Android app on Google Play

 

माझे घर

 

आम्ही दोघंही फ्लॅटच्या शोधात फिरायचो. जिथे जिथे बांधकाम चालू आहे तिथे तिथे जायचो. दगड वाळू वीटां पाहून आनंदी व्हायचो. अर्धवट काम झालेल्या अपार्टमेंटचा नुसत्या भिंती उभ्या असलेल्या फ्लॅट मध्ये जाऊन ओल्या भिंतींचा आणि बांधकामाचा गंध फुफ्फुसात साठवायचो.

दो दिवाने शहर मे
रात और दो पहर मे
आशियाना ढुंडते है.....

असे आपणही आपल्या आयुष्याच्या फिल्मचे हिरो-हिरोईन आहोत असा भाव मनात जागा व्हायचा. चेह-यावर आनंद थोपून एक दिवस तरी आपलं घर होईल स्वत:चं अशी स्वप्ने रंगवत परत आपल्या अवाक्यात असणारे घरटे शोधायला दुसरीकडे वळायचो.

गॅलरी, हॉल, किचन, बेडरूम सगळ्यांचे चित्र उभे करत असलेल्या सुवीधा आणि बजेट चा ताळमेळ कधी जमेल की नाही अशी एक आंतरीक भिती मनाला पोखरायची.

थोड्या दूरवर जाऊन पुन्हा नवा शोध सुरू!

यहां तेरा मेरा नाम लिखा हो....
ये है दरवाजा, यहां तू खडी है...
अंदर आ जाओ सर्दी बडी है...

असे गाणे गुणगुणत उगीच नसलेल्या खिडक्या दरवाजे मनातल्या मनात उभ्या करून लव स्टोरी चित्रपटातील आपणच नायक अशी फिलींग आतून यायची.

बाहेर बिल्डरच्या ऑफीसात गेलं की न दिसणारी बजेटची भिंत मधे उभी रहायची....

स्वप्न विस्कटू न देता पुन्हा दुस-या दिवशी नव्या उमेदिने घर शोधायला आम्ही दोघंही बाहेर पडायचो.

#माझेघर #रघूव्यवहारे.