Get it on Google Play
Download on the App Store

गोड निबंध-भाग १ 32

कांग्रेसला कोणी दीनवाणा नको, कोणी अरेराव नको. हिंदु, मुसलमान, शेतकरी सावकार, कारखानदार कामगार, स्पृश्यास्पृश्य-सर्वांना सुखानें नांदवावयाची पराकाष्ठा कांग्रेस करीत आहे. स्वराज्य म्हणजे सर्वांचें राज्य. कोणावर जुलूम नाहीं, कोणाचा अपमान नाहीं. उद्यां स्वराज्य मिळाल्यावर हरिजनांना का पुन: कोल्ह्याकुत्र्याप्रमाणें ठेवणार आहांत ? हरिजन म्हणतील 'मग इंग्रज बरा.' हरिजनांना खात्री वाटली पाहिजे कीं आपण स्वराज्यांत माणसांप्रमाणें नांदूं. ते पहा हरिजन जरा दूर बसून ऐकत आहेत. माझें हृदय तडफडत आहे. तुम्ही कुत्र्याला थोपटीत बसाल. मांजरें कुरवाळाल. पेरूची फोड स्वत:च्या तोंडांत धरून पोपटाच्या लाल चोंचींत द्याल. परंतु माणसाला दूर ठेवाल. हरिजन तुमचे पाय सांभाळतात. जोडे शिवून देतात, मोटा शिवून देतात. त्यांना हें बक्षिस ? कृतघ्न झालेत हजारों वर्षें त्यांचीं फळें भोगा. म्हणे शिवाजीनें अस्पृश्यता राखून नाहीं का स्वराज्य मिळविलें ? परंतु बाबा तें गेलें. कां गेलें ? तुमचे हजार भेद. तुमचीं श्रेष्ठकनिष्ठपणाचीं भांडणें. प्रभुप्रकरणें, ब्राह्मण-प्रकरणें, गोमूत्र-प्रकरणें, प्रायश्चित्त-प्रकरणें यांना ऊत आला. अशा करंटयांना स्वराज्य मिळत नसतें.

हरिजनांना जवळ घ्या. ओटीवर बसवा. त्यांना पानसुपारी द्या. त्यांना विहिरीवर येऊं दे. मंदिरात येऊं दे. हा खरा संतांनीं आचरलेला धर्म आहे. त्या धर्माची काँग्रेस सेवा करीत आहे. काँग्रेसला पवित्र माना.

शारदाबिलामुळेंहि काँग्रेसवर तुम्ही रागावतां. जर तुम्ही खरे शेतकरी असाल तर तुम्ही शारदाबिलाचें स्वागत कराल. शेतकरी आंब्याच्या रोप्याला लौकर आलेला मोहोर खुडून टाकतो. आंब्याला लौकर फळें लागलीं तर त्याची नीट वाढ होणार नाहीं हें त्याला कळतें. तसेंच संत्र्यामोसंब्याचें. ज्वारीचें ताट लहान आहे तोंच पसवलें तर तें उंच वाढत नाहीं. हें सारें तुम्ही पहातां ना ? शारदाबिलांत तेंच आहे. पुराणांत वर्णिलेल्या आंगठ्याएवढ्या वालखिल्य ऋषीप्रमाणें व्हावयाचें नसेल तर शारदा बिल पाहिजे. समाजावर परिणाम शेंकडों वर्षांनीं दिसतो. शेंकडों वर्षांच्या बालविवाहाचीं फळे आज दिसत आहेत. आज जर पुन्हा प्रौढविवाह सुरू करूं तर त्याचे सुपरिणाम कित्येक वर्षांनीं दिसतील. शारदा बिल वेदानुसारी आहे. सीता का दोन वर्षांची होती ? द्रौपदी, दमयंती, सावित्री का बाहुल्या होत्या ? वेदांतील विवाहमंत्रांत वधूला उद्देशून म्हटलें आहे 'घराची धनीण हो. सासूबाई आतां बसतील.' आठ वर्षांची मुलगी का धनीण होईल ? सारा चावटपणा आहे.  शहरांतील कांहीं सनातनी आपल्या मुली शिकवितात आणि तुमची मात्र दिशाभूल करतात. या शहरी सनातन्यांच्या मुली चांगल्या प्रौढ झाल्यावर विवाहित होतात, तुमची मात्र फसवणूक. शेतकरी म्हणतात 'आमच्या मुली कामावर जातात. तेथें त्यांचा कोण सांभाळ करणार ?' असें बोलूं नका. खंबीरपणा उत्पन्न करा. मुलांना तेजस्वी बनवा. पावित्र्याचा प्रचार केला पाहिजे. आपण का डुकरें आहोंत ? कुत्रीं मांजरें आहोंत ? मुलीच्या शरीराची वाढ १८ वर्षेपर्यंत होत असते. तर चौदाव्या वर्षी तिला मूल स्वत:चें सांभाळावें लागतें. जिचें खेळण्याचें, उड्या मारण्याचें वय, तिला स्वत:चें लेंकरूं खेळवावें लागतें. अरेरे. नका हें पाप करूं, शारदाबिल पवित्र आहे. तो वेदानुकूल आदेश आहे.

खोट्या कल्पनांना बळी पडूं नका. कांग्रेसचें खरें स्वरूप ओळखा. सध्यां आपलें मंत्रिमण्डळ आहे. निर्भय व्हा. स्वत:च्या दुखा:च्या दूरीकरणार्थ चळवळ करा. कांग्रेसच्या झेंड्याखालीं लाखोंनीं सभासद होऊन या. खानदेशांत या वर्षी एक लाख सभासद करा. कांग्रेसचे कोट्यवधि सभासद झाले म्हणजे तिचा आवाज कोण दडपील ? महात्माजी म्हणतात 'हा गव्हर्नर नको.' तें ऐकलें जातें. कां ? तुम्हीं पाठिंबा दिलात म्हणून. सरदार वल्लभभाई म्हणत आहेत 'लष्करी खर्च कमी करा. नाहींतर पेंचप्रसंग निर्माण होईल.' तुम्हीं कांग्रेसच्या पाठीमागें याल तर सरकार ऐकेल. राष्ट्रपति सुभाषचंद्र म्हणाले, 'रुपयाची किंमत सोळा पेन्स करा म्हणजे भाव वाढतील.' व्हॉइसराय साहेब म्हणतात, 'आम्ही करणार नाहीं.' अठरा आण्यांचा माल घेऊन आम्ही सोळा आणेच देणार. राष्ट्रपतींचा हा अपमान कां ? तुम्ही कांग्रेसमध्यें सामील होत नाहीं म्हणून. स्वत:चा संसार कांहीं तरी केल्याशिवाय सुधारणार नाहीं. झगड्यांत सामील व्हा. तमासगिरांसारखे दूर राहूं नका. खोट्या शंका फेका. 'हे गांधीचे लोक, ही कांग्रेस' असें नका म्हणूं. कांग्रेस तुमची आहे. तुम्ही तिला वाढवा. म्हणजे ती सुखाचा सुकाळ करील. दर वर्षी स्त्री पुरुष सारे सभासद व्हा. निवडणूक आली तर प्रत्येक मत कांग्रेसला द्या, चळवळ आली तुरुंगांत चला. लष्करी कायदा पुकारला तर गोळीसाठीं छाती फुगवून पुढें करा. ज्याला जेवढें जमेल तेवढें करावें. परन्तु कांहीं तरी करा म्हणजे स्वातंत्र्य जवळ येईल.'
२० जून, १९३८.

गोड निबंध-भाग १

पांडुरंग सदाशिव साने
Chapters
पावसाळ्यातील एक दिवस गोड निबंध-भाग १ 1 गोड निबंध-भाग १ 2 गोड निबंध-भाग १ 3 गोड निबंध-भाग १ 4 गोड निबंध-भाग १ 5 गोड निबंध-भाग १ 6 गोड निबंध-भाग १ 7 गोड निबंध-भाग १ 8 गोड निबंध-भाग १ 9 गोड निबंध-भाग १ 10 गोड निबंध-भाग १ 11 गोड निबंध-भाग १ 12 गोड निबंध-भाग १ 13 गोड निबंध-भाग १ 14 गोड निबंध-भाग १ 15 गोड निबंध-भाग १ 16 गोड निबंध-भाग १ 17 गोड निबंध-भाग १ 18 गोड निबंध-भाग १ 19 गोड निबंध-भाग १ 20 गोड निबंध-भाग १ 21 गोड निबंध-भाग १ 22 गोड निबंध-भाग १ 23 गोड निबंध-भाग १ 24 गोड निबंध-भाग १ 25 गोड निबंध-भाग १ 26 गोड निबंध-भाग १ 27 गोड निबंध-भाग १ 28 गोड निबंध-भाग १ 29 गोड निबंध-भाग १ 30 गोड निबंध-भाग १ 31 गोड निबंध-भाग १ 32 गोड निबंध-भाग १ 33 गोड निबंध-भाग १ 34 गोड निबंध-भाग १ 35 गोड निबंध-भाग १ 36 गोड निबंध-भाग १ 37 गोड निबंध-भाग १ 38 गोड निबंध-भाग १ 39 गोड निबंध-भाग १ 40 गोड निबंध-भाग १ 41 गोड निबंध-भाग १ 42 गोड निबंध-भाग १ 43 गोड निबंध-भाग १ 44 गोड निबंध-भाग १ 45 गोड निबंध-भाग १ 46 गोड निबंध-भाग १ 47 गोड निबंध-भाग १ 48 गोड निबंध-भाग १ 49 गोड निबंध-भाग १ 50 गोड निबंध-भाग १ 51 गोड निबंध-भाग १ 52 गोड निबंध-भाग १ 53 गोड निबंध-भाग १ 54 गोड निबंध-भाग १ 55 गोड निबंध-भाग १ 56 गोड निबंध-भाग १ 57 गोड निबंध-भाग १ 58 गोड निबंध-भाग १ 59 गोड निबंध-भाग १ 60 गोड निबंध-भाग १ 61 गोड निबंध-भाग १ 62 गोड निबंध-भाग १ 63 गोड निबंध-भाग १ 64 गोड निबंध-भाग १ 65 गोड निबंध-भाग १ 66 गोड निबंध-भाग १ 67 गोड निबंध-भाग १ 68 गोड निबंध-भाग १ 69 गोड निबंध-भाग १ 70 गोड निबंध-भाग १ 71 गोड निबंध-भाग १ 72 गोड निबंध-भाग १ 73 गोड निबंध-भाग १ 74 गोड निबंध-भाग १ 75 गोड निबंध-भाग १ 76 गोड निबंध-भाग १ 77 गोड निबंध-भाग १ 78 गोड निबंध-भाग १ 79 गोड निबंध-भाग १ 80 गोड निबंध-भाग १ 81 गोड निबंध-भाग १ 82 गोड निबंध-भाग १ 83 गोड निबंध-भाग १ 84 गोड निबंध-भाग १ 85 बापूजींच्या गोड गोष्टी 52 श्याम 37 चार गोष्टी 1