Get it on Google Play
Download on the App Store

गोड निबंध-भाग १ 20

कोठेंतरी ठिणगी पडावी लागते. मुसलमान समाजांत ती पडली आहे. 'वन्हि तो पेटवावा रे, पेटवितांचि पेटतो' असें समर्थ म्हणत. तो पवित्र वन्हि मुसलमानांत पेटला आहे. तो हिंदुस्थानभर पेटल्याशिवाय राहणार नाहीं.

इंग्रजांना तोंड द्यावयाचे असेल तर प्रचंड संघटना केल्याशिवाय देतां येणार नाहीं. सर्वांना बरोबर घेतल्याशिवाय तोंड देतां येणार नाहीं. इंग्रजांचें राज्य कशाच्या जोरावर चाललें आहे ? दुहीच्या. फोडा व झोडा या तत्त्वावर इंग्रज राज्य करितो. फोडा व झोडा हें जर इंग्रजांचें सूत्र असेल तर एकमेकांस जोडा हें आमचें असलें पाहिजे. जर आम्हीहि आमच्यांत फूट पाडूं तर इंग्रजांचेच बगलबच्चे आपणहि होऊं. आपल्यांतील हीं भांडणें पाहून इंग्रज मनांत हंसत व हिंदुस्थान कायमचा बंधनांत ठेवूं असें म्हणत असेल.

नवयुवकांनो जुन्या लोकांचे विचार तुम्ही तरी आपल्याजवळ येऊं देऊं नका. हिंदुस्थानचे धिंडवडे करणार्‍या लोकांच्या पाठीमागें जाऊं नका. तुमच्या स्वप्नांतून उद्यांचा हिंदुस्थान बनावयाचा आहे. जुनी भांडणें मनांत आठवण्यांत पुरुषार्थ नाहीं. उज्ज्वल भविष्यकाळाचीं निर्मळ व उदात्त चित्रें रंगविण्यांत व तदनुरूप वागविण्यांत पुरुषार्थ आहे.

भारताला एक महान् प्रयोग करावयाचा आहे. भारताचें भाग्य बनविणार्‍या ईश्वराचे कांहीं हेतु आहेत. या हिंदुस्थानांत प्राचीन काळापासून सर्व धर्मांचे लोक येत आहेत. सर्व धर्मांचे लोक एकत्र आणून त्यांची एक महान् संमिश्र संस्कृति परमेश्वराला बनवावयाची आहे. हिंदु, मुसलमान, शीख, पारशी, जैन, बुध्द, ख्रिस्त सारे धर्म येथें आहेत, या सर्वांना येथें आणण्यांत एक अर्थ आहे. या सर्वांना प्रेमानें टिपर्‍या खेळत ऐक्याचा गोप विणावयास प्रभु लावणार आहे.

या थोर ध्येयासाठीं भारत जगला आहे. ही खरी विशाल भारतीय संस्कृति. भारताच्या उत्तरेस उंच हिमालय आहे. तो उंच हिमालय सांगत आहे कीं, मनें उंच करा, स्वच्छ ठेवा. तो समुद्र सांगत आहे, मी सर्व ठिकाणच्या नद्या घेऊन मोठा झालों. तुम्हीं सर्व मानव एकत्र येऊन महान् प्रेमसिंधु निर्माण करा.

ऋषींचें हें स्वप्न होतें. संतांचें हें स्वप्न होतें. भारतीय संस्कृतींत हिंदु-मुसलमान संत मिळून गेले आहेत. कबीर हा हिंदूंना का परका वाटतो ? नाहीं ! नाहीं. कबीराचे दोहरे आमचा वेदच आहे. अशी थोर संस्कृति आज कोण वाढवीत आहे ? काँग्रेस. सर्व मानव जातींत जितके धर्म आहेत, तितके धर्म आज येथें आहेत. मानवजातीच्या ऐक्याचा हा प्रयोग आहे. हा प्रयोग यशस्वी करून आपण मानवजातीस सांगूं. 'पहा भारत कसा भेदांत अभेद पहात आहे, विभिन्न सुरांतून दिव्य मधुर संगीत निर्माण करीत आहे.' असें भारतास केव्हां बरें म्हणतां येईल ?

तुम्ही नवतरुण आंधळेपणा सोडून भारतीय संस्कृतीच्या दिव्य प्रकाशानें दृष्टि भरून घ्याल तेव्हां. आंधळें होऊं नका. जुनीं मढीं उकरून काढूं नका. श्रध्देचा दिवा हातांत घेऊन भव्य दिव्य ध्येयासाठीं उभे रहा. सेनापतींसारख्यांवर हल्ले करणार्‍या या संघांतून शिरूं नका. मनें या विषारी प्रचारापासून दूर ठेवा. एका काँग्रेसच्या झेंड्याखालीं या. बोला, भारतीय तरूणांनो, बोला. तुम्हीं पुण्याला मवालीपणा करणार्‍या आत्मघातकी आंधळ्या तरुणांप्रमाणें होणार का राष्ट्राचे तुकडे जोडूं पाहणार्‍या, राष्ट्राची एक नाडी, एक हृदय, एक बुध्दि करूं पाहणार्‍या खर्‍या भारतीय संस्कृतीचे उपासक होणार ?
९ मे, १९३८.

गोड निबंध-भाग १

पांडुरंग सदाशिव साने
Chapters
पावसाळ्यातील एक दिवस गोड निबंध-भाग १ 1 गोड निबंध-भाग १ 2 गोड निबंध-भाग १ 3 गोड निबंध-भाग १ 4 गोड निबंध-भाग १ 5 गोड निबंध-भाग १ 6 गोड निबंध-भाग १ 7 गोड निबंध-भाग १ 8 गोड निबंध-भाग १ 9 गोड निबंध-भाग १ 10 गोड निबंध-भाग १ 11 गोड निबंध-भाग १ 12 गोड निबंध-भाग १ 13 गोड निबंध-भाग १ 14 गोड निबंध-भाग १ 15 गोड निबंध-भाग १ 16 गोड निबंध-भाग १ 17 गोड निबंध-भाग १ 18 गोड निबंध-भाग १ 19 गोड निबंध-भाग १ 20 गोड निबंध-भाग १ 21 गोड निबंध-भाग १ 22 गोड निबंध-भाग १ 23 गोड निबंध-भाग १ 24 गोड निबंध-भाग १ 25 गोड निबंध-भाग १ 26 गोड निबंध-भाग १ 27 गोड निबंध-भाग १ 28 गोड निबंध-भाग १ 29 गोड निबंध-भाग १ 30 गोड निबंध-भाग १ 31 गोड निबंध-भाग १ 32 गोड निबंध-भाग १ 33 गोड निबंध-भाग १ 34 गोड निबंध-भाग १ 35 गोड निबंध-भाग १ 36 गोड निबंध-भाग १ 37 गोड निबंध-भाग १ 38 गोड निबंध-भाग १ 39 गोड निबंध-भाग १ 40 गोड निबंध-भाग १ 41 गोड निबंध-भाग १ 42 गोड निबंध-भाग १ 43 गोड निबंध-भाग १ 44 गोड निबंध-भाग १ 45 गोड निबंध-भाग १ 46 गोड निबंध-भाग १ 47 गोड निबंध-भाग १ 48 गोड निबंध-भाग १ 49 गोड निबंध-भाग १ 50 गोड निबंध-भाग १ 51 गोड निबंध-भाग १ 52 गोड निबंध-भाग १ 53 गोड निबंध-भाग १ 54 गोड निबंध-भाग १ 55 गोड निबंध-भाग १ 56 गोड निबंध-भाग १ 57 गोड निबंध-भाग १ 58 गोड निबंध-भाग १ 59 गोड निबंध-भाग १ 60 गोड निबंध-भाग १ 61 गोड निबंध-भाग १ 62 गोड निबंध-भाग १ 63 गोड निबंध-भाग १ 64 गोड निबंध-भाग १ 65 गोड निबंध-भाग १ 66 गोड निबंध-भाग १ 67 गोड निबंध-भाग १ 68 गोड निबंध-भाग १ 69 गोड निबंध-भाग १ 70 गोड निबंध-भाग १ 71 गोड निबंध-भाग १ 72 गोड निबंध-भाग १ 73 गोड निबंध-भाग १ 74 गोड निबंध-भाग १ 75 गोड निबंध-भाग १ 76 गोड निबंध-भाग १ 77 गोड निबंध-भाग १ 78 गोड निबंध-भाग १ 79 गोड निबंध-भाग १ 80 गोड निबंध-भाग १ 81 गोड निबंध-भाग १ 82 गोड निबंध-भाग १ 83 गोड निबंध-भाग १ 84 गोड निबंध-भाग १ 85 बापूजींच्या गोड गोष्टी 52 श्याम 37 चार गोष्टी 1