5G तंत्रज्ञान पक्ष्यांसाठी घातक आहे का?
नाही, 5G मुळे पक्ष्यांना कोणताही धोका नाही. 5G सेल्युलर कम्युनिकेशन टॉवर्सवरील रेडिओ लहरी पक्ष्यांच्या मृत्यूस कारणीभूत ठरत आहेत, हे आपण फेसबुक, ट्विटर, यूट्यूबवर पाहिले आहे. काही वर्षांपूर्वी आलेल्या रोबोट २.० चित्रपटाचा संदर्भ घेऊन अनेक इंटरनेट युजर्स स्वतःहून हा दावा करत आहेत. जे पूर्णपणे चुकीचे आहे.
मॅग्नेटिक्समध्ये तज्ज्ञ असलेल्या कॅलिफोर्निया इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीचे जीवशास्त्रज्ञ ज्यो-किर्शविंक यांच्या म्हणण्यानुसार, “5G म्हणजेच आपल्या मोबाइल सेल्युलर नेटवर्कची पाचवी पिढी पक्ष्यांसाठी धोकादायक नाही. रेडिओ ट्रान्समिशन अँटिना (सेल टेलिफोन टॉवरसमवेत ) १० मेगाहर्ट्झपेक्षा जास्त रेडिओ वेव्ह उत्सर्जन पक्ष्यांना हानीकारक नाही.