समुद्रातील काही गुढ रहस्य: चंद्राप्रकाशाचा प्रजननावर परिणाम
ऑस्ट्रेलियातील 'ग्रेट बॅरीयर रीफ'वर चंद्रप्रकाशाचा परिणाम होतो. इथे प्रवाळांच्या 130 प्रजातींचा मिलनाचा काळ वसंत ऋतूमध्ये एखाद्या रात्री याच चंद्रप्रकाशात असतो. प्रवाळांच्या या जाती एका वेळी अनेक अंडी देतात आणि शुक्राणू सोडतात. जवळपास तासाभरात ही क्रिया घडते. शास्त्रज्ञांच्या मते हे दृश्य पाहण्यासारखं असतं. असं मानलं जातं की प्रवाळांत फोटोरिसेप्टर असतात आणि त्यांना चंद्रप्रकाशात एकत्र येण्यासाठी संकेत दिले जातात. प्रकाशाची वेगवेगळी रुपं ती पकडू शकतात. त्यामुळं त्यांना अंडी आणि शुक्राणू सोडण्यात मदत होते.