Get it on Google Play
Download on the App Store

दिग्दर्शकीय नोट (एकांकिका-जानी दुश्मन, लेखक/दिग्दर्शक :- रघू व्यवहारे)

एकांकिका - जानी दुश्मन
लेखक/ दिग्दर्शक :- रघू व्यवहारे

आजचा काळ.. आजचे प्रश्न... आजची उत्तरे .... मनात द्वंद निर्माण करणारी भावना ... आपआपसातील खुंटलेला संवाद...... संवादातील रुक्षपणा...... फेसबुकसारख्या माध्यमांनी सृजनशील लेखकांना व्यासपीठ दिले हे खरे पण ... वास्तव जीवनातील संवाद आटला ...संवेदनशीलता गोठली ..... पण काही लोक मात्र अजूनही प्रवाहात पतित झालेले नाहीत... त्यांची धडपड ही समाजाला मोठी आशा आहे.... ही जाणीव झाली....  अन त्यातून या एकांकिकेचा जन्म झाला...... अपत्यासारखी अंगाखांद्यावर खेळवत खुलवत गेली...... कोरडी सहानुभुती.... विद्वानांची निष्क्रीयता.... बोलघेवडेपणा..... मध्यमवर्गाची संकुचीत वृत्ती.... असे कितीतरी घटक मनाला कुरतडत होते..... या सगळ्या विचारांचा परिपाक म्हणजे जानी दुश्मन चा जन्म होय!

माझं अपत्य रांगत रांगत तुमच्यासमोर येतंय.... चालेल.... धडपडेल.... परंतु डोळ्यात एक सोनेरी स्वप्न घेउन मुलांचे भावविश्व जोपसणारी कलाकृती .... एका बापाची आगतिकता..... मनाची घालमेल पाहून एखादा जरी बाप आतून हेलावला तरी ही कलाकृती त्या एका आयुष्यापुरती चिरंजीव होणार....

प्रयत्नांना पाठबळ हवंय..... कौतुकाची थाप हवीय.... नसानसातून कला अखंड वाहत रहावी यासाठी प्रोत्साहन हवं.... मोठ्या मनाची हळवी मने आमच्या प्रयत्नांना निश्चीतपणे दाद देतील याबाबत आम्ही नि:शंक आहोत!

एकांकिका - जानी दुश्मन
लेखक/ दिग्दर्शक :- रघू व्यवहारे