुर्दैवी 10 दुर्दैवी 11 दुर्दैवी 12 दुर्दैवी 13 दुर्दैवी 14 दुर्दैवी 15 दुर्दैवी 16 दुर्दैवी 17 दुर्दैवी 18 दुर्दैवी 19 दुर्दैवी 20 दुर्दैवी 21 दुर्दैवी 22 दुर्दैवी 23 दुर्दैवी 24 दुर्दैवी 25 दुर्दैवी 26 दुर्दैवी 27 दुर्दैवी 28 दुर्दैवी 29 दुर्दैवी 30 दुर्दैवी 31 दुर्दैवी 32 दुर्दैवी 33 दुर्दैवी 34 दुर्दैवी 35 दुर्दैवी 36 दुर्दैवी 37 दुर्दैवी 38 दुर्दैवी 39 दुर्दैवी 40 दुर्दैवी 41 दुर्दैवी 42 दुर्दैवी 43 दुर्दैवी 44 दुर्दैवी 45 दुर्दैवी 46 दुर्दैवी 47 दुर्दैवी 48 दुर्दैवी 49 दुर्दैवी 50 दुर्दैवी 51 दुर्दैवी 52 दुर्दैवी 53 दुर्दैवी 54 दुर्दैवी 55 दुर्दैवी 56 दुर्दैवी 57 दुर्दैवी 58 दुर्दैवी 59 दुर्दैवी 60 दुर्दैवी 61 दुर्दैवी 62 दुर्दैवी 63 दुर्दैवी 64 दुर्दैवी 65 दुर्दैवी 66 दुर्दैवी 67 दुर्दैवी 68 दुर्दैवी 69 दुर्दैवी 70 दुर्दैवी 71 दुर्दैवी 72 दुर्दैवी 73 दुर्दैवी 74