Android app on Google Play

 

रे दयाघना!!

 

भुईवर माथा
लोचनात पयोधर
आत खोल अंतरात
दुखा:चे सरोवर...

राऊळी निर्मीक
हरवला ह्या गर्दीत
पायरिशी सोशीक
अन गहीवरला एकांत.....

अरे दयाघना
कधी येशील येशील
काळोखाच्या वेशीला
कधी दावशी कंदील....

नको लावू वेळ आता
असे फाटले आभाळ
आता तुच माझा वाली
कर तुच सांभाळ......

रघू व्यवहारे.
दि. 11 ऑक्टोबर 2013
औरंगाबाद