Get it on Google Play
Download on the App Store

तीन मडकी 6

भिकंभट घरी आले. त्यांना सर्व प्रकार कळला. सावित्रीबाई म्हणाली, 'पुन्हा एकदा बसा ना झाडाखाली त्या रडत. मिळाले एखादे मडके तर बरे झाले. नाही मिळाले तर हे दागदागिने मोडू व पोटाला खाऊ.' 

बायकोचा हा पोक्त सल्ला भिकंभटाने ऐकला. तो पुन्हा निघाला व त्या झाडाखाली रानात रडत बसला. तिकडून शंकर पार्वती जात होती. 'देवा, कोणी तरी रडते आहे, चला आपण पाहू. ' शंकर म्हणाले, 'शेवटचे मडके आज देऊन टाकू. पुन्हा कोणाकडे जायला नको. कोण रडतो पाहायला नको. ती दोघे त्या झाडाजवळ आली तो तोच ब्राम्हण' 

'काय रे ब्राह्मणा, आता काय झाले?' मुलांच्या भांडणात मडके फुटले, मी फुटक्याच नशिबाचा जणू आहे. काय करू महाराज?'

शंकर म्हणाले, 'आता हे शेवटचे मडके देतो. पुन्हा रडत येऊ नकोस. आलास तरी उपयोग नाही.'

भिकंभटाने विचारले, 'या मडक्यातुन काय बाहेर पडते?'

भगवान म्हणाले, 'पाहिजे असेल ते पक्वान हवे असेल तितके बाहेर पडते?'
भिकंभट आनंदाला. नमस्कार करून ते तिसरे मडके घेऊन घरी आला. बायको वाटच
पाहात होती. नवीन मडके पाहून तिलाही आनंद झाला. 

'यातून काय पडते बाहेर?' तिने विचारले.'

'पातेले घेऊन ये. तो म्हणाला'

सवित्रीबाई पातेले घेऊन आल्या. भिकंभटाने मडके हलवून 'श्रीखंड' असे म्हटले. तो काय आश्चर्य! घट्ट सुंदर पिवळे धमक श्रीखंड पडू लागले. मुलाबाळांनी, सर्वांनी पोटभर खाल्ले. 

भिकंभटाने आता हलवायचे दुकान घातले. पेढे, बर्फी, श्रीखंड, बासुंदी, पुरी, जिलबी, लाडू, रसगुल्ले सारे पदार्थ तेथे असत. सारी दुनिया त्याच्याकडून माल घेई. सणवार आला की भिकंभटाच्या दुकानावर गर्दी असायची. भिकंभटाकडे माल मिळतो तसा कोठेही मिळत नाही अशी दुकानाची कीर्ती पसरली. 

त्या गावात धनमल म्हणून एक श्रीमंत मनुष्य होता. तो कारस्थानी होता. युक्तिबाज होता. भिकंभटाकडील या श्रीखंडबासुंदीच्या मडक्याची गोष्ट त्याच्या कानावर आली. भटजीकडील हे मडके लांबविण्याचा त्याने विचार केला. 

एकदा काय झाले, त्याचा जावई आला. बर्‍याच दिवसांनी आलेल्या जावईबोवांस थाटाची मेजवानी द्यावी असे धनमल याला वाटले. सर्व तयारी झाली. धनमल भिकंभटाकडे जाऊन म्हणाला, 'जावयाला पंगत आहे. तुम्ही उत्कृष्ट पक्वाने पुरवाल काय? भिकंभट म्हणाला, 'हो. 'त्यावर पुन्हा धनमल म्हणाला, 'ताजा ताजा माल तेथल्या तेथे मिळावा म्हणून तुम्ही आमच्याकडे या व पक्वानांचा पुरवठा करा. 'भिकंभट म्हणाला, 'एका अटीवर मी तुमच्या घरी येईन. मला स्वतंत्र खोली दिली पाहिजे. खोलीत कोणी येता कामा नये. मी आतून पातेली, पराती भरभरून देत जाईन. 'धनमल म्हणाला, 'ठीक, तशी व्यवस्था करू.'

खरा मित्र

पांडुरंग सदाशिव साने
Chapters
आवडती नावडती 1 आवडती नावडती 2 आवडती नावडती 3 आवडती नावडती 4 आवडती नावडती 5 आवडती नावडती 6 तीन मडकी 1 तीन मडकी 2 तीन मडकी 3 तीन मडकी 4 तीन मडकी 5 तीन मडकी 6 तीन मडकी 7 न्याय देणारा गुराखी 1 न्याय देणारा गुराखी 2 न्याय देणारा गुराखी 3 न्याय देणारा गुराखी 4 न्याय देणारा गुराखी 5 न्याय देणारा गुराखी 6 गोसावी 1 गोसावी 2 गोसावी 3 गोसावी 4 गोसावी 5 गोसावी 6 सोन्याची साखळी 1 सोन्याची साखळी 2 सोन्याची साखळी 3 सोन्याची साखळी 4 सोन्याची साखळी 5 सोन्याची साखळी 6 सोन्याची साखळी 7 सोन्याची साखळी 8 सोन्याची साखळी 9 खरा मित्र 1 खरा मित्र 2 खरा मित्र 3 खरा मित्र 4 खरा मित्र 5 खरा मित्र 6 खरा मित्र 7 खरा मित्र 8 खरा मित्र 9 खरा मित्र 10 खरा मित्र 11 मानवजातीचें बाल्य 16