Get it on Google Play
Download on the App Store

निळ्या रंगाचं केळं खरंच अस्तित्वात आहे का?

निळ्या रंगाचे केळे? कसं शक्य आहे?

https://qphs.fs.quoracdn.net/main-qimg-8b844a01ac74a32d2379f00685df8252

काही वर्षांपूर्वी हीच प्रतिक्रिया जांभळ्या रंगाच्या कोबीबद्दल देखील होती. आपण लहानपणापासून एखादे फळ एखा विशिष्ट रंगामध्ये पाहत आलो आहोत, त्यामुळे लहान मुलं जरी ते फळ वेगळ्या रंगाने रंगवत असतील तर आपण त्यांना सांगतो, सफरचंद लाल रंगाचे असते, संत्री नारंगी, इ.

फळांना निसर्गतःच विशिष्ट रंग असतात. पण वैज्ञानिक आपल्या प्रयोगांमधून निसर्गाला आव्हान देत आले आहेत. (आव्हान- नाविन्याची आणि प्रगतीसाठी. निसर्गाचा समतोल बिघडवण्यासाठी नाही)

ही केळी आग्नेय आशियातील - मुसा बालबिसियाना आणि मुसा अमुमिनाता या दोन प्रजातींपासून संकरीत करण्यात आली आहे. या केळीला मुख्यतः निळी जावा केळी म्हणतात, आणि त्या प्रामुख्याने आग्नेय आशियात उत्पादित केल्या जातात. हवाईमध्ये ही केळी प्रचंड लोकप्रिय असून चवीमुळे या केळीला 'आईस्क्रीम केळीसुद्धा म्हणतात.

काही महिन्यांपूर्वी या केळीच्या रंग आणि चवीच्या वैशिष्ट्याने इंटरनेटवर खळबळ उडवली होती. आधी सर्वांनी या केळीच्या फोटोकडे एडिट केलेला फोटो समजून दुर्लक्षित केले, पण जेव्हा ओगल्वीचे माजी ग्लोबल चीफ क्रिएटिव्ह ऑफिसर थम खाई मेंग यांनी आपल्या ट्विटर हॅण्डलवरून याबाबाबत ट्विट केल्यानंतर अनेकांनी हे केळं खरोखरच अस्तित्वात असल्याचे मान्य केले.

ट्विट - 'ब्लू जावा केळी लावण्यास मला कुणी कधी कसे सांगितले नाही? ते आइस्क्रीमसारखे चवदार आहेत.'

पुढे त्याने एक ट्विट सामायिक केले जेथे त्यांनी अ‍ॅमेझोपीडिया दुव्याचा उल्लेख केला. ज्यामध्ये या अनोख्या फळाबद्दल सर्व तपशीलवार माहिती आहे. अ‍ॅमेझोपिडियाच्या मते, हे निळे जावा केळे मूसा अकिमिनाटा आणि मुसा बालबिसियाना या सीड केळीचे ट्रिप्लोइड संकर आहेत. आणि ते 15 ते 20 फूट उंचीपर्यंत वाढू शकतात. यांच्या झाडाची पाने चांदी-हिरव्या रंगाची असतात. तसेच इष्टतम वाढीसाठी त्यांना 40 फॅरेनहाइट तापमान आवश्यक आहे.

फिजीमध्ये, त्यांना 'हवाईयन केळी' म्हणून ओळखले जाते, फिलिपिन्समध्ये त्यांना 'करी' म्हटले जाते आणि मध्य अमेरिकेत ते 'सेनिझो' या नावाने लोकप्रिय आहेत.

विज्ञानामागील सायन्स

अभिषेक ठमके
Chapters
विज्ञानामागील सायन्स © अभिषेक ज्ञानेश्वर ठमके लेखकाचे मनोगत न्युझीलँड येथील वेटोमो गुहेच्या चमकण्याचे रहस्य काय आहे? कोलंबिया येथील कैनो क्रिस्टल्स या रंग बदलणाऱ्या नदीचे रहस्य काय आहे? चंद्र आणि सूर्याभोवती रिंगण का पडते? पृथ्वीचा तिसरा ध्रुव कुठे आहे? जपानमधील 10 हजार वर्षापुर्वी समुद्रात बुडलेले योगागूनीचे विशाल शहर खरंच अस्तित्वात होते का? पनामा कालवा - आधुनिक जगातील सात आश्चर्यांपैकी एक आश्चर्य दक्षिणेकडून उत्तरेकडे वाहणारी नाईल नदी आजूबाजूला वाळवंट असताना देखील आटली कशी नाही? ज्वालामुखी त्सुनामी म्हणजे काय? आइसलँड येथील हौकडलूर दरीतील गिझर आहे तरी काय? मोबाईल कॅमेऱ्याने चंद्राची छायाचित्रे स्पष्टपणे का येत नाहीत? तुर्की या देशात पामुक्कलेमध्ये हजारो वर्षांपासून गरम पाण्याचे झरे कसे काय आहेत? समुद्राच्या लाटा नेहमीच किनाऱ्याकडे का येतात? त्याच्या विरुद्ध दिशेने का जात नाही? सूर्य एक तारा आहे का? वेगवेगळ्या ग्रहांवर वस्तूंचे वजन भिन्न का असते? घड्याळात क्वार्ट्झ (Quartz) का लिहिलेले असते? 'मोनो ट्रेन' आणि 'मेट्रो ट्रेन' यात काय फरक आहे? मनुष्य प्राणी अंतराळात जास्तीत जास्त किती दिवस राहू शकतो? सूर्याची उत्पत्ती कशी झाली? त्याचे आयुष्य किती वर्षांचे आहे? सूर्यापासून सर्वात जवळ आणि दूर कोणता ग्रह आहे? आकाशातील तारे आणि उपग्रह कसे ओळखावे? अंतराळात कोणत्या ग्रहांची एस्केप व्हेलॉसिटी सर्वात जास्त व सर्वात कमी आहे? आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानक (इंरनॅशनल स्पेस स्टेशन) पृथ्वी भोवती भ्रमण का करते? भारतात रॉकेट आणि अवकाशयान कोठे बनवतात? सॅटेलाईटच्या प्रक्षेपणाच्या वेळी त्याच्याभोवती सोनेरी कागद का लावतात? पृथ्वीपासून मंगळ ग्रहाचे अंतर किती आहे? अंतराळात ऑक्सिजन नसताना देखील सूर्य कसा जळत आहे? कधी कधी मोबाइल वरून क्रॉस कनेक्शन कसे लागते? निळ्या रंगाचं केळं खरंच अस्तित्वात आहे का? 5G तंत्रज्ञान पक्ष्यांसाठी घातक आहे का? शुक्र ग्रहावर वसाहत करणे कसे शक्य आहे? विमान प्रवासाने ग्लोबल वॉर्मिंग होते का? टायटॅनिक जहाज का बुडाले? समुद्रातील काही गुढ रहस्य समुद्रातील काही गुढ रहस्य: रामसेतू समुद्रातील काही गुढ रहस्य: मृत समुद्र जिथे माणूस बुडत नाही समुद्रातील काही गुढ रहस्य: मेरी क्लेस्टे जहाज समुद्रातील काही गुढ रहस्य: किनाऱ्यावरील निळा प्रकाश समुद्रातील काही गुढ रहस्य: मिल्की सी समुद्रातील काही गुढ रहस्य: एलियन्सचे अस्तित्व समुद्रातील काही गुढ रहस्य: योनागुनी तटावरील अवशेष समुद्रातील काही गुढ रहस्य: 19 फूट लांब शार्कवर हल्ला समुद्रातील काही गुढ रहस्य: समुद्रकिनाऱ्यावरील पायांचे पंजे समुद्रातील काही गुढ रहस्य: क्युबा येथील समुद्राखालील शहर समुद्रातील काही गुढ रहस्य: रहस्यमयी ममी समुद्रातील काही गुढ रहस्य: पृथ्वी अर्ध्यापेक्षा जास्त काळोखात आहे समुद्रातील काही गुढ रहस्य: पृथ्वीवरील सर्वाधिक ज्वालामुखी समुद्रातील काही गुढ रहस्य: समुद्रापेक्षा मंगळाचे नकाशे अधिक स्पष्ट समुद्रातील काही गुढ रहस्य: सर्वात मोठ्या समुद्राच्या लाटा समुद्रातील काही गुढ रहस्य: पृथ्वीवरील सर्वात मोठा धबधबा समुद्रातील काही गुढ रहस्य: 70% पेक्षा जास्त ऑक्सिजन पुरविणारे वनस्पती समुद्रातील काही गुढ रहस्य: स्क्विड समुद्रातील काही गुढ रहस्य: चंद्राप्रकाशाचा प्रजननावर परिणाम